करिअर त्रिज्या

नमस्कार मित्रांनो,

नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्सतर्फे आयोजित तीन दिवसीय विशेष करिअर त्रिज्या या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी जो उदंड प्रतिसाद दिलात, त्याबद्दल सर्वप्रथम आपले खूप खूप आभार ! 

विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा आणि कला शाखा या तिनही शाखेनंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध होतात, या संधी घेण्यासाठी कोणकोणत्या परिक्षा द्याव्या लागतात, तयारी केव्हापासून करावी लागते या सर्वाविषयी सविस्तर मार्गदर्शन या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले. 

खास लोकाग्रहास्तव या कार्यक्रमात दाखवण्यात आलेल्या विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील करिअर मार्गदर्शन करणाऱ्या प्रा.दिनेश मोरे सरांच्या पीडीएफ नोट्स आता आपल्यासाठी आम्ही येथे उपलब्ध करून देत आहोत. 

या नोट्स केवळ पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असून आपण त्या आपल्याजवळ डाऊनलोड करून ठेऊ शकता.

आम्हाला खात्री आहे या सर्व पीडीएफ्सचा आपल्याला निश्चितच फार उपयोग होईल ! 

धन्यवाद 

टीम नेटभेट

'मातृभाषेतून शिकुया, प्रगती करूया !'