There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
चीनमधील श्रेष्ठ जगप्रसिद्ध तत्वज्ञ कन्फ्यूशिअस यांनी काही मौल्यवान विचार या जगाला दिले. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी -
1. सगळ्यांमध्ये सौंदर्य असतं पण सगळ्यांनाच ते पाहण्याची दृष्टी नसते.
2. कुठेही गेलात तरीही त्या जागी मनापासून जा, ते महत्त्वाचं..
3. केलेली चूक दुरूस्त न करणं ही सर्वात मोठी चूक असते.
4. शांतता ही त्यांच्याच अंगी असते जे कधीच कोणाला धोका देत नाहीत.
5. जेव्हा चांगल्या माणसांच्या सान्निध्यात याल तेव्हा त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करा, जेव्हा वाईट माणसांच्या सान्निध्यात याल तेव्हा त्याला पाहून स्वतःतील दोष ओळखण्याचा प्रयत्न कराल.
6. जेव्हा तुम्ही सूडाच्या प्रवासाला निघाल, लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याबरोबर स्वतःच्याही अंताला निघाला आहात...
7. भूतकाळाचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला तुमचा भविष्यकाळ घडवता येईल.
8. सगळ्यात विनोदी माणसं ही जगातील सगळ्यात दुःखी माणसं असतात.
9. जो माणूस पर्वत हलवतो, त्याने सुरुवात पायथ्याचा एकेक दगड हलवण्यापासूनच केलेली असते.