There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
एका सर्वसामान्य काम करणार्या व्यक्तीला आणि एका यशस्वी माणसाला समोरासमोर उभे केले. तर फरक तुमच्या सहज लक्षात येईल की आज ते जिथे आहेत तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी किती ज्ञान आत्मसात केले आहे.
आपल्याकडे नवीन गोष्टी शिकण्यासाठी दिवसातला बराचसा वेळ जरी असला तरीही आपला शिकण्याचा वेगच आपण या वेळात किती शिकू शकतो हे ठरवतो. आपल्याला काहीही शिकायचं असो मग ते नवीन भाषा शिकणे असो किंवा नवीन बिझनेस कसा सुरु करावा याबद्दल शिकणे असो, जो माणूस वेगाने शिकू शकतो त्याचे स्थान नेहमीच थोडे वरचढ असते. मग आपल्याला सुध्दा नवीन गोष्टी वेगाने शिकायच्या असतील तर नक्की काय करावे लागेल? हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
१. एकाच वेळी अनेक कामे करणे टाळा.
एकाच वेळी अनेक कामांना आपले लक्ष पुरवल्याने आपण आत्मसात केलेली नवीन माहीती मेंदूच्या चूकीच्या भागात जाते. एका कामावरुन दूसर्या कामाकडे असे सारखे सारखे केल्यास आपण आपली उत्पादक क्षमता वाया घालवतो कारण आपला मेंदू एकाच वेळी अनेक गोष्टींकडे सारखाच लक्ष पुरवू शकत नाही.
२. नविन मार्ग बनवू नका.
या मुद्द्याचा इथे अर्थ असा आहे की आपण जेव्हा नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा नवीन शिकण्याच्या पध्दतीचा अवलंब करु नका जी पध्दत आत्मसात करण्यातच आपला वेळ जाईल आणि मुख्य गोष्टीकडे जास्त लक्ष पुरवता येणार नाही. त्यापेक्षा अशा एखाद्या व्यक्तीला शोधा जी व्यक्ती तुम्ही शिकत असलेल्या कौशल्यामध्ये अगोदरच मास्टर असेल त्यांच्याशी बोला आणि त्यांनी ते कौशल्य शिकण्यासाठी वापरलेल्या मार्गाचा अवलंब करा.असे केल्याने नवीन कौशल्य लवकर शिकण्यासाठी तुम्हाला मदत होईल.
३. तुमचे मन भटकू द्या
आपल्या मनाला एकांतात भटकण्यासाठी थोडा वेळ द्या. असे छोटे छोटे ब्रेक्स मेंदूला आराम देण्यासाठी आणि क्रियेटीव्ह ब्लॉक्स दूर करण्यासाठी मदत करतात. यासाठी तुम्ही तुमचे आवडते गाणे ऐकू शकता किंवा शांत वातावरणात बाहेर चालायला जाऊ शकता किंवा नेहमी पेक्षा थोड्या जास्त वेळाची आंघोळ घेऊ शकता.
४. सराव, सराव, सराव.....
नवीन कौशल्य शिकण्यासाठी तुम्ही त्याचा जितका जास्त सराव कराल तितकेच त्या गोष्टीचे तुमच्या मनात मजबूतीकरण होईल. आणि मनात एखादी गोष्ट मजबूत झाली की ती करण्यासाठी आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत आपण आपल्या नकळतपणे सुध्दा ती गोष्ट कौशल्यपूर्ण करु शकतो. हीच सरावाची ताकद आहे. कोणतीही नवीन गोष्ट लवकर शिकण्यासाठी ती सतत आपल्या सरावात आणणे फार महत्त्वाचे आहे.
५. नवीन शिकलेल्या गोष्टी पहिल्या शिकलेल्या गोष्टींशी जोडून बघा.
आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकतो तेव्हा ती गोष्ट आपण पूर्वी शिकलेल्या एखाद्या गोष्टीशी जोडून पहा. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा जून्या गोष्टीच्या संबंधामुळे नवीन गोष्ट लक्षात ठेवणे सोपे होते. अगोदरच तुमच्या मनात घर करुन असलेल्या गोष्टीशी नवीन गोष्ट जोडल्याने आपण जेव्हा नवीन शिकलेली गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जून्या संदर्भामुळे ती आपल्या पटकन लक्षात येते.
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com