There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी
1. स्वप्न पहा, तुमच्या स्वप्नांचा माग सतत घेत रहा. स्वप्न सत्यात येऊ शकतात, पण त्यासाठी तुम्ही कोणत्याही कारणांशिवाय सतत स्वप्नांचा माग घेत पुढे जात राहिलं पाहिजे.
सचिन यांनीही एक स्वप्न पाहिलं होतं, भारताला विश्वचषक मिळवून देण्याचं आणि त्यांनी ते स्वप्न प्रत्यक्षात साकारलं.
2. कधी यश मिळेल, कधी अपयशही पचवावं लागेल... नेहमीच यश मिळत राहील असं कधीच होत नसतं. यशापयश हे एखाद्या पॅकेजसारखं आहे. तुम्ही फक्त तुमच्या प्रयत्नांवर, तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेऊन आत्मविश्वासाने पुढे जात रहाणं महत्त्वाचं आहे.
3. जीवनात सगळं काही अशाश्वत आहे, अशाश्वतता हेच जीवनाचं सत्य आहे, पण मग नेमकं काय मागे उरतं ? तर ते म्हणजे तुमचं माणूस म्हणून असणं मागे उरतं. तुम्ही माणूस म्हणून लोकांच्या चिरस्मरणात रहाता. म्हणूनच यशाने हुरळून न जाता माणूस म्हणून स्वतःला घडवा.
4. शुद्ध मनाने आणि अत्यंत चुरशीने स्पर्धा कराच पण हार मिळो वा जीत मिळो, आपल्या संघाशी आणि प्रतिस्पर्ध्यांशीही विनयशील वर्तणुक कायम ठेवा... कोणताही खेळ तुम्हाला हेच शिकवतो.
5. पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरा, आपल्या क्षमतांचा शंभर टक्के वापर करून सराव करा. तरीही, काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि काही गोष्टी नसतात हे समजून ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यावर अधिक लक्ष्य केंद्रीत करा. जे हातात नव्हतच त्यावर वेळ व शक्ती वाया घालवू नका.
6. "जर योग्य मार्गाने पुढे जात राहिलात तर यश तुम्हाला कधी ना कधी मिळेलच !"
देवाने प्रत्येकालाच काही ना काही गुणवत्ता दिलेली आहेच, गरज आहे ती ओळखून तुमचा मार्ग चोखाळण्याची !!
7. यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही, तुम्ही तसा शॉर्टकट शोधूही नका. नेहमी तुमच्या मनाला विचारा तुम्ही जो मार्ग निवडलाय तो योग्य आहे ना? आणि जर मनाने होकार दिला तर त्या मार्गाने जात रहा. कितीही दूर असला तरीही योग्य मार्गच नेहमी निवडा.
8. संघभावना आणि संघकौशल्य फार महत्त्वाचं आहे. जेव्हा सगळेच सर्वोत्तम लोक एकत्र एक संघ म्हणून खेळतात तेव्हाच ते काहीतरी भव्य साकारू शकतात. आपल्या देशाला अग्रणी ठेवायचं असेल तर हीच सांघिकभावना सर्व क्षेत्रात महत्त्वाची आहे.