There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
आपल्याला माहित आहेच की, जेव्हा काही हुशार लोक एकत्र येऊन एखाद्या विषयावर चर्चा किंवा वाद घालतात, तेव्हाच त्यातून सर्वोत्कृष्ट निर्णय उगम पावतात. इलॉन मस्कच्या xAI ने नेमकी हीच संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (AI) उतरवली आहे.
सोमवारी लॉन्च झालेला Grok 4.20 हा केवळ एक साधा अपडेट नाही, तर तो एका पूर्णपणे वेगळ्या 'आर्किटेक्चर'वर आधारित आहे. इथे तुमचे उत्तर फक्त एक AI तयार करत नाही, तर चार विशेष 'एजंट्स' एकाच वेळी काम करतात, एकमेकांशी वाद घालतात आणि शेवटी एका निष्कर्षापर्यंत पोहोचून तुम्हाला उत्तर देतात.
Grok च्या या टीममध्ये चार AI Agents आहेत -
१ . Grok (समन्वयक): हा मुख्य सूत्रधार आहे. तुमच्या प्रश्नाचे तुकडे करणे, इतर एजंट्सना कामे वाटून देणे आणि मतभेद सोडवून अंतिम उत्तर तयार करणे ही याची जबाबदारी आहे.
२ . Harper (संशोधक): हा इंटरनेट आणि 'X' वरील दररोजच्या ६.८ कोटी पोस्ट्समधून रिअल-टाइम डेटा गोळा करतो आणि माहितीची खातरजमा (Fact-check) करतो.
३ . Benjamin (तर्कशास्त्रज्ञ): गणित, कोडिंग आणि तर्कशुद्ध मांडणी यात हा तज्ञ आहे. इतरांच्या लॉजिकची कडक चाचणी घेणे हे याचे काम.
४ . Lucas (सर्जनशील): हा विषयाकडे वेगळ्या कोनातून पाहतो, स्पष्टतेसाठी फेरलेखन करतो आणि इतरांनी न विचार केलेल्या कल्पना सुचवतो.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/IrJLqgnVxWZBgK459jDqpM
येथे क्लिक करा.
================
या चार मेंदू असलेल्या AI Model चा फायदा काय?
प्रारंभिक चाचणीत असे दिसून आले आहे की, या पद्धतीमुळे AI द्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीचे (Hallucinations) प्रमाण ६५% ने कमी झाले आहे. जेव्हा एखादा एजंट आत्मविश्वासाने चुकीची माहिती देतो, तेव्हा दुसरा एजंट ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच पकडतो. हे अगदी मशीनच्या वेगाने होणारे 'पिअर रिव्ह्यू' (Peer Review) आहे.
याचे परिणाम थक्क करणारे आहेत. 'अल्फा एरिना सीझन १.५' या लाइव्ह स्टॉक ट्रेडिंग स्पर्धेत, Grok 4.20 हे एकमेव फायदेशीर AI मॉडेल ठरले. त्याने $10K च्या गुंतवणुकीचे $11K-$13.5K मध्ये रूपांतर केले, तर Google आणि OpenAI चे मॉडेल्स मात्र तोट्यात राहिले.
सध्या उपलब्ध असलेली Grok 4.20 आवृत्ती हे केवळ ५०० बिलियन पॅरामीटर्सचे 'स्मॉल' मॉडेल आहे; पूर्ण क्षमतेचे मॉडेल अजूनही ट्रेनिंगमध्ये आहे.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे मॉडेल मोफत उपलब्ध आहे. तुम्ही Grok वर जाऊन खालील गोष्टी करून पाहू शकता:
बहुआयामी प्रश्न: ज्याला स्पष्ट चूक की बरोबर असे उत्तर नाही अशा प्रकारचे प्रश्न विचारून पहा. उदा. "रिमोट वर्कचे फायदे आणि तोटे काय आहेत?" किंवा "मुलांना मोबाईल द्यावा की नाही?" असे विचारून पहा. एजंट्स एकमेकांशी असहमत होऊन नंतर एक संतुलित उत्तर कसे देतात, हे तुम्ही लाईव्ह पाहू शकता.
तथ्यांवर आधारित काम: एखाद्या ताज्या रिपोर्टमधील आकडेवारी विचारा. 'Harper' स्रोत शोधेल तर 'Benjamin' त्या आकड्यांची पडताळणी करेल.
कोडिंग: तुमचा खराब झालेला कोड पेस्ट करा. 'Benjamin' तो दुरुस्त करेल, तर 'Lucas' तो अधिक चांगल्या पद्धतीने कसा लिहिता येईल हे सुचवेल.
AI मॉडेल्सच्या कार्यपद्धतीमधील हा एक मोठा 'आर्किटेक्चरल शिफ्ट' आहे. जिथे OpenAI आणि Google अजूनही 'एक मेंदू, एक उत्तर' यावर काम करत आहेत, तिथे xAI ने 'मॉडेल्सची फौज' उभी केली आहे. जर पूर्ण क्षमतेचा Grok 4.20 अपेक्षेप्रमाणे काम करू लागला, तर इतर कंपन्यांनाही हीच पद्धत अवलंबावी लागेल.
बघूया...पुढे काय घडतंय ते !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !