There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
पंचेचाळीशी नंतर नवा जॉब शोधायला लागणे हे येत्या काळातील सर्वाधिक मोठं आणि गंभीर आव्हान आपल्या पिढीसमोर असणार आहे.
Job security नाही आणि मेहनतीने मिळवलेला अनुभव फारसा उपयुक्त नाही...In fact मिळवलेला अनुभव हाच येत्या काळात नवीन तंत्रज्ञान, संधी आणि culture शी जुळवून घेण्यातला मोठा अडथळा ठरणार आहे.
साठी नंतरचे निवृत्ती नियोजन करताना....45 ते 60 हा काळ आपण कसा घालवणार आहोत? आहे ते उत्पन्नाचं साधन नष्ट झालं तर खर्च कसा भागवणार आहोत ? आणि स्वतःच्या कौशल्य विकासासाठी , स्वतःला relevant ठेवण्यासाठी आपण काय करत आहोत ? या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर शोधली पाहिजेत.
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
सेकंद काटा हलताना दिसतो....तास काटा हलताना दिसत नाही.... दिवस संपताना दिसतो, महिना संपताना दिसत नाही...काळ झपाट्याने पुढे जातोय.... आणि आपल्याला जाणवतही नाही.
खूप धावल्यानंतर आपण ट्रेड मिल वर धावत होतो...आणि पुढे गेलोच नाही हे जाणवण्या इतकं दुःख नाही. व्हाट्सअप्प आणि ईमेल वर दररोज अनेक जण जॉब साठी विचारत आहेत ते वाचून मन सुन्न होतय. म्हणून कळकळीची विनंती upskilling आणि financial planning या दोन अतिमहायवाच्या गोष्टेंकडे कानाडोळा करू नका.
बदलायला भाग पडण्याआधीच बदल केला पाहिजे. बदल करणं हे बदल स्वीकारण्यापेक्षा नक्कीच सुखावह असेल...!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com