जुनी/वापरलेली वाहने यावर GST 12% वरून आता 18% करण्यात आला आहे.
🔵 GST कोणाला भरावा लागतो?
फक्त नोंदणीकृत विक्रेते (जसे की कार डीलर किंवा व्यवसाय) यांना कार त्यांच्या घसरलेल्या मूल्यापेक्षा (Depriciation Value - वापरामुळे कमी झालेले मूल्य) जास्त किमतीत विकल्यास GST भरावा लागतो.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
================
🔵 GST कोणाला भरावा लागत नाही?
जर तुम्ही वैयक्तिकरित्या तुमची कार दुसऱ्या व्यक्तीला विकत असाल, तर GST लागू होत नाही.
जर कार घसरलेल्या मूल्यापेक्षा कमी किमतीत विकली गेली आणि नफा निगेटिव्ह असेल, तर GST लागू होत नाही.
ही नियमावली फक्त नफा मार्जिनवर GST लागू करते! उदाहरणासाठी:
खरेदी मूल्य = ₹18 लाख
घसरलेले मूल्य = ₹12 लाख
विक्री किंमत = ₹15 लाख
नफा = ₹3 लाख
GST = ₹54,000 (₹3 लाखाच्या 18%).
तुमच्या मते वापरलेल्या गाड्यांवरील GST वाढ योग्य आहे का?
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !