आग लागलेल्या इमारतीत जाऊन आग विझवणारे रोबोट्स आता आले आहेत!

आणि खरंच सांगायचं तर… हे एक असे काम आहे जे माणसापेक्षा रोबोट्सनेच करावे असे वाटते. 🤖✨


आपण नेहमी चर्चा करतो की एआय आणि रोबोट्स माणसाची जागा घेणार आहेत का? 🤔 पण प्रश्न जर एखाद्या माणसाला पेटलेल्या इमारतीत पाठवण्याचा असेल, तर कुणीही मशीनला आधी पाठवायला तयार होईल. 😌🔥
कारण अग्निशमन कार्य खूपच धोकादायक आहे. एका माणसाला आगीतून वाचवण्यासाठी दुसऱ्या माणसाला आत पाठवावे लागते. 😓🔥 जर हे रोबोट्स अशा धोक्याला (किमान थोडं तरी) कमी करू शकले, तर हे सर्वांसाठीच फायदेशीर ठरेल! 💪


🚀 चीन मधील Unitree कंपनीने असे अग्निशामक क्वाड्रुपेड्स (चतुष्पाद) नुकतेच सादर केले आहेत. 🐕🤖 अत्यंत कठीण परिस्थितींमध्ये काम करणारे एआय-आधारित रोबोट कुत्रे. ते स्मार्ट आहेत, मजबूत आहेत आणि भरपूर साधनांनी सुसज्ज आहेत:
================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK
येथे क्लिक करा.
================


🔧 या अग्निशामक कुत्रांची काही वैशिष्ट्ये 🔧
📸 धुरामध्येही स्पष्ट पाहू शकतील असे HD कॅमेरे


🌐 5G कनेक्शन वापरून पेटलेल्या इमारतीच्या आतील दृश्ये live पाठविण्याची सोय


🏭 O₂, CO, H₂S आणि ज्वलनशील गॅस ओळखण्यासाठी गॅस सेंसर्स


🌡 अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी थर्मल इमेजिंग


💡 धुरामध्येही स्पष्ट पाहता येण्यासाठी एलईडी लाईट्स


💦 एका मॉडेलमध्ये 60 मीटरपर्यंत पोहोचणारे पाण्याचं कॅनन आणि फोम टाकण्याची क्षमता


🌬 जंगलातील आगींना थांबवण्यासाठी high pressure Air टाकण्याची सुविधा


🧗‍♂ आणि हो, हे रोबोटिक्स कुत्रे पायऱ्या चढतात, मलब्यातून चालतात आणि वस्तू वाहून नेऊ शकतात.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK
येथे क्लिक करा.

================

🚒 ते मानवी अग्निशामकांना संरक्षण देत आहेत! अनावश्यक धोक्यांपासून वाचवत आहेत. आणि कित्येकांचे प्राणही वाचवत आहेत!


अशी आणखी कोणती कामे आहेत... जी माणसापेक्षा मशिन्सने केलेलीच आपल्याला आवडतील? 🤔


अशा अनेक AI संबंधी माहिती देणाऱ्या पोस्ट्ससाठी आम्हाला जरून फॉलो करा! 🚀


टीम नेटभेट ✨