There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
वॉटरलूची लढाई 1815 मध्ये लढली गेली. ही लढाई ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सचा राजा नेपोलियन बोनापार्ट यांच्यामध्ये लढली गेली. एका अर्थी ती निर्णायक लढाई होती. कारण ही लढाई जर फ्रान्सने जिंकली असती तर त्यांची संपूर्ण जगावर सत्ता येण्याची शक्यता होती.
दुसऱ्या बाजूला लंडन स्टॉक एक्सचेंजचं भवितव्य या लढाईतून ठरणार होतं. कारण ग्रेट ब्रिटन ने ही लढाई जिंकली तर शेअर बाजार उसळी घेणार नाही तर पूर्णपणे कोसळणार असा अंदाज त्या वेळच्या गुंतवणूक तज्ञांनी लावला होता. म्हणूनच प्रत्येक जण या लढाईच्या निकालाकडे डोळे लावून बसला होता. अर्थात तो 19 व्या शतकाचा सुरुवातीचा काळ होता आणि त्या काळात अशा बातम्या पटकन कळण्यासाठी साधनं नव्हती.टीव्ही नव्हता,इंटरनेट नव्हतं,रेडिओ नव्हता. वॉटरलूची लढाई लढली गेली ते ठिकाणही लंडन पासून खूप दूर होतं जिथून युद्धाची बातमी येण्यासाठी कमीत कमी एक-दोन दिवस लागायचे.
त्या काळात लंडनमध्ये रॉथचिल्ड नावाच्या कुटुंबाचा मोठा दबदबा होता. अतिशय श्रीमंत असलेल्या या कुटुंबाचे जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशात मोठे व्यवसाय होते. जगभरातील वेगवेगळ्या बातम्या माहित करून घेण्याची त्यांची स्वतंत्र यंत्रणा होती. याशिवाय त्यांच्याकडे संदेशवहन करणारी अशी स्वतःची कबूतरं होती. सध्या च्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या पूर्ण जगाची माहिती कळते त्यामुळे आपल्याला याचे महत्त्व लक्षात येत नाही परंतु त्या काळात अशी माहिती सर्वात आधी मिळवणं भूषण मानले जाई. रॉथचिल्ड कुटुंबाच्या श्रीमंतीचे रहस्य त्यांच्या या माहिती मिळवण्याच्या ताकतीमध्येच सामावलेलं होतं.
रॉथचिल्ड कुटुंबाचा प्रमुख नॅथन रॉथचिल्ड हा अतिशय हुशार मनुष्य मानला जायचा. त्याला या लढाईची माहिती आणि निकाल सर्वात आधी कळणार हे सर्वांनाच माहिती होतं. त्यामुळे शेअर बाजारातील त्याच्या हालचालींवर सर्व गुंतवणूकदार लक्ष ठेवून होते. नॅथनने जर शेअर खरेदी सुरू केली तर समजून जायचं की इंग्लंडचा लढाईत विजय झाला आहे आणि त्याने जर त्याच्याकडील शेअरची विक्री सुरू केली तर समजायचं की इंग्लंडच्या लढाईत नक्कीच पराजय झाला. अर्थातच नॅथनलाही माहीत होतं की सर्व गुंतवणूकदार त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा - https://salil.pro/MBA
============================
ही लढाई 18 जून 1815 या दिवशी लढली गेली आणि त्या दिवशी रविवार असल्यामुळे नॅथनला दुसऱ्या दिवशीचा शेअर बाजार सुरू होण्याआधीच म्हणजे रविवारीच लढाईचा निकाल समजला होता. दुसऱ्या दिवशी सोमवारी म्हणजे 19 जून 1815 रोजी जेव्हा शेअर बाजाराचं कामकाज सुरू झालं तेव्हा नॅथनने शेअर खरेदी करण्याऐवजी शेअर विकायचा सपाटा लावला आणि स्वतः कडील शेअर धडाधड विकून टाकले. त्याच्या या कृतीने सर्व गुंतवणूकदार घाबरून गेले आणि त्यांनी सुद्धा त्यांच्याकडील शेअर्स विकायला सुरुवात केली. परिणामतः लंडन शेअर बाजार कोसळला आणि सर्व शेअरचे बाजारभाव पडले. चाणाक्ष नॅथनला शेअर खरेदी करण्याची ती मोठी संधी होती आणि ही संधी त्याने वाया घालवली नाही.
त्याच्या या डावपेचाने शेअर बाजारात एक नवीन वाक्यप्रचलित झालं जेव्हा. "शेअर बाजारात रक्ताचे पाट वाहत असतील तेव्हाच शेअर खरेदीची खरी संधी असते." लंडन शेअर बाजारातील त्या सोमवारची स्थिती पाहून तो दिवस "काळा सोमवार" म्हणून गणला गेला.
त्यादिवशी बाजार कोसळल्यानंतर नॅथनने शेअर खरेदी सुरू केली आणि एका दिवसात सुमारे 60 लाख पौंड नफा कमवला.
"जेव्हा शेअर बाजारात सर्वत्र भीतीच आणि दहशतीच वातावरण असतं तेव्हा शेअर खरेदी करण्याची खरी संधी असते" - बॅरोन रॉथचिल्ड
दीर्घकाळ बाजारात गुंतवणूक करायची असेल तेव्हा अशा संधीची वाट पहा जेव्हा इतर सर्व लोक घाबरून शेअर्सची विक्री करत असतील. अर्थात ते करणे सोपे नाही. आपण काय करतोय ते नीट माहिती पाहिजे आणि वाट बघण्याचा संयम पाहिजे. सगळ्यात महत्वाचा "पैसा" त्याच्याकडे जातो ज्याच्याकडे "माहिती" आहे !
अशाच रंजक आणि उपयोगी "माहितीसाठी" नेटभेटला अवश्य फॉलो करा.
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !