There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आजकाल खुप लोकं जास्त विचार करण्याच्या समस्येला सामोरे जातात. या लोकांच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत असतो तो म्हणजे हे कसे थांबवता येईल. हाच प्रश्न सारखा त्यांच्या मनात का येतो या मागे सुध्दा काही कारणं आहेत.
जास्त विचार करण्याची सवय माणसाच्या आयुष्यातील आनंद संपवून टाकते. वैज्ञानिक दृष्ट्या ही वस्तूस्थिती आहे की जे लोकं साधारणपणे विचार करतात त्यांचा मेंदू चांगल्याप्रकारे काम करतो याउलट जे लोकं जास्त विचार करतात त्यांचा IQ सतत कमी होत राहतो. विद्यार्थी असोत किंवा जॉब करणारे प्रोफेशनल्स आपल्यातले खुप जण या समस्येतून जात असतात. एखाद्या माणसाला काहीही विचार न करता शांत राहणे खुप कठीण आहे कारण कसले ना कसले विचार आपल्या मनात येतच राहतात.
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो आणि अचानक दूसरा विचार आपल्या मनात येतो तिकडे लक्ष जातच असताना परत तिसरा विचार मनात येतो हे असंच चालत राहतं आणि याचा मनावर परिणाम होतो. जर विद्यार्थी असाल तर गुणांचं टेन्शन, जर जॉब करणारे असाल तर कामाचे टेन्शन या अशा गोष्टींंमुळे आपले मन नेहमी कशाचा ना कशाचा विचार करतच असते. जास्त विचार करण्याची सवय आपल्याला कमजोर आणि सुखी जीवन संपवणारी बनवते. स्टँम्फोर्ड ने केलेल्या अभ्यासात हे आढळून आले आहे की जास्त विचार करण्याची सवय मेंदूची क्रियेटीव्हीटी कमी करते आणि मनाला कमकुवत बनवते.
जास्त विचार करणे आपल्या न्युरॉन्स च्या कार्यक्षमतेवर सुध्दा परिणाम करते. वैज्ञानिक संशोधनानुसार माणसाच्या मनात जवळपास ७०हजार विचार येतात त्यातले ९५% विचार काहीच कामाचे नसतात. खुपवेळा आपल्याबरोबर असं होतं की समस्येवर उपाय एकदम सोपा असतो पण आपण त्याच्यावर इतका विचार करतो की समस्या अजूनच वाढवून बसतो.
१. जाणीवेतून जास्त विचार करण्याची सवय कशी थांबवू शकतो.
आपल्या डोक्यामध्ये काय चालू आहे याची जाणीव असणे फार महत्वाचे आहे. हे भलेही खुप सोपे वाटत असेल. पण आपल्या हे लक्षात सुध्दा येत नाही की आपल्या डोक्यात काही नकारात्मक विचार सुध्दा चालू असतात आणि आपण त्यांच्याकडे सोयिस्कररित्या दूर्लक्ष करुन असे वावरतो जसे सगळे ठिक आहे. तुम्ही जास्त विचार करत असाल, नकारात्मक विचार करत असाल तर प्रथम ते मान्य करा. कारण आपण जो पर्यंत एखादी गोष्ट मान्य करत नाही तोपर्यंत आपण ती बदलू शकत नाही. जेव्हा आपण आपल्या मनाला जे होत आहे त्याची जाणीव करुन देतो , हे मान्य करतो की ते योग्य नाही तेव्हाच बदलाला खरी सुरुवार होते.
तुम्ही एखादी डायरी जवळ बाळगू शकता. जेव्हा जो विचार मनात येईल लिहून काढा. सगळेच नाही लिहता आले तरी चालतील, पण जे लक्षात येणार्या सारखे आहेत ते लिहा मग ते नकारात्मक असोत किंवा सकारात्मक याने फरक पडत नाही. यामूळे आपल्याला आपल्या मनात काय चालू आहे हे समजण्यासाठी मदत होईल, त्यानंतर ते बदलणं सोपं होऊन जाईल कारण आता तुम्हाला माहीत आहे कि आपल्या मनात नक्की काय चालू आहे.
२. मेडीटेशन करुन जास्त विचार करणे कसे थांबवता येईल.
मेडीटेशन करणे आरोग्यासाठी चांगले आहे आणि ते केलेच पाहीजे फक्त म्हणून मेडीटेशन करु नका. मेडीटेशन करा कारण आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी हे खरच मदत करते. जेव्हा आपण आपल्या मनाला लक्षकेंद्रीत करण्यासाठी टेक्निक्स वापरुन प्रशिक्षित करतो (जसे १० मिनीटे श्वासावर लक्षकेंद्रीत करणे.) मन भरकटत असेल तर त्याला पुन्हा मागे आणतो तेव्हा हळूहळू आपण आपल्या मनावर ताबा मिळवतो.
लक्षात ठेवा जर आपण आपल्या मनावर ताबा मिळवला नाही, तर आपले मनआपल्यावर ताबा मिळवेल आणि हे फक्त आपल्या मानसिक आरोग्यावरच परिणाम करणार नाही तर संपूर्ण आयुष्यावर परिणाम करेल. त्यामूळे मनाला तब्यात ठेवा आणि मेडीटेशन यावर खरच काम करते.
जर पहील्या काही दिवसात लक्षकेंद्रीत करणे जमले नाही तर निराश होऊ नका, नियबध्द व्हा आणि रोज मेडीटेशन करत रहा. हा जास्त विचार करण्याच्या सवयीला सोडवणारा खात्रीशिर मार्ग आहे.
३. नेहमीच्या कामांवर लक्षकेंद्रीत करा.
लक्षकेंद्रीत करण्याचा दूसरा मार्ग म्हणजे जे काम करताय त्यामध्ये आपले पूर्ण लक्षकेंद्रीत करा. जेव्हा तुम्ही आता जे काम करताय त्याकडे लक्ष देता आणि काय काम करताय याची जाणीव ठेवून मनातील विचारांच्या जाळ्यात अडकत नाही तेव्हा तुम्ही खरे मनावर ताबा मिळवण्यासाठी समर्थ होता.
जेव्हा बाहेर फिरायला जाता तेव्हा हवेत लांब श्वास घ्या आणि तुमचे पूर्ण लक्ष वतावरणावर केंद्रीत करा. स्वतःला डोक्यातल्या विचांमध्ये अडकवून भरकटलेल्या सारखे फिरु देऊ नका. जरी तुम्ही काहीतरी साधे काम करत असाल जसे व्हिडीओ बघणे, तेव्हा खरच तो व्हिडीओ बघा मनातल्या गोंधळाला विराम द्या.
जेव्हा तुम्ही हे रोज कराल तेव्हा तुम्हाला याची सवय होईल आणि ही जास्त विचार करण्याची सवय कधी जाईल कळणार सुध्दा नाही किंवा कधीकधी विचार चालू असताना सुध्दा तुम्ही तुमच्या कामावर लक्ष देऊ शकाल.
४. स्वतःला स्वतःच्या विचारांपासून वेगळे करा.
हे काम तुम्ही मनाला प्रशिक्षित करत असतानाच करु शकता. तुमचे विचार तुम्हाला हानी तेव्हाच पोहचवू शकतात जेव्हा आपण त्यांना आपल्या आयुष्याशी जोडायला लागतो आणि आपलं आयुष्य आपल्याविचारांचं प्रतिरुप समजायला लागतो. तुमच्या विचारांचे नियंत्रण तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते बदलू शकता याची जाणीव जेव्हा तुम्ही स्वतःला करुन देता तेव्हा तुम्ही तुमच्या मनावर प्रचंड शक्ती मिळवता.
तुम्ही तुमच्या विचारांच्या मदतीने कार्यक्षम होऊ शकता पण जर तुम्ही तुमच्या विचांरांच्या ताब्यात आलात तर मात्र तुम्हाला जसे आयुष्य हवे आहे तसे मिळवणे कठीण होईल. त्यामुळे तुमच्या विचारांना योग्य दिशा देणे आणि स्वतःच्या विचारांवर ताबा मिळवणे महत्त्वाचे आहे.
५. सकारात्मकतेतून जास्त विचार करण्याच्या सवयीपासून कसे दूर राहता येईल.
माणसं जास्त विचार करतात कारण गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या तर कसा अनुभव येईल आणि तेच विचार सतत समोर ठेवण्याऐवजी ते गोष्टी विरुध्द दिशेला जातील याला घाबरतात आणि काळजी करायला लागतात.
जास्त विचार केल्याने आपल्याला धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा ते नकारत्मक असतील इथे मूळ प्रश्न हा आहे की विचारांची दिशा नकारत्मकतेकडून सकारात्मकतेकडे कशी वळवावी. सकारात्मक विचार करणे जास्त विचार करण्याची सवय सुध्दा कमी करु शकते.
६. वर्तमानावर लक्ष केंद्रीत करा.
जास्त विचार करण्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही, आणि सारखा सारखा त्याचा विचार केल्याने त्यामध्ये काहीही बदल होणार नाहीत. आपल्या भूतकाळातील चुकांतून शिकणे आणि स्वत:ची प्रगतीकरणे फार महत्त्वाचे आहे पण त्याच चुका परत परत आठवून आणि घडून गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करुन काहीच हाती लागणार नाही.
जेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की भूतकाळापासून जे शिकायचं ते तुम्ही शिकला आहात
तेव्हा भूतकाळातील आठवणींना मागेच सोडा. जेव्हा कधीही त्या आठवणी जाग्या होतील तेव्हा मन दूसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. तुमचे पूर्ण लक्ष वर्तमानाकडे द्या, जो तुम्हाला हवा तसा बदलण्याची तुमच्याकडे ताकद आहे.
लक्षात ठेवा जास्त विचार करणे हे नकारात्मक विचारांबद्दल असते आणि त्यामुळे ही वाईट सवय आहे. त्यामुळे वरती दिलेल्या टीप्स नक्की वापरुन बघा. तुम्ही नक्की तुमचे विचार समजायला लागाल, त्यांना तुमच्याप्रमाणे बदलाल आणि स्वतःला या मनातील युध्दापासून नक्की वेगळे करु शकाल.
================
"विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत !
आकर्षणाचा सिद्धांत ( Law Of Attraction) चा बेसिक कोर्स मोफत शिकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://learn.netbhet.com/s/store/courses/description/Law-Of-attraction-Marathi-training
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com