निवडणूक निकाल आणि म्युच्युअल फंड

निवडणुकांचे निकाल बहुतेकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळे ठरले. कुणाला अपेक्षेपेक्षा जास्त तर कोणाला अपेक्षेपेक्षा कमी मतं पडली. नेमकं या या निवडणुकीमध्ये जिंकलं कोण आणि हरलं कोण याच्याबद्दलही मतभेद आहेत.

मित्रांनो आकडेवारी बऱ्याच वेळेला फसवी असते. त्याचा अर्थ आपण जसा लावू तसा तो निघतो. म्युच्युअल फंड निवडताना पण अशीच काहीशी गडबड होते. खूप सारे आकडे जे आपल्याला दाखविले जातात त्यावरून योग्य म्युच्युअल फंड निवडता येईलच याची खात्री देता येत नाही.

आपणा भारतीयांना राजकारणाबद्दल बोलायला आवडतं आणि बऱ्याच लोकांना यातलं कळतं (असं आपल्याला वाटतं !). म्हणूनच आपण या निवडणुकांच्या निकालाच्या उदाहरणावरून म्युच्युअल फंड चा अभ्यास करण्यासाठीचे पॅरामीटर्स शिकण्याचा प्रयत्न करूया.

============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live

93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा - https://salil.pro/MBA
============================

CAGR (Compounded annual growth rate)
==============================
CAGR म्हणजे चक्रवाढ वार्षिक वाढ दर. हा दर दर्शवतो की गुंतवणूक दरवर्षी समतोल दराने किती वाढली आहे.

NDA ने मागील तीन निवडणुकांमध्ये अनुक्रमे 336, 353 ,293 मते मिळविली. याचा अर्थ CAGR -4.79% आहे.

UPA/INDIA ने अनुक्रमे 59, 91, 234 मते मिळविली. याचा CAGR 58.29% आहे.

दीर्घ कालावधी साठी जास्त CAGR देणारा म्युच्युअल फंड चांगला.

Alpha Ratio
==============================
कोणताही म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी लोकांकडे जातो तेव्हा त्यांना एक बेंच मार्क देतो म्हणजे म्युचल फंड सांगतो की मी किमान याच्या इतका परतावा देईन. या बेंचमार्क पेक्षा किती जास्त % परतावा मिळाला या गुणोत्तराला Alpha असे म्हणतात.

NDA ची अपेक्षा होती 400 जागांची. प्रत्यक्षात त्यांना मिळाल्या 290 जागा. म्हणजेच एनडीएने बेंच मार्क पेक्षा कमी परफॉर्मन्स दिला याचा अर्थ अल्फा कमी झाला.

ज्या फंडचा अल्फा सातत्याने कमी आहे अशा फंड मध्ये गुंतवणूकदार फार काळ थांबत नाहीत.

Sharpe Ratio
==============================
म्युच्युअल फंडने परतावा देण्यासाठी किती जोखीम घेतली आहे ते शार्प रेशिओ वरून कळते.कमी जोखीम घेऊन जास्त परतावा देणारे म्युच्युअल फंड नेहमी चांगले.

निवडणुकांच्या बाबतीत जर बघितलं तर भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी अनेक प्रकारची नवीन समीकरणं मांडली. आपल्या तत्वांच्या विरुद्ध माणसांना देखील सोबत घेतलं.

400 चा मोठा आकडा गाठण्यासाठी ही जोखीम त्यांनी घेतली परंतु प्रत्यक्षात जोखीम जास्त असूनही त्यांना बेंच मार्क इतका परतावा देता आला नाही.

एखादा म्युच्युअल फंड जास्त परतावा मिळवण्याच्या नादात जोखीमयुक्त कंपन्यांमध्ये गुंतवत असेल तर त्याचा शार्प रेशिओ कमी आहे आणि असा म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी योग्य नाही

Expense Ratio
==============================
म्युच्युअल फंड ची फी दरवर्षी द्यायला लागते. गुंतवणूकदारांसाठी हा खर्च एक्स्पेन्स रेशीओ म्हणून ओळखला जातो. एखादा फंड परतावा चांगला देत असेल परंतु त्याचा एक्सपेन्स रेशीओ देखील जास्त असेल तर प्रत्यक्षात गुंतवणूकदारांना कमी परतावा मिळेल.

उदाहरणार्थ एका म्युच्युअल फंडने 17% परतावा दिला आणि त्याचा expense ratio 2.5% आहे. दुसऱ्या फंडने 16% परतावा दिला आहे त्याची त्याचा expense ratio 1% आहे. याचा अर्थ 16% रिटर्न्स देणारा फंड प्रत्यक्षात जास्त फायदेशीर आहे.

NDA आणि INDIA ने निवडणुकांसाठी किती खर्च केला त्याची माहिती उपलब्ध नाही. परंतु tv, इंटरनेट, वर्तमानपत्र यामध्ये NDA च्या जाहिराती जास्त दिसत होत्या म्हणून त्यांनी अधिक खर्च केला असे ग्राह्य धरू.

जास्त एकस्पेन्स रेशीओ असूनही CAGR निगेटिव्ह/कमी आहे. असा म्युच्युअल fund गुंतवणुकीसाठी योग्य नाही.

==============================
हा लेख म्युच्युअल फंड ची बोरिंग आकडेवारी सोपी आणि रंजक करून सांगण्याचा प्रयत्न आहे. ही राजकीय पोस्ट नाही.

तसेच ही आकडेवारी मागील 10 वर्षांसाठीची आहे. जर जास्त किंवा कमी कालावधी साठी हाच अभ्यास केला तर कदाचित वेगळे निष्कर्ष काढता येतील.

म्हंटल ना आकडेवारी फसवी असते…!

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy