वाईट मूड लगेच बदलण्यासाठी काय करावे?

खुप वेळ आपला मूड बिघडतो कधी कधी त्यामागे तसं कारणही असतं पण खुप वेळ असा काहीही कारण नसताना सुध्दा मूड बिघडतो. मूड बिघडल्यामुळे आपल्याला कशातच मन लागत नाही आणि आपली सगळी महत्वाची कामं तिथेच राहतात.म्हणूनच आज मी तुम्हाला काही असे मार्ग सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही या मूड मधून लगेच मुक्ति मिळवू शकता आणि तुमची सर्व कामं आनंदाने आणि मन लावून करु शकता.

1. गाणी ऐकत ऐकत बाहेर चालण्यासाठी जा

जेव्हा कधी तुम्हाला कशाचा कंटाळा आला असेल किंवा वाईट वाटत असेल तेव्हा बाहेर चालायला जाणे कधीही उत्तम, याला जोड म्हणून तुम्ही गाणी सुध्दा ऐकू शकता फक्त अट इतकीच जे गाण तुम्ही ऐकाल ते एखादं दु:खी गाण नसावं. चालताना चांगल्या गाण्याची साथ असेल तर तुमचा मुड लगेच बदलायला लागतो आणि तुम्हाला खुप चांगलं वाटतं. याच कारण या कृतीमुळे तुमचा रक्त प्रवाह बदलतो आणि हा बदलेला रक्त प्रवाह तुमचा मूड चांगला करण्यासाठी मदत करतो.

2. पायर्‍यांवरती वर या आणि खाली जा.

जेव्हा कधीही तुम्हाला बाहेर चालायला जाणे शक्य नसेल तेव्हा पायर्‍यांवरती वर जा आणि खाली या ही कृती सारखी सारखी करा. तुम्हाला तसाच अनुभव येईल जसा बाहेर चालायला गेल्यामुळे येतो. तुमचा रक्त प्रवाह वाढेल आणि तुम्हाला एकदम छान वाटेल.

3. चहा, कॉफी किंवा ज्यूस प्या.

ही सिध्द वस्तूस्थिती आहे की चहा किंवा कॉफी मध्ये उत्तेजक द्रव्य असतात (कॉफीन) त्यामुळे ते प्यायल्याने तुम्हाला आराम मिळतो. जेव्हा कधी तुमचा मुड चांगला नसेल तेव्हा घरामध्ये चहा किंवा कॉफी जे उपलब्ध असेल आणि जे तुम्हाला आवडत असेल ते प्या तुम्हाला एकदम आरामदायी वाटेल.
जर तुम्हाला चहा किंवा कॉफी आवडत नसेल तर तुम्ही फ्रेश ज्यूस पिऊ शकता. सारखेच परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळतील शिवाय ज्युस आरोग्याच्या दृष्टीने सुध्दा चांगला आहे.

4. २ मिनीटांचा एखादा मजेदार व्हीडीओ बघा.

जेव्हा तुम्हाला अस्वस्थ किंवा वाईट वाटत असेल १ किंवा २ मिनीटांचा मजेदार व्हिडीओ बघा त्यापेक्षा मोठा व्हिडीओ नको. हसायला लावणारा व्हिडीओ आपला तणाव कमी करतो. त्यामुळे आराम वाटतो आणि विचारांमध्ये सकारात्मकता येते त्यानंतर तुम्ही तुमचे आवडते काम करायला सुरुवात शकता.

5. दुसर्‍यांच्या समस्यांना आपल्या समस्यांशी जोडण्याचा प्रयत्न करा.

खुप वेळा आपण ज्या वाईट परिस्थितीमधून जात असतो तेच आपल्या वाईट मनस्थितीचे कारण असते. जेव्हा तुम्ही तुमच्या अडचणींची तुलना दुसर्‍यांच्या मोठ्या अडचणींशी कराल तेव्हा तुम्हाला तुम्हाला तुमच्या अडचणी क्षुल्लक वाटायला लागतील आणि ही विचारधारा निर्माण होईल की जर ते त्यांच्या मोठ्या अडचणींचा सामना करु शकतात तर तुम्ही का नाही? तुमचे हेच विचार तुमचा मूड चांगला करतील आणि तुमच्यामध्ये सकारात्मकता येईल.

6. अशा माणसांप्रती कृतज्ञता व्यक्त करा ज्यांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मदत केली आहे.

अशा माणसांची यादी बनवा ज्यांनी तुम्हाला तुमच्या कठीण काळात मदत केली आहे. त्यांनी केलेल्या मदतीसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा तुम्ही एखाद्याचे मनापासून कौतूक करता तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात सकारात्मक उर्जा मिळते.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
*नेटभेट ई -लर्निंग सोल्युशन्स*
मातृभाषेतुन शिकूया , प्रगती करूया !
www.netbhet.com
Learn.netbhet.com