टर्म लाईफ इन्शुअरन्स पॉलिसी घेणं का महत्त्वाचं आहे ? चला जाणून घेऊया (#Finance_Tuesday)

भारतात एकंदरीतच अर्थव्यवस्थापन व इन्शुअरन्स पॉलिसीज याबाबत उदासिनता आहे. आपल्याला अर्थव्यवस्थापन करण्यात फारसा रस नसतो, आपल्याला असं वाटतं, की पैसे हातात आले आणि त्यानुसार खर्च करत गेलो की अर्थव्यवस्थापन आपलंआप नीट सुरळीत सुरू रहातं. पण हा अप्रोच योग्य नाही. कारण, जेव्हा आपल्यावर कोणतही संकट कोसळतं तेव्हा आपल्याजवळ गाठीशी पुरेसे पैसे नसतात आणि मग आपल्याला आपल्या ढिसाळ आर्थिक नियोजनाची जाणीव होते. परंतु तोवर वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच आर्थिक नियोजन अगदी सुरुवातीपासूनच करणं अत्यंत आवश्यक असतं. आपल्याला कोणालाच माहिती नाही की कोणाचं जीवन कधी संपणार, त्यामुळेच या अटळ प्रश्नाच्या दृष्टीनेच आपण स्वतःची व स्वतःच्या कुटुंबीयांची आर्थिक व्यवस्था चोख बजावून ठेवलेली अधिक उत्तम, आणि याचसाठी आपल्याला टर्म इन्शुरन्समध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते. भारतात, जीवन विमा उतरवण्याबद्दल जेवढी जागृती आहे, त्या तुलनेत टर्म इन्शुअरन्सबद्दल तेवढी जागृती नाही, तसंच अनेकांना वाटतं की टर्म इन्शुअरन्समध्ये आपल्याला परतावा तोवर मिळणार नाही जोवर आपला मृत्यू होत नाही, त्यामुळे हा पैसा गुंतवून काहीच उपयोग नाही, तो केवळ वायाच जाईल, आपल्याला त्या पैशाचा काहीच उपयोग होणार नाही, त्यामुळे अनेकजण टर्म इन्शुअरन्सबाबत उदासीन असल्याचे दिसते. मात्र प्रत्यक्षात हा विमा उतरवणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण -

1. जीवन अशाश्वत आहे

जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा जीवीत हानी तर होतेच मात्र त्याचबरोबर वित्तहानीही मोठ्या प्रमाणावर होते हे आपण सगळे जाणतोच. अशावेळी ज्यांनी इन्शुअरन्स केलेला नसतो अशा लोकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते व त्याची झळ त्यांच्या कुटुंबाला पोचते. तसंच, ज्यांनी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेऊनही त्यांचे हफ्ते चुकवलेले असतात, त्यांनाही त्या पॉलिसीजचा काहीच फायदा होत नाही. अनेक जण पॉलिसी तर घेतात पण ती मध्येच अर्धवट सोडून देतात. हफ्ते वेळेवर भरत नाहीत आणि त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसतो. म्हणूनच, टर्म लाईफ इन्शुअरन्स घेताना आर्थिक नियोजन पूर्वीच करून आपल्या क्षमतेनुसार पॉलिसी घेतली पाहिजे.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

याउलट काही जण ओव्हर इन्शुअर्ड असतात, म्हणजेच काय तर भारंभार पॉलिसी घेत प्रिमिअम भरतात, ज्याचीही काहीच गरज नसते. स्वतःच्या आर्थिक बाजूचा नीट अभ्यास करून स्वतःच्या व कुटुंबाच्या गरजा पुरवेल एवढ्याच टर्म इन्शुअरन्स पॉलिसी घ्याव्यात. बरेच जण, केवळ एजंटच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन पॉलिसी घेतात. तसं कधीही करू नका. विमा एजंटने सांगितलेल्या पॉलिसीचा स्वतः नीट अभ्यास करा आणि मगच कोणत्याही टर्म इन्शुअरन्स पॉलिसीमध्ये पैसे गुंतवा.

आपल्याकडे टर्म इन्शुअरन्सला अनेकजण गुंतवणूक म्हणून बघतात आणि त्यांना असं वाटतं, की या पॉलिसीच्या कालावधीत जर आपण मेलो नाही तर आपल्याला काहीच परतावा मिळणार नाही, म्हणून अनेकजण याबद्दल उदासिन असतात. मात्र, अशा दृष्टीने टर्म इन्शुरन्स न काढणे हे तुम्हाला भविष्यात आर्थिक बाबींकरिता अडचणीत टाकणारे असू शकते.

2. जेव्हा देवाघरचं बोलावणं येतं तेव्हा जावंच लागतं...

हे वाचताना थोडंस अवघडल्यासारखं होईल, मात्र, मृत्यू हे जीवनाचं सत्य आहे हे विसरून कसं चालेल.. म्हणूनच, कोणीही व्यक्ती जेव्हा अकाली निधन पावते त्यानंतर त्या व्यक्तीच्या क्रीयाकर्मासाठी जो पैसा लागतो त्याचं ओझं इतरांवर कशाला टाकायचं..? हा खर्च तुम्हाला टर्म इन्शुअरन्सद्वारे मिळू शकतो.

3. शिक्षणाचा व उच्चशिक्षणाचा खर्च -

दिवसेंदिवस शाळा व महाविद्यालयांमधील शिक्षणाकरीता लागणारा पैसा, फीज वाढतच चालली आहे. मग हा पैसा कोठून येणार ? त्यासाठी पूर्वतयारी म्हणून टर्म इन्शुअरन्स घेऊन ठेवायला हवे. जर शिक्षणासाठी आधीच आर्थिक नियोजन केलेले नसेल तर भविष्यात शिक्षणासाठी कर्ज काढावे लागू शकते आणि हा कर्जाचा भार डोईवर वाढतच जाऊ शकतो. हे दुष्टचक्र नको असेल तर आर्थिक नियोजन करायलाच हवे व त्यामध्ये टर्म इन्शुअरन्सचा महत्त्वाचा वाटा असू शकतो.

याबाबत आणखीही काही मुद्दे आहेत, त्याविषयी जाणून घेऊया याच लेखाच्या पुढल्या भागात पुढच्या मंगळवारी..

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy