ऊर्जेने आणि हेतूने जिंकलेले युद्ध

२३ ऑगस्ट १९४२ रोजी, जर्मन सैन्याची १६वी पॅन्झर डिव्हिजन स्टालिनग्राडजवळ (रशिया) पोहोचली होती.
त्यांच्याकडे १२,००० अनुभवी सैनिक. १३० रणगाडे होते. आणि हवाई मदतीला स्टुका बॉम्बफेक विमानं होती.
हा एक गुप्तपणे अचानक केलेला हल्ला होता आणि रशियन सैन्याला याची कल्पना नव्हती, त्यांचे बहुतेक सैनिक दुसरीकडे संरक्षणात्मक आघाडी तयार करण्यात गुंतले होते.
जर्मन सैन्याला फारसा विरोध अपेक्षित नव्हता. त्यांच्या मार्गात फक्त रशियाची १०७७ वी विमानविरोधी रेजिमेंट होती, ज्यामध्ये ३,००० पेक्षा कमी सैनिक होते.
जर्मनीसाठी ही लढाई सोपी असायला हवी होती, कारण पॅन्झर सैनिक संरक्षकांपेक्षा ४:१ च्या प्रमाणात जास्त होते.
रशियन सैनिकांकडे फक्त विमानविरोधी तोफा होत्या, ज्या त्यांना टँकविरुद्ध वापरायच्या होत्या.
तेव्हाच जर्मनांना पहिला धक्का बसला.
रशियन संरक्षकांनी त्यांच्या विमानविरोधी तोफा खाली करून थेट टँकवर गोळीबार सुरू केला. तीव्र गोळीबारात अनेक टॅंक उध्वस्त झाले. पॅन्झर डिव्हिजनला पुढे जाता येत नव्हते.
त्यांनी टँक थांबवले आणि हवाई समर्थन मागवले. स्तुका बॉम्बर विमानांनी रशियन तोफांवर हल्ला केला, तेव्हा रशियन तुकडीने पुन्हा तोफांची तोंडं वर करून थेट विमानांवर गोळीबार केला. हा हल्ला इतका अचूक आणि तीव्र होता की अनेक विमानं पडली. विमानांनाही माघार घ्यायला लागली.
काही तोफा विमानांवर आणि काही तोफा रणगाड्यांवर हल्ला करत होत्या.
जेव्हा टँक आणि विमाने दोन्ही तोफांना थांबवू शकले नाहीत, तेव्हा जर्मनांनी पायदळ पाठवले.
तेव्हाच त्यांना दुसरा धक्का बसला.
जवळच्या ट्रॅक्टर कारखान्यातील कामगार पण लढाईत सामील झाले, त्यांच्याकडे पहिल्या महायुद्धातील जुनाट रायफली आणि लोकल बनविलेल्या मोलोटोव्ह कॉकटेल बंदुका होत्या.

================ 

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOx... येथे क्लिक करा.

 ================

त्यांनी पायदळाशी लढा दिला, तर तोफखाने टँक आणि विमानांशी लढत होते. दोन दिवस ही लढाई चालली. अखेरीस, तोफा शांत झाल्या, रशियन सैनिक मृत्यूमुखी पडले.
या दोन दिवसात जर्मनांना ८३ रणगाडे, १५ बख्तरबंद गाड्या, २० विमाने आणि शेकडो सैनिकांचा जीव गमवावा लागला.
तेव्हाच जर्मनांना त्यांचा अंतिम धक्का बसला.
मृत सैनिकांची मोजणी करताना त्यांना समजले की, ज्यांच्याशी ते लढत होते त्या सैन्यात अर्ध्याहून अधिक तरुण मुली होत्या.
१०७७ रेजिमेंटला अग्रगण्य रेजिमेंट मानले जात नव्हते, त्यामुळे त्यात १८-२० वर्षांच्या मुली होत्या, ज्यांना योग्य प्रशिक्षणही मिळाले नव्हते.
एवढंच नव्हे तर पायदळाशी लढणाऱ्या जवळच्या ट्रॅक्टर कारखान्यातील कामगारांतही बहुतांश मुलीच होत्या.
जर्मनीच्या "स्पेशालिस्ट" पॅन्झर डिव्हिजनला त्यांच्या संख्येच्या एक चतुर्थांश अननुभवी मुलींना पराभूत करण्यासाठी दोन दिवस लागले.
त्या दोन दिवसांनी संपूर्ण जर्मन आगेकूच मंदावली. त्या दोन दिवसांनी रशियनांना शहराभोवती संरक्षण मजबूत करण्याची संधी दिली.
पुढे जर्मनीने स्टालिनग्राडची लढाई गमावली आणि एक दशलक्ष सैनिकही गमावले. स्टालिनग्राडची लढाईच दुसऱ्या महायुद्धातील जर्मनीच्या अंतिम पराभवाची सुरुवात करणारी ठरली.
या दोन दिवसांच्या लढाईत जर्मनीने गमावलेला वेळ आणि हानी इतकी निर्णायक होती की, १६व्या पॅन्झर डिव्हिजनच्या जनरल, वॉन व्हीटर्सहाइम यांना हिटलरने तात्काळ काढून टाकले.
एक जर्मन सैनिकाने लिहिले: “आम्हाला ३७ विमानविरोधी तोफांविरुद्ध इंच इंच लढावे लागले, सर्व त्या कणखर लढणाऱ्या महिलांनी चालवल्या होत्या, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्या अथक लढत होत्या.”
एक जर्मन वैमानिकाने लिहिले: “मी ब्रिटिश तोफांवरून दहा वेळा उड्डाण करणे पसंत कारेन, पण त्या रशियन विमानविरोधी तोफांवर एकदाही जाणार नाही.”
खूप वर्षांपूर्वी मी एका पुस्तकात एक प्रेरणादायी वाक्य वाचले होते "Energy and Intention beats Talent!" “ऊर्जा आणि उद्देश नेहमीच प्रतिभेला हरवतात.”
या प्रकरणात, रशियन मुलींकडे ‘ऊर्जा आणि उद्देश’ होता आणि निवडक पॅन्झर तुकडी ‘प्रतिभावान’ होती.
त्या दिवशी ऊर्जेने प्रतिभेला हरवले नाही. पण त्यांनी पुढे जाऊन युद्ध जिंकणारी लढाई जिंकण्यास मदत केली.
त्यांच्याकडे कमी माणसे, कमी तोफा होत्या. विमाने नव्हती तरी त्यांच्याकडे एक मोठा फायदा होता. - ऊर्जा आणि उद्देश !


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !