There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
जगप्रसिद्ध टीव्ही अँकर ओप्रा विन्फ्रे यांचं जीवन मोठं कठीण होतं, पण त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या अवघड प्रसंगांनी खचून न जाता आपलं भविष्य अत्यंत परिश्रमांनी साकारलं. आज जगात त्यांना जी प्रतिष्ठा लाभली ती केवळ त्यांच्या मेहनतीमुळे आणि कर्तबगारीमुळे
जाणून घेऊया, ओप्रा यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी ...
1. हे जग सकारात्मक विचारांना नेहमी प्रतिसाद देत असतं, म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा.
2. तुम्ही जसे आहात तसे छान आहात, स्वतःला स्वतःच्या गुणदोषांसकट स्वीकारा.
3. तुम्ही वर्तमानात जिथे आणि ज्याही परिस्थितीत असाल, त्याबद्दल देवाचे सदैव आभार माना.
4. जेवढ्या तुमच्या मनातील आशा प्रबळ असतील तितकी तुमची झेप अधिक उंच जाईल.
5. पुढे जायचं असेल तर जीवनात प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या डोळ्यांपुढे ध्येय निश्चित करायला हवे. जोवर अधिकाधिक उंच ध्येय नसतील तोवर मनुष्य प्रगतीच्या दिशेने जाऊच शकत नाही.
6. वास्तव हे आहे की तुम्ही कधीच एकटे नसता, तुमच्याबरोबर कायम ती अज्ञात शक्ती असतेच... ती तुम्हाला वेळोवेळी सांगत असते, तुम्हाला फक्त त्या अज्ञात शक्तीचा आवाज ऐकता आला पाहिजे.
7. जर ते तुम्हाला टेबलाजवळ बसण्यासाठी खुर्ची देत नसतील तर स्वतःची फोल्डींग खुर्ची सोबत आणा. मथितार्थ - स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध स्वतःच पूर्ण शक्तीनिशी उभे रहा.
8. आपण सगळेच या भूतलावर यासाठी आहोत की जे जे आपल्या वाटेत येतील त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण त्यांची मदत करू शकतो, त्यामुळे परोपकारी रहा.
9. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सृष्टीत तुमचंही तितकंच महत्त्व आहे आणि तुम्हालाही तितकीच किंमत आहे जितकी अन्य कोणालाही नाही हे नेहमी लक्षात ठेवा.