There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
🏖 सुट्ट्या, सहली, ट्रिप्स... सगळं प्लॅन करताना आपण खूपच उत्साही असतो. पण हे करताना सावध रहा! कारण हेच ते दिवस असतात जेव्हा आपल्यासोबत एखादा ट्रॅव्हल फ्रॉड होऊ शकतो.
2025 मध्ये ट्रॅव्हल फ्रॉड्समध्ये तब्बल 28% वाढ झाली आहे!
कुठे तरी स्वस्त डील मिळतेय... कुणीतरी सांगितलं “एकदम सेफ आहे”… आणि आपण पटकन बुकिंग करून टाकतो. पण मग सुरू होते खरी अडचण.
चला तर मग, या फसवणुकींचे वेगवेगळे प्रकार आणि त्यापासून सावध राहण्यासाठी उपाय पाहूया…
1️⃣ बनावट वेबसाइट्स – Airbnbसारख्या हुबेहुब!
तुम्ही वेबसाइट पाहता – फोटो भारी, लोकेशन जबरदस्त. तुम्ही पैसे भरता. तिथे पोचल्यावर कळतं – असं हॉटेल अस्तित्वातच नाही!
👉 उपाय:
वेबसाइटचा URL नीट तपासा
फक्त अधिकृत अॅप्स/वेबसाइट्स वापरा
"http://" ऐवजी "https://" असलेली साइट वापरा
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK
येथे क्लिक करा.
================
2️⃣ फिशिंग मेसेजेस – ‘आपली फ्लाइट रद्द झाली आहे’
किंवा
"तुमचं हॉटेल बुकिंग अयशस्वी."
"या लिंकवर क्लिक करून आम्हाला संपर्क करा" असा मेसेज/व्हाट्सअप्प किंवा ईमेल येते.
ही लिंक म्हणजेच सापळा. क्लिक केला की, तुमचा डेटा हॅक.
👉 उपाय:
लिंकवर क्लिक करू नका.
थेट एअरलाइन्स किंवा हॉटेलशी संपर्क साधा.
शक्यतो OTP, कार्ड डिटेल्स कोणालाही सांगू नका.
3️⃣ बनावट free Wi-Fi – 'Free Wi-Fi'च्या नावाखाली फसवणूक
मोफत Wi-Fi मिळालं म्हणून लॉगिन करता… पण तो Wi-Fi खऱ्या हॉटस्पॉटचा नसून स्कॅमरने टाकलेलं जाळं असतं आणि आपण त्यात अडकतो.
👉 उपाय:
फ्री Wi-Fi वर बँकिंग/पेमेंट करू नका
VPN वापरा
मोबाईल डेटा वापरणं केव्हाही सुरक्षित
4️⃣ ओला/उबर फसवणूक – कॅन्सल करून डायरेक्ट पेमेंट मागतात
तुम्ही बुक करता – ड्रायव्हर येतो, म्हणतो अॅप कनेक्ट नाही झालं. "कॅन्सल करा आणि डायरेक्ट पे करा."
👉 उपाय:
अॅपबाहेर जाऊन पेमेंट करू नका
फक्त अॅपमार्फतच राईड सुरू करा
कधीही कॅशमध्ये पे करत असाल, तर पावती घ्या
5️⃣ फेक पार्किंग आणि टोल रसीद – ‘भलतीच’ पावती मिळते
विशेषतः गोवा, लोणावळा, महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळी अशा प्रकारची फसवणूक जास्त प्रमाणात होते.
👉 उपाय:
अधिकृत टोल/पार्किंग स्टँडच वापरा
पावती तपासा – ती खऱ्या एस्टॅब्लिशमेंटची आहे का?
अति महागडे चार्जेस दिल्यावर लगेच सावध व्हा
6️⃣ बनावट फूड पॅकेट्स – एखाद्या ठिकाणी गेल्यावर तेथील स्पेशालिटी असलेली गोष्ट आपण विकत घेतो. उदा. गोव्यातील काजू.
ग्राहक पुन्हा येणार नाही याची खात्री असल्याने वजनात , गुणवत्तेत आणि किंमतीत घोटाळा करतातच. बाहेरून छान दिसणाऱ्या पॅकेट मध्ये मात्र खराब प्रॉडक्ट्स असू शकतात.
👉 उपाय:
ब्रँडेड दुकानांमधूनच खरेदी करा
पॅकेजिंग तपासा
विक्रेत्याकडून बिल घ्या
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK
येथे क्लिक करा.
================
🔐 ट्रॅव्हलमध्ये सतर्कता = सुरक्षा
👉 टीप :
प्रत्येक बुकिंगवर Google Review तपासा
अनोळखी लिंक/कॉल/अॅप्सपासून सावध रहा
शक्यतो ट्रॅव्हल इन्शुरन्स घ्या
"आधी शहाणपणा – मग सहलीची मजा!"
---
🧳 तुम्ही कुठेही जात असाल, एक गोष्ट लक्षात ठेवा – आज जगात सगळ्यात महागडं तिकीट आहे “भोळसटपणाचं”!
सावध व्हा, स्मार्ट रहा, सुट्टीचा खऱ्या अर्थानं आनंद घ्या! ✈️🌴🏖️
---
तुमच्याकडे याबाबत असलेले काही किस्से, किंवा अनुभव शेअर करायला विसरू नका – आपल्या मित्रपरिवारालाही हे पुढे पाठवा आणि फसवणुकीपासून वाचवा!
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !