There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मी रूढार्थाने लेखक नाही. पण तरीही नेटभेटच्या व्यवसायासाठी (Content Marketing) मला ऑनलाईन लिखाण करावं लागतं. साहजिकच मी लिखाणासाठी AI टूल्स वापरून पाहिले. AI ला माझ्यासाठी लिहायला सांगितलं पण ते लिखाण फार साधं आणि नीरस होतं.
मग मला समजलं - समस्या AI मध्ये नव्हती, माझ्या दृष्टिकोनात होती! मी AI कडून Efficiency साठी काम करून घेत होतो पण Effective कामाची अपेक्षा करत होतो.
नवा approach: AI चा वापर efficiency साठी न करता, अर्थपूर्ण काम करण्यासाठी करू लागलो.
उदाहरणार्थ एखाद्या पर्वतावर चढण्यासाठी रोप-वे उपलब्ध असेल तरीसुद्धा गिर्यारोहक ते वापरत नाहीत कारण त्यांना अर्थ पर्वत चढण्यात मिळतो , वेगाने शिखरावर पोहोचण्यात नाही. मी देखील AI tools चा असाच वापर करायचं ठरवलं.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/Ip4ab5E7gGU52GQS3uC7pq
येथे क्लिक करा.
================
माझी नवी पद्धत :
- जे लिहायचं आहे त्यातील चहुबाजूंच्या मुद्द्यांसाठी AI ची मदत घेतो.
- सुरुवात कशी करावी यासाठी दोन -तीन वेगवगेळे पर्याय AI कडे मागतो.
- लिखाणात अडकलो की AI ला विचारतो "10 वेगळी उदाहरणे दे"
- त्याचे शब्द copy-paste नाही करत, फक्त ideas घेतो
- आता AI माझा brainstorming partner आहे, लेखक नाही
AI ला वेगाने काम करणारा कामगार म्हणून नव्हे तर अर्थपूर्ण मदत करणारा साथीदार म्हणून वापरा. AI तुमचा partner बनवा, replacement नाही!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!