वाढीची मानसिकता (ग्रोथ माइंडसेट)

वाढीची मानसिकता म्हणजेच ग्रोथ माईंडसेट या शब्दाचा संदर्भ यशाशी किंवा प्रगतीशी असावा असं तुम्हाला वाटतं का? जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ग्रोथ माइंडसेट कसा ठेवावा हे माहीत असलंच पाहिजे.कॅरोल ड्वेक हे संशोधक असं म्हणतात की माणसामध्ये दोन प्रकारच्या मानसिकता असतात एक निश्चित मानसिकता आणि एक वाढीची. ते पुढे म्हणतात की जे जे मोठे मोठे मार्गदर्शक, सी ई ओ आणि खेळाडू आहेत त्यांना हे अगोदरच माहीत असतं की मेंदूची ही एक साधीशी कल्पना कशाप्रकारे शिकण्यासाठी प्रेम आणि लवचिकता या मोठ्या यशाचा पाया असलेल्या दोन गोष्टी निर्माण करण्यास मदत करते.

यश हा सतत वाढीची मानसिकता ठेवण्याचा प्रवास आहे, जर तुम्ही ही मानसिकता सोडून दिली तर जास्त काळ यश टिकवणे कठीण आहे. कारण यश सतत वाढीची प्रगतीची मागणी करतं आणि जर ते पुरवण्यात तुम्ही कमी पडलात तर अपयश टाळता येणे कठीण आहे. वाढीची मानसिकता म्हणजेच ग्रोथ माइंडसेट कसा विकसित करावा हे आपण या लेखातील मुद्द्यांच्या मदतीने जाणून घेणार आहोत.

१. आपले कधीही पूर्ण शिकून होत नाही.

तुम्हाला कितीही गोष्टींचे ज्ञान असूदे, परंतु त्यापेक्षा अजून माहीत करुन घेणे कधीही चांगलेच. आपल्या मेंदूला सतत माहीतीचे खाद्य देत रहा आणि मेंदूची ज्ञानाची भूक वाढवत रहा. आपल्या ज्ञानात सतत केलेली वाढ ग्रोथ माइंडसेटसाठी पाठबळ देणारी ठरते. कारण यामुळे आपल्याला सतत ही जाणीव होत राहते की आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपल्याला माहीत नसलेल्या ज्ञानापेक्षा कमी आहे.

ग्रोथ माइंडसेट असणारे शास्त्रज्ञ स्वतःचं संपूर्ण आयुष्य पणाला लावतात हे बघण्यासाठी की ज्याची त्यांना आशा होती ते खरच आहे किंवा करणे शक्य आहे का? आपण आज ज्या दर्जाचं आयुष्य जगतो आहोत ती अशा शास्त्रज्ञांचीच देण आहे. यामधला एकही शास्त्रज्ञ असा दावा कधीच करणार नाही की विज्ञान हा एकमात्र ज्ञानाचा स्त्रोत आहे.

२. ग्रोथ माइंडसेट साठी धोका पत्करा, ते त्याच्यासाठी गरजेचे आहे.


मौल्यवान गोष्टी मिळवणे इतके सोपे नसते. मी असं म्हटलं तर चूकीचं ठरणार नाही की ज्या गोष्टी मिळवणे कठीण असते त्या गोष्टी मौल्यवान असतात. कारण हीच गोष्ट त्यांना मौल्यवान बनवते. अशा कामांमध्ये अपयशाचा धोका नेहमीच असतो किंवा कधी कधी ते काम खुपच कठीण असेल तर आपल्या इतरही गोष्टी पणाला लागतात. पण मग धोका न पत्करुन काहीच न मिळवण्यामध्ये काय अर्थ आहे, यश हे कमवले जाते,मेहतीने बनवले जाते ते असेच काहीही न करता मिळत नाही.

आपण ज्या ज्या यशस्वी लोकांना आपले आदर्श मानतो त्या प्रत्येकाचा काही ना काही भूतकाळ असतो कदाचित आपण विचारही केला नसेल इतक्या कठीण परिस्थितीतून ते आले असावेत. यशा पर्यंत पोहोचण्याच्या या प्रवासात जर आपल्याला निराश न होता पुढे जायचे असेल तर नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे कि आपण एकतर आपल्याला जे हवे ते मिळवतो किंवा त्यातून काहीतरी शिकतो.

३. चूका या लाज आणण्यासाठी नसतात तर, आपल्या वाढीसाठी असतात.

प्रत्येक चूक हा असा अनुभव असतो जो आपल्याला कशाप्रकारे एखादी गोष्ट करु नये हे सांगतो. जर आपण ओळखू शकलो तर आपली प्रत्येक चूक हा आपल्याला शिकवणारा एक धडा आहे. हा माणसाचा मूळ स्वभाव किंवा मानसिकता आहे की माणून नेहमी चूका टाळण्याचा प्रयत्न करतो कारण आपण त्यामुळे समोर येणार्‍या परिणामांना घाबरतो. आणि आपली हिच भीती खर तर चुकांना कारण ठरते. चूका चूकून घडतात आणि जोपर्यंत आपण त्यातून धडा घेऊन पुन्हा तीच चूक करत नाही तोपर्यंत चूका होणे ठिक आहे.

४. प्रत्येक कठीण प्रसंग ही संधी असते.

आज काल प्रत्येक जण ऑनलाईन गेम खेळतो त्या गेममध्ये आपल्याला वेगवेगळ्या लेवल असतात ज्या पार करुन पुढे जायचे असते प्रत्येक लेवल पहिल्या लेवल पेक्षा कठीण असते पण जितकी जास्त लेवल कठीण ती पार करण्यामध्ये आपल्याला तेवढाच जास्त आनंद येतो. आपलं आयुष्य सुध्दा या गेम प्रमाणे आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अनेक संकटांना सामोरे जावे लागते. पण जेव्हा आपण निश्चयाने एखादे संकट पार करतो तेव्हा पुन्हा तेच संकट आपल्याला कठीण वाटत नाही. याउलट पुढचे संकट पार करण्याची उत्सुकता वाढते आणि बळ मिळते.

आपल्याला कदाचित अनोळखी लोकांशी बोलणे कठीण वाटत असेल पण जर आपण ते केले तर आपले संवाद कौशल्य सुधारु शकते. ग्रोथ माइंडसेट असणारी लोकं संकटांना आनंदाने स्विकारतात कारण त्यांच्यासाठी ती काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते. आणि एकदा तुम्ही त्यावर विजय मिळवला त्यानंतर ते कठीण राहतच नाही. जर तुमच्याकडे ग्रोथ माइंडसेट असेल तर संकट पार केल्यानंतर तुम्हाला त्या पुढचे कठीण संकट पार करण्याची प्रेरणा मिळते.

५. आडचणी साजर्‍या झाल्या पाहीजेत.

ग्रोथ माइंडसेट स्विकारण्याचा अजून एक मार्ग म्हणजे आपली आव्हाने, अडचणी साजर्‍या करा. यामगे एक साधे कारण आहे, की हि आव्हाने आपल्या व्यक्तिमत्वाला सुधारण्यासाठी, आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि आपले स्वतःविषयीचे मत ठळक करण्यासाठे असतात. पक्षी आपला आत्मविश्वास दाखवण्यासाठी आपले पंख अगदी रुंद पसरतात. माणसाचे मानसशास्त्र यापेक्षा वेगळे नाही आपण आपला आत्मविश्वास दाखवण्यासाठी भलेही पंख नाही
पसरु शकत. पण आपल्याकडे जर ग्रोथ माइंडसेट असेल तर फक्त आलेल्या संकटांनाच स्विकारु नका तर उठा आणि स्वतः अशी संकट शोधा जिथे तुम्ही स्वतःला अजून सुधारु शकता.

६. सोप्या गोष्टींमध्ये मजा नसते.

सोपे जगणे सोपे आहे. म्हणजेच आपल्या सवयीच्या वर्तुळातून बाहेर न पडता जगणे तसे सोपे आहे. पण ग्रोथ माइंडसेट असणार्‍या लोकांसाठी सोपे म्हणजे कंटाळवाणे असते. प्रयत्न केल्याशिवाय प्रगती होणे अशक्य आहे. खरं तर यश आणि आराम या दोन्ही विरुध्द गोष्टी आहेत. सहजता सोपी आहे पण निर्जिव असल्याप्रमाणे आहे आणि हीच भावना आपल्याला ग्रोथ माइंडसेट देते.


८. आपण परिपूर्ण नाही, कोणीही परिपूर्ण कधीच नसते.

स्वतःबद्दलच्या अपेक्षा वास्तववादी ठेवा. आपण माणूस आहोत सुपरह्युमन नाही आणि माणसांकडूनच चूका होतात. पण या चूकांतून शिकणे महत्त्वाचे. मेंदूवरती झालेल्या एका रिसर्च मध्ये असे सिध्द झाले आहे की आपली कृती आणि अनुभव नवीव न्युरॉन्सच्या वाढीसाठी आणि जून्या न्युरॉन्स ना एकत्रित करण्यासाठी मदत करतात. असे विद्यार्थी जे या गोष्टीवर विश्वास ठेवतात की आपण प्रयत्न केले तर मेंदूची आकलन क्षमता वाढू शकते त्यांना ते परीक्षेत चांगली कामगिरी करतात. हा विश्वासच त्यांना अजून प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा ठरतो.

परिपूर्ण न असण्यामध्ये सर्वात चांगली गोष्ट काही असेल तर ती म्हणजे आपण नेहमी आपल्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहतो. खर तर स्वत:ला परफेक्ट समजणेच मुळात आपण परफेक्ट नसल्याचे लक्षण आहे. ग्रोथ माइंडसेट ठेवायचा असेल तर आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण कितीही ज्ञान मिळवले तरीही प्रगतीला नेहमीच वाव असतो. आपण आज जिथे आहोत जसे आहोत त्यापेक्षाही अजून काहीतरी चांगले करु शकतो आणि त्यासाठी प्रयत्न करत राहणे यालाच ग्रोथ माइंडसेट ठेवणे असे म्हणतात.

९. परिणामांपेक्षा प्रयत्न महत्त्वाचे.

स्वत:ला नेहमी ही जाणीव करुन देत रहा कि यशाकडे वाटचाल करत असताना शेवटच्या परिणामांपेक्षा आपले प्रयत्न सर्वात जास्त महत्त्वाचे असतात. आपले सर्वात मोठे यश हे आपल्याला जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रयत्न करणे हे आहे. जर आपण आपल्याकडून यशापर्यंत पोहचण्यासाठी शक्य सर्व प्रयत्न केले असतील तर परिणाम काहीही असो आपण काहीच केले नाही या पश्चात्तापापासून तरी दूर रहायला मदत होते.


================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com


Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy