There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Procrastination म्हणजे आजचे काम उद्यावर ढकलणे. आपल्या सर्वानाच काही न काही प्रमाणात हा असाध्य रोग जडलेला असतोच.
खरंतर आपल्याला नकोशा असलेल्या गोष्टीच आपण पुढे ढकलत असतो. पण बऱ्याच गोष्टी आवडत्या नसल्या तरी गरजेच्या मात्र असतातच.
काम पुढे ढकलण्याचं आणखी एक मानसिक कारण असतं ते म्हणजे "अपयशाची भिती"
आपल्या एकंदर समाजात आणि संस्कृतीत अपयशाची फार हेटाळणी केली जाते. त्यामुळे अपयशाच्या भीतीने आपण अनेक गोष्टी हातीच घेत नाही.
मूळ कारण हेच असलं तरी आपण वरवर मात्र ते मान्य देखील करत नाही. आणि मग स्वतःलाच वेगवेगळी कारणं द्यायला लागतो. Preperation म्हणजे तयारी करणे हे एक सर्वांचं आवडतं कारण आहे.
मी बिझनेस अजून सुरू केला नाही कारण मी अजून तयारी करतोय, मी यूट्यूब चॅनेल अजून सुरू केला नाही कारण मी चांगले विडिओ कसे बनवायचे त्याचा अभ्यास करतोय, मी अजून बाहेर जॉब शोधायला सुरुवात केली नाही कारण मी जरा माझा बायोडाटा नीट पुन्हा लिहिणार आहे, मी अजून सेल्स पूर्ण केला नाही पण चार ग्राहकांसोबत बोलणी चालू आहेत.....
हे असं सांगून आपण स्वतःलाच समजावत असतो की मी चालढकल करत नसून प्रगती करतोय. मित्रांनो prepration ला procrastination बनवू नका. Action is the best preperation. कृती केली नाही तर काहीच होणार नाही.
===================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
===================
एखाद्या गोष्टीची भीती घालवायची असेल तर त्यावर action घेणे हाच प्रभावी उपाय आहे. रोज एक पाऊल पुढे जाणे हे आहे तिथेच राहण्यापेक्षा किंवा मागे जाण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे.
रोज सकाळी आरशासमोर उभे राहून स्वतःला एकच सांगायचं की आज माझ्या ध्येयाकडे जाण्यासाठी मी ......... हे करणार आहे. थोडे दिवस असं ठरवूनही तुम्ही चालढकल करणारच पण जास्त दिवस स्वतःला फसवू शकणार नाही. काही दिवसातच आपणच आपल्याला उत्तरदायी होऊ. आणि हे जेव्हा होईल तेव्हा कोणत्याही motivation ची गरजच भासणार नाही
मग आज तुम्ही काय action घेताय ?
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com