There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
तुमच्या कंपनीची विक्री वाढवण्यासाठी या काही टिप्स -
1. उद्दीष्ट ठरवा -
तुम्ही तुमच्या सेल्सटीमसह विक्रीचे उद्दीष्ट ठरवा. हे उद्दीष्ट ठरवताना तुमच्या कंपनीची आणि तुमच्या विभागाचीही ध्येयधोरणे ध्यानात घ्या.
2. KPIs आणि Matrics
तुमच्या विक्रीच्या यशाची मोजदाद करा. त्यासाठी KPIS, Sales velocity, percent to revenue, प्रतिवर्षीची विक्री अशा विविध पैलूंचा सखोल अभ्यास करा.
3. तंत्रज्ञानाचा वापर -
तुमच्या टीमचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी त्यांना योग्य ते आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून द्या. त्याचा वापर कसा करावा, यासाठी त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण द्या. या तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर करून तुमची टीम जोरदार विक्री करू शकली पाहिजे याकडे लक्ष्य द्या.
4. भविष्यावर लक्ष्य ठेवा -
आर्टीफिशिअल इंटेलिजन्समध्ये जागतिक अर्थकारणात तब्बल $13 trilloin वाढ करण्याची क्षमता आहे. म्हणूनच ऑटोमेशन आणि एआय चा अवलंब तुमच्या कंपनीतील कामकाजात केल्यास भविष्यात तुमच्या कंपनीच्या सेल्सला प्रचंड फायदा होईल.
5. सोशल मीडियाचा प्रभावी वापर -
सोशल मीडिया हे देखील हल्ली विक्रीसाठी एक प्रभावी माध्यम झालेले आहे. त्यामुळे तुमच्या कंपनीच्या ग्राहकांशी सोशल मीडियावरून तुम्ही कनेक्ट राहू शकता व विक्रीचे उद्दीष्ट पूर्ण करू शकता.