There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
वाटाघाटीतील माणुसकी : रॉजर फिशरचा संदेश
अमेरिका आणि रशिया यांच्यातील शितयुध्द इतके शिगेला पोहोचले होते की दोन्हीपैकी कोणताही देश कधीही अणुहल्ला करू शकतो अशी अवस्था होती. दोन्ही बाजूंच्या राष्ट्रप्रमुखांना फक्त एकदा मंजुरी द्यायची होती...दोन्ही बाजूंचे सैन्य अणुबॉंब लादलेले मिसाईल डागण्यासाठी बटणावर बोट ठेवून तयारच होते.
किती संहार होईल, किती निरपराध माणसे एका क्षणात जाळून खाक होतील याची कोणालाही कल्पना नव्हती.
त्याचवेळी रॉजर फिशर यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना एक प्रपोजल दिले.
रॉजर फिशर हे "हार्वर्ड निगोशिएशन प्रोजेक्ट"चे संचालक होते. Negotiation वाटाघाटींचे ते तज्ज्ञ होते. फिशर यांनी द्वितीय महायुद्धात सैनिक म्हणून सहभाग घेतला होता. त्यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात खटले लढवले होते, हार्वर्ड विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक म्हणून काम करत होते.
त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ते शांततेसाठी आणि तडजोडीच्या मार्गाने समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत राहिले.
त्यांनी १९७९ मध्ये इस्रायल–इजिप्त शांतता करार घडवून आणणाऱ्या परिषदेत भाग घेतला, १९८१ मध्ये इराणमध्ये पकडलेल्या अमेरिकन बंधकांच्या सुटकेच्या चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावली आणि नंतर दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद (अपार्थाइड) संपवण्यासाठी थेट प्रयत्न केले.
त्यांनी एक विचित्र प्रपोजल अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दिले होते. त्यावेळी अणुहल्ला करण्यासाठीचे कोड एका बॅग मध्ये असत. आणि एक माणूस सतत ती बॅग घेऊन राष्ट्राध्यक्षांच्या सोबत असे. कधी आवश्यकता भासलीच तर राष्ट्राध्यक्षांना त्वरित अणुहल्ल्याचा निर्णय घेता यावा यासाठी तशी सोया केली होती.
फिशर यांनी सूचना केली की हे कोड एका छोट्या कॅप्सूल मध्ये टाकून ती कॅप्सूल एका व्यक्तीच्या (Volunteer) छातीमध्ये प्लांट करायची. आणि त्याच्याजवळील बॅगेमध्ये एक सुरा ठेवायचा. जर राष्ट्रप्रमुखांना हजारो निरपराध माणसांना मारणाऱ्या अणुबॉम्ब हल्ल्याचा निर्णय घ्यायचाच असेल तर पहिल्यांदा त्यांना स्वतःच्या हाताने एका माणसाला ठार करूनच त्याच्या छातीतून अणुहल्ल्याचे कोड मिळवावे लागतील.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/Ip4ab5E7gGU52GQS3uC7pq
येथे क्लिक करा.
================
हजारो किलोमीटर दूर असलेल्या लोकांच्या मृत्यूचे आदेश देताना राष्ट्राध्यक्षांनी स्वतः मृत्यू काय ते स्वतःच्या डोळ्यांनी पहिले पाहिजे.
अर्थातच पेंटागॉन मधील अधिकाऱ्यांनी ही सूचना धुडकावून लावली. ते म्हणाले असे झाले तर राष्ट्राध्यक्ष कधीही अणुहल्ल्याचा आदेश देणार नाहीत. त्यांना राष्ट्राध्यक्षांनी लाखो लोकांच्या मृत्यूचा आदेश दिलेला चालणार होता. पण एका ओळखीच्या व्यक्तीला स्वतःच्या हाताने मारलेले चालणार नव्हते. फिशर यांचा उद्देश स्पष्ट होता: अणुहल्ला हा केवळ 'बटण दाबणे' किंवा 'कोड वाचणे' इतका अमूर्त (abstract) आणि यांत्रिक नसावा. तो राष्ट्राध्यक्षांसाठी वास्तव, व्यक्तिगत आणि अत्यंत वेदनादायक असावा, कारण तो लाखो लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे.
मित्रांनो, मानवी स्वभाव हा असा असतो. दूर असलेले मोठे दुःख आपल्याला अमूर्त वाटते, पण जवळच्या व्यक्तीचे छोटेसे कष्टही आपल्याला खोलवर जाणवतात.
वाटाघाटीचे यश केवळ आकडे, नियम यावर अवलंबून नसते. ते आपल्या निर्णयांचे प्रत्यक्ष मानवी परिणाम किती गंभीरपणे पाहतो, यावर अवलंबून असते.
हाच धडा प्रत्येक वाटाघाटीत लागू होतो: जेव्हा तुम्ही कोणतीही वाटाघाटी करता—मग ती आंतरराष्ट्रीय शांतता असो, कंपनीतील करार असो किंवा घरातला निर्णय—तेव्हा तुमच्या निर्णयांचे परिणाम दुसऱ्या व्यक्तीवर (किंवा लोकांच्या समूहांवर) काय होतील, हे फक्त आकडेवारी म्हणून पाहू नका. त्या परिणामांना एक मानवी चेहरा द्या.
राष्ट्राध्यक्षांना एका माणसाला स्वतःच्या हाताने मारण्याची कल्पना जितकी असह्य वाटली, तितकीच असह्यता आपल्याला आपल्या वाटाघाटीतील चुकीच्या किंवा कठोर निर्णयांबद्दल वाटली पाहिजे, ज्यामुळे दुसऱ्या पक्षाचे मोठे नुकसान होणार असेल.
फिशरची कल्पना आपल्याला हे शिकवते की प्रभावी वाटाघाटीसाठी सहानुभूती (Empathy) आवश्यक आहे. जेव्हा आपण दुसऱ्या पक्षाला केवळ 'प्रतिस्पर्धी' किंवा 'अडथळा' न पाहता एक 'व्यक्ती' म्हणून पाहतो, तेव्हा रचनात्मक तोडगा काढण्याची शक्यता वाढते. जेव्हा तुम्ही 'बटण' (कोड) आणि 'बळी' (माणूस) यांच्यात थेट संबंध जोडता, तेव्हा निर्णय बदलतो.
प्रत्येक निर्णयाला मानवी चेहरा द्या, आणि तुमची वाटाघाटीची दिशा आपोआप शांतता आणि न्यायाकडे वळेल.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !