There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
भारतातील व्याजदर सातत्याने खाली येत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने यावर्षी आतापर्यंत तीन वेळा रेपो दरात कपात केली आहे आणि अजून दोन वेळा कपात होण्याची शक्यता आहे. याचा सरळ परिणाम बँकांच्या सेव्हिंग्स अकाउंट आणि FD च्या व्याजदरांवर होतो.
उदाहरणार्थ, भारतातील सर्वात मोठी बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) — सध्या सेव्हिंग्स अकाउंटवर फक्त 2.5% व्याज देते. जर तुम्ही मोठी रक्कम फक्त सेव्हिंग्स अकाउंटमध्ये ठेवली असेल, तर हे दर महागाई आणि करांनंतर नकारात्मक ठरतात. म्हणजेच saving account मध्ये दीर्घकालीन पैसे ठेवणे हे स्वतःचे नुकसान करण्यासारखे आहे.
सेव्हिंग अकाउंटमध्ये मोठी रक्कम ठेवणं शहाणपणाचं नाही!
अनेक लोक महिने महिने आपल्या पैशांवर निर्णय घेत नाहीत आणि ती रक्कम सेव्हिंग अकाउंटमध्येच पडून असते. पण लक्षात ठेवा:
SBI चं व्याज: 2.5%
महागाई दर: ~5%+
प्रत्यक्ष उत्पन्न: -2.5% (नकारात्मक)
म्हणजेच, तुम्ही पैसे "सुरक्षित" ठेवत असताना, प्रत्यक्षात ते कमी होत असतात.
जर तुम्ही Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करत असाल, तर आता वेळ आहे ‘Lock’ करण्याची !
जर तुम्ही ‘रिस्क अॅव्हर्स’ म्हणजेच कमी जोखीम घेणारे गुंतवणूकदार असाल, आणि फक्त एफडी सारख्या पर्यायांवर विश्वास ठेवत असाल, तर सध्या जे व्याजदर आहेत, ते Lock-in करण्याची हीच वेळ आहे. पुढील काही वर्षांमध्ये भारतात ‘Low Interest Rate’ युग राहणार आहे. त्यामुळे आता मिळणाऱ्या व्याजदरात FD lock करून घ्या.
यासंबंधी काही महत्वाच्या टिप्स -
1. बँक निवडताना ही काळजी घ्या -
तुमच्या एफडीची रक्कम ठेवायची आहे ती योग्य बँकेत — यासाठी दोन पर्याय आहेत:
✅ मोठ्या सरकारी किंवा खाजगी बँका:
सुरक्षितता हवी असेल, तर अशा बँका विश्वासार्ह पर्याय आहेत. त्यांचं नियमन कडक असतं, सरकारकडून मदतीची अपेक्षा अधिक असते, आणि त्यांच्यावर लोकांचा विश्वासही मोठा असतो.
⚠️ Small Finance Banks:
या बँका जास्त व्याज देतात, पण जोखीम जास्त असते. जर तुम्ही येथे एफडी करणार असाल, तर ₹5 लाखांपेक्षा अधिक रक्कम ठेवू नका — कारण हाच रक्कम मर्यादा ‘Deposit Insurance’ द्वारे सुरक्षित आहे.
2. ‘Deposit Insurance’ म्हणजे काय?
- भारतातील DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) ही RBI ची उपकंपनी आहे. ती खातेदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काम करते.
- प्रत्येक बँकेत प्रत्येक खातेदारासाठी ₹5,00,000 पर्यंत विमा संरक्षण असतो (मूळ रक्कम + व्याज यांचा समावेश).
- ही मर्यादा सर्व खात्यांमध्ये मिळून असते – सेव्हिंग्स + एफडी + चालू खाते.
- एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये खाती उघडून विमा वाढवता येत नाही.
- मात्र, वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती असतील, तर प्रत्येक बँकेसाठी ₹5 लाख इतकं विमा संरक्षण वेगळं लागू होतं.
- विमा मिळवण्यासाठी तुम्हाला काहीही करणं गरजेचं नाही — तो आपोआप लागू होतो.
पण एक गोष्ट लक्षात घ्या: जर बँकेस काही झालं, तर पैसे मिळायला काही महिने लागू शकतात. म्हणूनच, तुमचं आपत्कालीन निधी अशा बँकेत ठेवू नका ज्याची आर्थिक स्थिती डळमळीत आहे.
3. ‘FD Laddering’ हे गुंतवणूक तंत्र वापरा
- एकाच वेळी संपूर्ण रक्कम एका एफडीमध्ये गुंतवण्याऐवजी, ‘FD Laddering’ ही युक्ती वापरा.
कशी कराल?
- रक्कम वेगवेगळ्या कालावधीत गुंतवा: उदाहरणार्थ – 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षांची एफडी वेगळी वेगळी करा.
- एक मोठी एफडी न करता छोट्या-छोट्या एफडी बनवा.
-
याचे फायदे:
- व्याजदर वाढले, तर तुमच्या काही एफडी लवकर Mature होतील, आणि त्यात तुम्ही नवीन, अधिक दराने गुंतवणूक करू शकता.
- व्याजदर घटले, तरीही तुमच्या काही एफडी जुन्या उच्च दराने सुरु राहतील.
- Operational benefit: जर पैशांची गरज लागली, तर तुम्हाला एकाच मोठ्या एफडी तोडण्याची गरज नाही. त्याऐवजी एक छोटी एफडी तोडता येते, ज्यामुळे व्याज नुकसान कमी होतं.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================
उदाहरण: जर तुम्ही 5 वर्षांची 6% व्याज असलेली एफडी 2 वर्षांनी तोडली, तर बँक तुम्हाला 6% व्याज देणार नाही. ती 2 वर्षांची एफडी समजून, त्या कालावधीसाठी कमी दर लावेल, आणि त्यावर पेनल्टीही लागू होईल.
4. ‘Special Tenure’ ऑफर्सकडे लक्ष ठेवा
काही बँका वेळोवेळी स्पेशल एफडी ऑफर्स आणतात — जसं की 444 दिवस, 555 दिवस वगैरे. अशा ऑफर्समध्ये व्याजदर थोडं जास्त असतं आणि ते निश्चित कालावधीसाठी असतं. त्याचा फायदा घ्या, विशेषतः जेव्हा व्याजदर खाली जात आहेत.
5. ज्येष्ठ नागरिकांसाठी: अधिक व्याजाचे पर्याय !
60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या senior citizens ना अनेक बँका 0.5% - 1 % अधिक व्याज देतात. ही सवलत वापरा. तुमच्या वृद्ध पालकांसाठी गुंतवणूक करत असाल, तर ती त्यांच्या नावावर करा आणि हा बोनस व्याजदर मिळवा.
6. Fintech प्लॅटफॉर्म वापरावेत का?
आजकाल काही Fintech कंपन्या ऑनलाईन एफडी सुविधा देतात — ज्यासाठी तुम्हाला त्या बँकेत सेव्हिंग्स अकाउंट उघडण्याची गरजही नाही.
पण अशा कंपन्या अजून नवख्या आहेत. पैसे किती सुरक्षित राहतील, हे वेळच ठरवेल. त्यामुळे मी सुचवेन की सध्या तरी परंपरागत बँकांमध्येच एफडी करा.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा
FD म्हणजे "अत्यंत सुरक्षित" गुंतवणूक. त्यातून प्रचंड परतावा अपेक्षित ठेवू नका, पण सुरक्षित गुंतवणुकीचा तो आधारस्तंभ असतो.
📉 व्याजदर घसरत आहेत. 📈 आता जे दर आहेत, ते पुढच्या काही वर्षांत दिसणारही नाहीत.
✅ त्यामुळे जास्त व्याजदर असलेली एफडी आता ‘Lock-in’ करा.
🪜 Laddering वापरा.
💰 ₹5 लाखांच्या मर्यादेचा विचार करा.
👴 Senior Citizen व्याजाचा लाभ घ्या.
बरेच ज्येष्ठ नागरिक गुंतवणुकीसाठी FD चा पर्याय वापरतात. अशा व्यक्तींसोबत वरील माहिती जरूर शेअर करा.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !