भाज्यांचे मूळ रंगच सांगतात त्यांचे गुणधर्म

आपले आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर फळे आणि भाज्या यांचा आहारात मुबलक प्रमाणात वापर करायला पाहिजे असे वेळोवेळी डॉक्टर्सही सांगतात. आरोग्याच्या दृष्टीने फळं आणि भाज्या खाणे हे फार उत्तम कारण त्यातून आपल्याला आवश्यक ते व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर मिळतात. मात्र, काय तुम्हाला ठाऊक आहे का, विशिष्ट रंगाच्या भाज्या ( किंवा फळे ) खाल्याने आपल्याला नेमकं काय मिळतं ..?

1)  लाल रंग

लाल रंगाच्या भाज्यांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. या रंगाच्या भाज्यांमध्ये लायकोपेन नावाचा घटक असतो जो आपल्या आरोग्यासाठी फार चांगला असतो. तसंच या भाज्या ह्रदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. (उदा. टोमॅटो, लाल रंगाची सिमला मिरची, लाल मिरची)

2) हिरवा रंग 

हिरव्या रंगाच्या भाज्या डीटॉक्सिफिकेशन करण्यासाठी मगत करतात. या भाज्यांमध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळून येतात. तसंच यामध्ये झिंक आणि लोह देखील भरपूर प्रमाणात असते. म्हणूनच हिरव्या पालेभाज्या खाण्यावर भर देण्यास वेळोवेळी सांगितले जाते. (पालक, मेथी अशा पालेभाज्या)

3) जांभळा रंग 

जांभळ्या रंगाच्या भाज्यांमध्ये अँथोसियानिन नावाचा घटक मेंदूच्या आरोग्यासाठी चांगला असतो. त्याचबरोबर जळजळ होणे किंवा ह्रदयाच्या आरोग्यासाठीही या भाज्या उत्तम असतात. शांत आणि सकारात्मक वृत्तीसाठीही या रंगाच्या भाज्यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. (वांगी, जांभळा पत्ताकोबी, रताळी)

4) पांढरा रंग

पांढऱ्या रंगाच्या भाज्यांमध्ये असलेल्या घटकामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी या भाज्यांचा चांगला उपयोग होतो. तसंच मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी, स्नायू बळकट होण्यासाठी आणि हाडं मजबूत होण्यासाठीही या भाज्या उत्तम.

5) केशरी पिवळा रंग 

या रंगाच्या भाज्या तुमच्या सौंदर्यवृद्धीसाठी मदत करतात. त्यामध्ये केरॅटीनॉईड आणि बायोफ्लेवोनाईड्स असतात ज्यामुळे आपली त्वचा सतेज रहाण्यास मदत होते. तसंच दात आणि हाडांचे आरोग्य उत्तम राखण्यास या भाज्या मदत करतात. 

धन्यवाद
टीम नेटभेट