There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
फिलीपाईन्समध्ये पेप्सी कंपनीने नंबर फीव्हर नावाचं एक मार्केटींग कँपेन केलं. हे कँपेन करताना कंपनीकडून एक चूक झाली आणि त्यामुळे मार्केटींग कँपेन पूर्णतः अयशस्वी झालं, इतकंच नव्हे तर या कँपेनच्या विरोधात जनउद्रेक इतका प्रचंड होता की लोक चिडले आणि संपूर्ण प्रकरण चिघळलं. अक्षरशः पाच जणांचा जीवही गेला. ही थरारक घटना पेप्सीच्या इतिहासातील काळा दिवस ठरली.
ब्रँडींग, मार्केटींग करताना किती सावधानता पाळायला हवी हेच या उदाहरणातून शिकायला मिळतं. किंबहुना वरवर अगदी सहज सोपं साधं वाटणारं हे मार्केटींगचं काम प्रत्यक्षात किती जबाबदारीचं आणि महत्त्वाचं आहे हे देखील या उदाहरणातूनच शिकायला मिळतं.