There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
कोणत्याही रंगाचा आपल्या मनावर आणि मेंदूवर नेहमीच एक ठोस असा परिणाम होत असतो. यामुळे या मानसशास्त्राचा उपयोग करून अनेकदा मार्केटींग आणि ब्रँडींगमध्ये बड्या बड्या कंपन्या नेहमीच अग्रणी ठरतात. ग्राहकांना कोणत्या रंगाने आपल्याकडे आकर्षित करता येईल असा विचार त्यामागे केलेला असतो.
जाणून घेऊया कोणत्या रंगाचा वापर कोणकोणत्या बड्या ब्रँड्सनी आणि का केलेले आहे त्याविषयी -
1. पिवळा रंग -
हा रंग आनंदाचे, आशावादाचे नि सूर्यतेजाचे प्रतिक आहे. दिवसाउजेडी हा रंग मनुष्याच्या डोळ्यांना सर्वाधिक प्रमाणात दिसतो. म्हणूनच लोकांचं लक्ष्य या रंगाकडे चटकन वेधलं जातं. हेच ओळखून अनेक ब्रँड्स या रंगाचा खूप वापर करतात. उदाहरणार्थ - मॅगी, मॅकडोनल्ड्स, फ्लिपकार्ट यांचे लोगो आवर्जून बघावे.
2. निळा रंग -
हा रंग प्रगल्भतेचे आणि विश्वासार्हतेचे प्रतिक आहे. त्याचबरोबर हा रंग प्रोफेशनॅलिझमचेही प्रतिक आहे. म्हणूनच अनेक कंपन्या हा रंग आवर्जून वापरतात.
उदा. ट्विटर, फेसबुक, फोर्ड
3. काळा रंग -
हा रंग आधुनिकता, शक्ती, प्रभाव, सभ्यता यांचं प्रतिक आहे. जेव्हा हा रंग आपण पहातो तेव्हा प्रचंड ताकद आणि वर्चस्व या दोन भावना आपल्या मनात येतात. हीच बाब ओळखून अनेक कंपन्या आपल्या लोगोमध्ये या रंगाचा वापर करतात.
उदा. अॅप्पल, अदीदास, प्युमा
4. लाल रंग -
हा रंग उत्साहाचे, पॅशनचे प्रतिक आहे. जेव्हा आपल्याकडे लक्षं वेधून घ्यायचे असेल तेव्हा किंवा वर्चस्व गाजवायचे असेल तेव्हा हा रंग आवर्जून वापरला जातो. प्रेम आणि राग या दोन्हीही भावनांचे प्रतिक हाच रंग आहे.
उदा. - कोकाकोला, नेटफ्लिक्स यांचे लोगो पहा.
5. जांभळा रंग -
कल्पकता आणि स्त्रीत्व यांचे प्रतिक असलेला हा रंग शहाणपण, अत्याधुनिकता, श्रीमंती, राजेशाही थाट या सगळ्याचं प्रतिक आहे. अनेक कंपन्या या रंगाचा वापर करतात.
उदा. - हॉलमार्कचा लोगो, याहू चा लोगो
6. हिरवा रंग -
निसर्गाचा रंग... समृद्धीचा रंग .. हा रंग सगळीकडे दिसतो. म्हणूनच मनावर कोरला गेलेला आहे. मन शांत करणारा, तणाव दूर करणारा, असा हा रंग आहे. या रंगाकडे पहाताच मन प्रसन्न होते.
उदा. - स्टारबक्स
7. पांढरा रंग -
हा रंग शांततेचे प्रतिक आहे. त्याचबरोबर हा रंग शुद्धता, सच्चेपणा, निरागसता, यांचेही प्रतिक आहे. स्वच्छता, सुरक्षितता, आणि उत्साहवर्धक असा हा रंग आहे. हा रंग ब्रँडींगमध्ये काँट्रास्ट बॅलन्स करण्यासाठीसुद्धा वापरला जातो.
उदा. - बीबीसीचा लोगो.
आता यापुढे तुम्ही जेव्हा कोणत्याही कंपनीच्या लोगोचा विचार कराल तेव्हा त्यातील रंगांकडे आवर्जून लक्ष्य द्याल व तो रंग व तो ब्रँड तुम्हाला नेमकं काय कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतंय हे देखील तुम्ही यापुढे निश्चितच ओळखू शकाल.
धन्यवाद
टीम नेटभेट