There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. रामायण हे वाल्मिकींच्या लेखणीतून निर्माण झालेलं महाकाव्य असुन सद्गुण, नीतीमूल्य आणि वाईटावर चांगल्याचा विजय याचं ते प्रतिक आहे. जरी ही एक धार्मिक आणि पौराणिक महाकथा असली तरी यामधून घेण्यासारखे काही असे व्यवस्थापनचे धडे आहेत कि जे प्रत्येक उद्योजकाने त्याच्या औद्योगिक भरभराटीसाठी समजून घेणे आवश्यक आहे.
१. प्रतीवचन देणे टाळा.
दशरथाने कैकयीची इच्छा जाणून घेण्याआधीच तिची एक इच्छा पूर्ण करण्याचे तिला वचन दिले त्यामुळे पुढे त्याला खुप मनस्ताप आणि अनेक अडचणींना सामोरे जावे लागले परिणामी त्यातच त्याचा अंत होतो. उद्योजकांसाठी हा खुप मोठा धडा आहे कारण बिझनेस मध्ये देखिल असेच आहे या क्षेत्रात काम करत असताना तुमच्या क्षमतेपेक्षा मोठी वचनं ग्राहकांना देणे टाळा यामुळे तुम्ही फसाल त्यापेक्षा कमी वचनं देवून त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त पुरवा ते कधिही या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी उपयुक्त ठरेल
२. अतिशय हुशारिने स्वतःची टीम बनवा.
रामाला समुद्र पार करुन लंकेत पोहचण्यासाठी अशा संघ सामर्थ्याची गरज होती जे त्याच्या विश्वासायोग्य आणि पुर्ण ताकदीनिशी त्याच्यासाठी काम करणारे असतील त्याप्रमाणेच तुम्हाला या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी अशा लोकांना शोधणं गरजेचे आहे जे तुमच्या ध्येयाला आपलं समजून त्या दृष्टीने तुमचा बिझनेस यशस्वी करण्यासाठी काम करतील.
३. कोणत्याही परीस्थितीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता ठेवा .
रामायणामध्ये हनुमानाने संजिवनी शोधू न शकल्याने तसाच परत न येता संपूर्ण पर्वत उचलून आणण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला. एक उद्योजक म्हणून तुमच्यापुढे सुध्दा असे अनेक प्रसंग येतील जिथे दुसर्या कोणच्यातरी सल्ल्याची वाट न पाहता तुम्हाला स्वतःच कठीण निर्णय घ्यावे लागतील. पर्वत उचलून आणण्याचा हनुमानाचा निर्णय कदाचित सर्वात चांगला निर्णय नसेलही पण त्यावेळी तो तेच करु शकत होता.
४. त्यागाची भवना ठेवा.
औद्योगिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एक उद्योजक म्हणून खुप गोष्टींचा त्याग करावा लागतो. इतरांपेक्षा जास्त काम करावे लागते आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याला तिलांजली द्यावी लागते. ते म्हणतात ना काहीतरी मिळवण्यासाठी पहीलं काहीतरी गमवावं लागतं त्याचप्रमाणे जो पर्यंत तुम्ही काही गोष्टींचा त्याग करत नाही तोपर्यंत काहीतरी मोठं साध्य करणं शक्य नसते. त्यागाचा हा धडा रामायणातुन आपण कोणाकडून शिकू शकतो तर तो सितेकडून.आपला पत्नीधर्म निभावण्याठी ती महालातील वैभव, आराम यांचा त्याग करते.
५. अहंकारापासून दूर रहा.
रावण एक सर्वशक्तीशाली योध्दा होता. रामापेक्षा जास्त सामर्थ्य आणि पाठबळ त्याच्याजवळ होतं पण फक्त आणि फक्त त्याच्या अहंकारामुळे त्याचा पराजय होतो. असे खुप उद्योजक आहेत जे आपल्या अहंकारामुळे आणि खोट्या दिखाव्यामुळे अयशस्वी होतात. एक चांगला उद्योजक होण्यासाठी अहंकार बाजूला ठेवून आपण आजपर्यंत काय काय मिळवल आहे याचा दिखावा करण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष द्या तुमचं कामच तुमच्यासाठी बोलेल.
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com