There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
१९३८ साल. हंगेरीचा लष्करी सार्जंट, कारोली तकाक्स, वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी आपल्या देशातील सर्वश्रेष्ठ पिस्तूल नेमबाज म्हणून ओळखला जात होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जवळपास सर्व मोठ्या स्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. १९४० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा तो प्रबळ दावेदार मानला जात होता. त्याचे लक्ष्य निश्चित होते आणि त्यावर पोहोचण्याचा मार्गही स्पष्ट दिसत होता.
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. लष्करी प्रशिक्षणादरम्यान, एक हँड ग्रेनेड चुकून कारोलीच्या नेमबाजी करणाऱ्या उजव्या हातातच फुटला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. त्याचा हात अक्षरशः निकामी झाला. या दुर्घटनेने केवळ त्याचा हातच नाही, तर ऑलिम्पिक जिंकण्याचं त्याचं स्वप्नही भंग पावलं होतं.
अशा परिस्थितीत कोणीही "माझ्यासोबतच असं का झालं?" हा प्रश्न विचारून रडत बसला असता. कारोलीने स्वतःला दुःखसागरात बुडू दिले असते, तर ते स्वाभाविकच वाटले असते. पण कारोली वेगळ्याच मातीचा बनला होता. त्याने काय गमावले आहे यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, आपल्याकडे काय शिल्लक आहे यावर लक्ष केंद्रित केले.
उजवा हात गमावला असला तरी त्याच्याकडे अजूनही काही जमेच्या गोष्टी होत्या -
- अफाट मानसिक शक्ती
- विजेत्याची मानसिकता
- यश मिळवण्याची जिद्द
आणि... एक धडधाकट डावा हात!
https://www.facebook.com/100044560684437/posts/pfbid029uqotn181cZxYMqZvJohrCMXZoEjdx6JXB5SaiUtXyjymjzMYW5WsfobrsTLcwxGl/
त्याने ठरवले - याच डाव्या हाताला तो जगातील सर्वोत्तम नेमबाजी करणारा हात बनवणार.
रुग्णालयातून बाहेर पडल्यावर, जगाच्या नजरेआड, त्याने आपल्या डाव्या हाताने सराव सुरू केला. शरीरातील असह्य वेदना आणि उजव्या हाताची सगळी कामं डाव्या हातावर आल्याने येणारा ताण, या कशाचीही पर्वा न करता तो आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून होता.
एका वर्षानंतर, कारोली हंगेरीच्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत परतला. त्याचे सहकारी त्याला पाहून आनंदी झाले. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तो आला आहे, असे सर्वांना वाटले. पण जेव्हा कारोली म्हणाला की, "मी तुम्हाला पाहण्यासाठी नाही, तर तुमच्याशी स्पर्धा करण्यासाठी आलो आहे," तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
आणि तो जिंकला सुद्धा! केवळ एका वर्षात, आपल्या डाव्या हाताने त्याने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते.
पण कारोलीचे ऑलिम्पिक स्वप्न त्याला चकवा देत होते.
दुर्दैवाने, दुसऱ्या महायुद्धामुळे १९४० आणि १९४४ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाल्या. कारोलीने धीर सोडला नाही. तो सराव करतच राहिला. अखेर १९४८ साली लंडनमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन झाले. त्याच्या अपघातानंतर तब्ब्ल १ ० वर्षे त्याला याची वाट पहावी लागली होती. कारोलीने अखेरीस ऑलिम्पिक मध्ये हंगेरीचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या डाव्या हाताने नेमबाजी करत सुवर्णपदक जिंकले!
पण ही कथा इथेच संपत नाही. आणखी चार वर्षांनंतर, १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये, पिस्तूल नेमबाजीत पुन्हा एकदा सुवर्णपदक कारोलीच्याच नावावर कोरले गेले. दुर्दम्य इच्छाशक्तीने , अनेक अडचणींवर मात करून अखेर कारोलीने आपले स्वप्न पूर्ण केलेच !
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================
आपल्या आयुष्यातही असे क्षण येतात जेव्हा आपण यशाच्या अगदी जवळ असतो आणि अचानक सर्व काही गमावून बसतो. जेव्हा आपली स्वप्न भंग पावतात आणि आपण पराभूत झाल्यासारखे वाटू लागतो, तेव्हा कारोलीला आठवा. त्याने काय गमावले याचा विचार करण्याऐवजी, आपल्याकडे काय शिल्लक आहे यावर लक्ष केंद्रित केले. तुमची आंतरिक शक्ती आणि तुमचा मानसिक कणखरपणा कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.
शेवटी, पिस्तूल नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणं हे हाताच्या कौशल्यापेक्षा मानसिकतेवर जास्त अवलंबून असतं. आयुष्यही तसंच आहे. जिंकणं हे कौशल्यावर कमी आणि तुमच्या वृत्तीवर (Attitude) जास्त अवलंबून असतं !
यशस्वी भव !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !