There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
भारतीय उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांनी आपल्या जीवनातून सर्वसामान्यांना अनेक आदर्श दिले आहेत. त्यांच्या धडाडीमुळे आणि परिश्रमांनी त्यांनी टाटा ग्रुप ऑफ कंपनीजचे नाव संपूर्ण जगभरात पोचवले. जाणून घेऊया त्यांच्याकडून शिकण्याजोग्या काही गोष्टी -
1. एखादा धाडसी निर्णय जेव्हा तुम्ही नीट विचारपूर्वक घेतलेला असतो, तेव्हा होऊ शकतं की तुम्हाला कोणाचीच साथ मिळत नाही. पण तरीही एकट्याच्या हिंमतीवर पाऊल पुढे टाकलं पाहिजे.
(इंडिका कार लाँच करण्याचा निर्णय घेतल्यावर रतनजींनाही विरोध झाला होता मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि विचारपूर्वक घेतलेल्या त्यांच्या या निर्णयाने भारतीय ऑटोमोटीव्ह इंडस्ट्रीला नवा आयाम दिला.)
2. जर तुमची तत्व पणाला लागत असतील तर तुम्हाला कोणाशीही तडजोड करण्याची गरज नसते. कदाचित अशा वेळी तुम्ही एकटेही पडू शकता पण त्याला घाबरू नका.
3. कंपनीच्या सीईओचं कामच आहे त्यांच्या टीमला प्रेरीत करत रहाणं आणि त्या टीमकडून योग्य रितीने काम करून घेणं, ज्या कंपनीत कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि अपेक्षा यांची दखल घेतली जात असते तेथील कर्मचारी निश्चितच कंपनीसाठी अधिक उत्तम काम करतात.
4. जेव्हा तुम्ही कोणत्याही समूहाचे नेतृत्व करत असता तेव्हा तुम्ही विनम्र आणि इतरांशी संवाद साधणारे एक विनयशील व्यक्ती असाल हीच अपेक्षा तुमच्याकडून केलेली असते, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे गुण तुमच्या अंगी मूलतःच असायला हवेत ते फार महत्त्वाचं आहे.
5. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं आंतरिक संतुलन हलू न देणं हा एक उत्तम गुण रतन टाटांमध्ये आहे. अगदी 17 व्या वर्षी विमान उडवताना अचानक इंजिन फेल झाल्याने आलेलं संकट असो वा पुढे समुहाचा कारभार सांभाळताना आलेली संकटं असोत, टाटांनी आपला हा गुण कधीच सोडला नाही.
6. वेळेचा सदुपयोग करणं आणि त्याचवेळी आपल्या कुटुंबाप्रती जबाबदाऱ्या व स्नेहभाव दर्शवणं हे रतन टाटांकडून शिकावं. जेव्हा टाटांच्या आई रूग्णालयात होत्या तेव्हा ते आईजवळ तेथे थांबायचे. तेथे त्यांच्याजवळ बराच वेळ असायचा. या वेळेचा सदुपयोग त्यांनी टाटा समुहाच्या स्ट्रॅटेजिक प्लॅन्स बनवण्याकरीता केला.