नमस्कार मित्रांनो,
नेटभेट तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. अशीच एक नवीन आणि सर्वांना उपयोगी ठरेल अशी सात दिवसांची मोफत ऑनलाइन योगा कार्यशाळा ! आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.
सध्याच्या काळात बाहेर फिरायला किंवा जॉगिंगला जाणे देखील शक्य नाहीये, अशावेळी घरूनच आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी आम्ही फिटनेस मास्टर ( पुणे) या संस्थेमार्फत एक 7 Days YOGA MasterClass पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देत आहोत.
1 October 2020 पासून दररोज सकाळी 6:30 ते 7:30 वाजता मराठी मधून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून आपण शिकणार आहोत.
यामध्ये अनेक व्यायाम प्रकार, डायटिंग बद्दलचे मार्गदर्शन, आपल्या शरीर रचनेनुसार योग्य व्यायाम अशा अनेक गोष्टी तर आपण योगा शिकणार आहोतच. त्यासोबत तज्ञांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळणार आहे.
या सात दिवसीय मोफत योगा मास्टर क्लासमध्ये आपण शरीर व मनाचे संतुलन कसे साधायचे याचे प्रशिक्षण दिले जाईल या बरोबरच आपण काय शिकाल?
1. विविध प्रकारची योगासने जी केल्याने ज्या लोकांना दैनंदिन कामकाज व उठबस करणे हा देखील एक वेदनादायक अनुभव असतो त्याच्या साठी उपाय म्हणून उपयुक्त ठरतील.
2.विशेषतः चुकीच्या शारीरिक कामकाज पद्धतीमुळे उदभवणारी कंबरदुखी , मानदुखी सारखी दुखणी निवारण होण्यासाठी उपयुक्त असणारी आसने.
3. कमकुवत पचनशक्ती जी सर्व आजाराचं मूळ कारण होवू शकते ती सुधारण्यासाठी उपयोगी असणारी आसने व काही प्राणायाम.
4. दैनंदिन जीवनातील आव्हानांना सामोरे जाताना उदभवणारे मानसिक आजार, जसे, निद्रानाश, ताण-तणाव, चिंता त्यामुळेच पुढे आजारात रूपांरीत होणारी डोकेदुखी (मायग्रेन) या सर्वां मधून मुक्त होण्यासाठी काही उपयुक्त असणारे प्राणायाम व मेडिटेशन.
हा ऑनलाईन मराठी लाईव्ह कोर्स नेटभेटच्या माध्यमातुन मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत हे माहिती शेअर करायला विसरू नका !
खूप खूप धन्यवाद !
Team Netbhet