आपली ताकद ओळखा

काही खेळाडूंच्या गाठोड्यात अनेक शॉट्स असतात, ते एका चेंडूवर तीन चार प्रकारचे निरनिराळे शॉट्स खेळू शकतात, आणि मुख्य म्हणजे यापैकी प्रत्येक शॉट ते उत्तम प्रकारेच खेळतात. अशा खेळाडूंना जणू दैवी देणगीच मिळालेली असते.

काही खेळाडू मात्र असे असतात जे मर्यादित शॉट्सच खेळू शकतात. एका चेंडूवर कदाचित एकाच प्रकारचा शॉट उत्तम प्रकारे ते खेळू शकतात. जरी त्यांना अनेक शॉट्स खेळता येत नसतील तरीही तो एकच शॉट जे ते सर्वोत्तमरित्या खेळतात तोच शॉट म्हणजे त्यांना मिळालेली ईश्वरी देणगी असते, पण त्यांना हेच कळत नाही. किंबहुना, अशा खेळाडूंना एकच शॉट सर्वोत्तम येत असल्याने तो शॉट ते पूर्णपणे एकाग्रतेने आणि मनापासून खेळतात आणि याउलट ज्याला अनेक शॉट्स येतात, तो कदाचित ऐनवेळी कोणता शॉट खेळायचा हे न कळून गोंधळून जाऊन संपूर्ण खेळाची वाट लावू शकतो.

जीवनातही हेच आहे.. तुम्हाला जर असं वाटत असेल की समोरच्याकडे अनेक पर्याय आहेत आणि तुमच्याकडे एकच आणि त्यामुळे जर तुम्ही खंतावत असाल तर लक्षात घ्या, कदाचित ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटतंय तेच तुमच्यासाठी वरदान असू शकतं. तोच पर्याय सर्वशक्तिनिशी हस्तगत करा आणि त्याच संधीचं सोनं करा... बघा, तुम्हाला नंतर कधीही पश्चात्ताप करावा लागणार नाही !

- हर्षा भोगले, (सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक)