कल्पना करा की २००८ साल चालू आहे. IPL चे पाहिले वर्ष आहे.



महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा हे खेळाडू नसून शेअरमार्केट मधील स्टॉक्स आहेत.

आणि तुम्हाला त्यांच्यापैकी एका स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची आहे.

============================
*MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!*
*संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास*
*आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0*
*Free | Online | Marathi | Live*

*93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा -* https://salil.pro/MBA
============================

तर तुम्ही कोणता स्टॉक निवडणार आणि का ?

निर्णय घेणे तुम्हाला सोपे जावे म्हणून या सर्व खेळाडूंसाठी २००८ मधील IPL मधील त्या त्या संघानी मोजलेली किमंत (Stock Price) सांगतो.

महेंद्रसिंग धोनी - 6 cr

विराट कोहली - 12 Lakh

रोहित शर्मा - 4.8 cr

दिनेश कार्तिक - 2.1 cr

रवींद्र जाडेजा - 10 lakh

पुढे वाचण्यापूर्वी एक गुंतवणूकदार म्हणून यापैकी कोणता शेअर तुम्ही विकत घेणार याचा विचार करा. तुमचे उत्तर ठरले की पुढे वाचा….

-

-

-

-

-

-


-

चला आता तुमचे उत्तर ठरले आहे असे मी समजतो. आता या खेळाडूंना १६ वर्षांनंतर मिळालेली IPL Salary म्हणजे २०२४ ची आकडेवारी पाहूया. थोडक्यात तुम्ही निवडलेला शेअर किती वाढला आहे ते पाहूया.

(लेखापुरता IPL salary गृहीत धरली आहे. प्रत्यक्षात जाहिराती, स्पॉन्सरशिप आणि पार्टनरशिप मधून त्यांची कमाई वेगळी असू शकते. आता सोपं करण्यासाठी केवळ IPL मध्ये त्यांना मिळालेली बोली (IPL Salary) धरूया.)

महेंद्रसिंग धोनी -
2008 - 6 cr
2024 - 12 cr

विराट कोहली -
2008 - 12 Lakh
2024 - 15 cr

रोहित शर्मा -
2008 - 4.8 cr
2024 - 16 cr

दिनेश कार्तिक -
2008 - 2.1 cr
2024 - 5.5 cr

रवींद्र जाडेजा -
2008 - 10 lakh
2024 - 16 cr

सगळ्यात जास्त वाढ कोणत्या शेअर मध्ये दिसली ? तुम्ही निवडलेला शेअर मनाप्रमाणे वाढलेला दिसला का ?

प्रत्येक शेअरची वार्षिक दरवाढ (CAGR) पाहूया -

महेंद्रसिंग धोनी - 4.43%
विराट कोहली - 35.22%
रोहित शर्मा - 7.82%
दिनेश कार्तिक - 6.20%
रवींद्र जाडेजा - 37.33%

IPL मधील सर्वात भरवशाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी या शेअरची वाढ FD च्या दरापेक्षा कमी झाली आहे.

विराट कोहली या २००८ मधील नवख्या पण आशादायक खेळाडूने ३५% वार्षिक अशी भरघोस दरवाढ नोंदवली आहे.

रोहित शर्मा या तेव्हाच्या नवख्या पण धडाडीच्या फलंदाजाने सुरुवात तर चांगली केली होती पण पुढे म्हणावी तशी वाढ नोंदवलेली नाही.

दिनेश कार्तिक ची सुरुवात चांगली झाली मात्र सतत टीमच्या आतबाहेर असण्यामुळे त्याला म्हणावी तशी वाढ मिळाली नाही.

रवींद्र जाडेजा सुरुवातीला एकदम नवखा खेळाडू होता , संघात त्याची जागा गोलंदाज म्हणून होती पण प्रयत्नपूर्वक तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू बनला. आणि टीमसाठीचे त्याचे मूल्य सतत वाढवत नेले त्यामुळे स्वतःचीही किंमत वाढवत नेली. या यादीमधील इतर खेळाडूंपेक्षा सर्वाधिक CAGR वाढ नोंदवत तो एक मल्टिबॅगर खेळाडू बनला.

तर मित्रहो, सांगायचा मुद्दा हा की कोणता स्टॉक किती वाढेल हे कोणीही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. मोठे चांगले (Blue Chip large Cap) स्टॉक फार वाढतील असे नाही. Growth Stocks वेगाने वाढले तरी ते सातत्याने वाढतील का सांगता येत नाही. आणि मल्टिबॅगर म्हणून ज्यांच्यावर विश्वास ठेवू ते सर्वच लहान स्टॉक वाढतील हे ही सांगता येत नाही.

आणि तरीही वरील सर्व खेळाडू २००८ ते २०२४ पर्यंत खेळले म्हणून खूप Valuable बनले. एवढ्या आव्हानात्मक स्पर्धेत “दीर्घकाळ टिकून राहणे” हेच त्यांचे सगळ्यात मोठे यश आहे.

गुंतवणूकदार म्हणून आपल्याला यापासून काय शिकता येईल ?

▪️Diversified Portfolio-

कोण्या एका जबरदस्त स्टॉकवर पैसे लावणे योग्य नाही. पोर्टफोलिओ आपल्याला या धोक्यापासून वाचवतो. आणि पोर्टफोलिओ बॅलन्सड असेल (Mix of Large cap, Mid Cap, Small Cap, Value & Growth) तरच तो गुंतवणूकदाराला सर्वाधिक फायदा मिळवून देऊ शकतो.

▪️Consistency of Performance

या लेखापुरता आपण १६ वर्षांचा point to point डेटा पहिला. प्रत्यक्षात दर वर्षीचा प्रत्येक स्टॉकचा परफॉर्मन्स पहिला तर प्रत्येक वेळी सर्वाधिक कमाई केलेले शेअर्स वेगळे असतात हे लक्षात येईल. एका वर्षाचा परफॉर्मन्स बघून त्यात गुंतवणूक केली तर त्याच परफॉर्मन्सची पुनरावृत्ती पाहायला मिळेल असे नाही. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये फक्त वाढ न बघता , वाढीतील सातत्य पाहणे अधिक महत्वाचे ठरते !

▪️Risk Analysis

सुरुवातीला भरवशाचे वाटलेले कितीतरी खेळाडू IPL च्या ३-४ हंगामांनंतर दिसेनासे झाले. काहींचा परफॉर्मन्स खराब होता, काहींना दुखापतीने ग्रासले तर काहींचे केवळ नशीब खराब म्हणून निवडच झाली नाही. आपल्या पोर्टफोलिओ मधील काही शेअर्स सोबत पण हेच होऊ शकते. म्हणून शेअरच्या किमतीचा अभ्यास करण्याइतकाच त्यामागील कंपनीचा (Fundamental) अभ्यास करणे देखील आवश्यक ठरते.

▪️Market Conditions

समजा IPL जेवढी चालली तेवढी चाललीच नसती किंवा काही कारणाने IPL चे अर्थकारण गडबडले असते किंवा एखादी टीम बॅन झाली असती तर आपण निवडलेला खेळाडू चांगला असूनही नुकसान झाले असते. म्हणजेच आपल्या गुंतवणुकीला बाहेरील परिस्थीचा फायदा/तोटा होऊ शकतो याची जाणीव ठेवून हुशार गुंतवणूकदाराने शेअर बाजाराबाहेरही गुंतवणूक केली पाहिजे. उदा. रिअल इस्टेट, सोने, debt म्युच्यअल फंड इत्यादी.
IPL ची फायनल कालच संपली आहे. महाराष्ट्रात निवडणुका पण संपल्याच आहेत. आता मोकळा वेळ मिळाला असेल आणि चर्चेचे आवडते विषय संपले असतील….तर जरा गंभीरपणे “पोर्टफोलिओ ऍनालिसिस” करायला घेऊया ! नेटभेटचे फेसबुक पेज, युट्युब चॅनेल आणि व्हाट्सअँप चॅनेल मध्ये याबद्दल बरच शिकायला मिळेल. तुम्हाला फक्त follow करायचं आहे ! कराल ना ?

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !



Salil Chaudhary
A California-based travel writer, lover of food, oceans, and nature.

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy