There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
अनेक छोटे व्यावसायिक, नव्यानेच उद्योग व्यवसाय सुरू केलेले उद्योजक यांना लवकर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करायचा असतो, त्यासाठी ते दिवसरात्र एक करत असतात.. ते भराभर स्टाफ वाढवतात, ऑफीसेस घेतात, कंपनी सुरू करतात आणि बरेचदा नंतर त्यांना तो सगळा डोलारा नीट मॅनेज न करता आल्याने त्यांची स्वप्न तशीच हवेत विरून जातात. हे असं होऊ नये म्हणूनच आज या काही टिप्स खास तुमच्यासाठी -
1. Two Pizzas Rule -
जॅफ बेझोस सांगतात, की प्रत्येक नव्या स्टार्टअप्सनी आपल्या स्टाफची संख्या इतकी कमी ठेवायला पाहिजे की सगळ्या टीम मेंबर्सचं पोट मीटींगनंतर सगळ्यांमिळून फक्त दोन पिझ्झा खाऊन भरलं पाहिजे. किती सोप्पाय ना हा नियम.. हाच नियम तरूण उद्योजकांनी पाळला पाहिजे असं ते सांगतात. यामुळे काय होतं की टीममधील मेंबर्सची वर्क एफीशिअन्सी कायम रहाते. आवश्यकतेपेक्षा जास्त स्टाफ आणि मोठं ऑफीस हे बरेचदा आर्थिक नुकसानीचं कारणंही ठरतं.
2. तुमच्या नाखूश ग्राहकांकडून शिका -
बिल गेट्स म्हणतात, की जर तुम्हाला तुमचा स्टार्टअप यशस्वी करायचा असेल तर तुमच्या नाराज, नाखूश ग्राहकांकडे दुर्लक्ष करू नका. यांचा फीडबॅक खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या आयडीया, सर्व्हीस आणि बिझनेसमध्ये काय काय सुटून जातंय हे तुम्हाला याच लोकांकडून थेट कळू शकतं आणि मग तुम्ही तुमच्यात वेळीच बदल घडवू शकता.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
3. गुणवत्ता फार महत्त्वाची..
तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत कधीही तडजोड करू नका, लक्षात ठेवा, क्वांटीटीपेक्षा क्वालिटी फार फार महत्त्वाची असते. याचं कारण, जर तुमचं उत्पादन चांगलं असेल तर लोक तुमच्या कंपनीशी कायमचे जोडले जातात.. ते तुमच्याशी छान नातं ठेवतात, पण हेच जर तुम्ही त्यांना विकलेलं उत्पादन खराब असेल तर लोकांचं तुमच्या कंपनीविषयीचं मत कायमस्वरूपी खराब होऊ शकतं आणि त्याचा फार मोठा फटका तुम्हाला, तुमच्या कंपनीला दीर्घकालपर्यंत बसू शकतो.
4. मार्केटकडे लक्ष ठेवा -
केवळ सोशल मीडिया कँपेन करणं पुरेसं नाहीये.. सेल्स आणि मार्केटींगची स्कील्स वापरून तुम्हाला प्रत्यक्षात तुमचं प्रॉडक्ट विकता आलं पाहिजे. म्हणूनच मार्केटकडे लक्ष ठेवा.
5. आर्थिक नियोजन उत्तम करा -
लक्षात घ्या, तुम्हाला पहिल्या दिवसापासून केवळ नफा मिळविण्याकडे जरी लक्ष देणं गरजेचं वाटत असेल तरीही तितकंच गरजेचं आहे ते म्हणजे आर्थिक नियोजन उत्तम करणं. बरेचदा, खर्च आणि नफा यांचा ताळमेळ बसत नाही, आणि त्याचबरोबर लाँग टर्मसाठी आर्थिक नियोजन तर केलेलंच नसतं, त्यामुळे तुमची अक्षरशः वाट लागते. म्हणून नेहमी पहिल्या दिवसापासूनच नफ्यातून एवढी रक्कम बाजूला काढायला लागा जी तुम्हाला अडचणीच्या काळात मदतीला येईल. किंबहुना, अडचणीच्या काळाचं आर्थिक नियोजन स्वतंत्रपणे केलेलं असेल तर फारच उत्तम..
एकंदरीतच लघुउद्योजकांकरिता त्यांचा व्यवसाय चालवणं, स्टार्टअप्स छान सुरू ठेवणं हे एकप्रकारचं आव्हानच असतं. त्यामुळे हे आव्हान पेलताना ही सगळी तयारी ठेवणं व नीट ताकदीने झेप घेणं फार महत्त्वाचं आहे .. हे लक्षात ठेवा.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com