There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आपल्या प्रत्येकालाच हल्ली आपला इंटरनेटवरचा प्रेझेन्स फार महत्त्वाचा झाला आहे. आपल्या कामाविषयीची माहिती इतरांपर्यंत पोचवण्यासाठी इंटरनेटसारखं प्रभावी माध्यम हातात आल्यापासून प्रत्येकचजण या माध्यमाला खूप गांभीर्याने घेऊ लागला आहे. अशातच, अनेक उद्योगसमूह आपल्या वेबसाईट्स ओपन करून त्यावर आपली माहिती आणि काम शेअर करू लागले आहेत. आपली उत्पादनेही त्यांना आपल्या वेबसाईट्सवरून विकता येतात. बड्या उद्योगांसाठी वेबसाईट्स हा उत्तम पर्याय आहे अगदी तसंच, छोटे व्यावसायिक वा स्वतंत्रपणे आपापला व्यवसाय वा छंद जोपासणाऱ्यांसाठीही सोशल मीडिया प्रोफाईल बनवण्याचा उत्तम पर्याय आहे. मात्र, केवळ प्रोफेशनली जर आपलं काम समोरच्यांना दाखवायचं असेल तर अशांसाठी कार्ड्स (https://salil.pro/carrd) नावाची एक वेबसाईट आहे ज्यावरून तुम्ही तुमच्या कामाची सिंगल पेज प्रोफाईल मोफत बनवू शकता आणि तुमच्या संपूर्ण कामाची झलक त्यावरून इतरांना दाखवू शकता.
या साईटचे दोन व्हर्जन्स आहेत, एक मोफत (फ्री) आणि दुसरं म्हणजे प्रो अर्थात सशुल्क .. पेड व्हर्जन.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
फ्री व्हर्जनमध्ये तुम्हाला सिंगल पेज, सिंपल किंवा रिस्पॉन्सिव्ह प्रोफाईल पेज मोफत बनवता येईल. त्यासाठी वेबसाईटतर्फे देण्यात आलेले शेकडो टेम्प्लेट्स तुम्ही वापरू शकता किंवा अगदी कोरा कॅनव्हासही वापरू शकता.
पेड व्हर्जनमध्ये तुम्हाला कस्टम डोमेन मिळतो तसंच तब्बल तीन प्रोफाईल पेजेस बनवता येतात. त्याचबरोबर त्यामध्ये फॉर्म्स वापरता येतात, विजेट्स आणि एम्बेड्स वापरता येतात. गुगल अनॅलिटीक्सचा वापर करता येतो आणि मुख्य म्हणजे कार्ड्सचं ब्रँडींग न करताच तुम्हाला हे सगळं वापरून तुमची प्रोफाईल त्यावर क्रिएट करता येते.
फोटोग्राफर्स, खेळाडू, क्रिएटर्स, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार, तसंच विविध कला जोपासणाऱ्या मंडळींसाठी ही एक अत्यंत उपयुक्त अशी वेबसाईट आहे.
प्रो व्हर्जनमध्येही तुम्हाला तीन पर्याय मिळतात, प्रो लाईट, प्रो स्टॅंडर्ड आणि प्रो प्लस. या तिन्ही पर्यायांमध्येही किंमतीनुसार आणखी अडव्हान्स फीचर वाढत जातात असे प्रत्येक ऑप्शनमध्ये आणखी बरेच पर्याय आहेत. यामध्ये जसा दर वाढतो तसे फीचर्स वाढत जातात. तुम्ही तुमच्या गरजेनुरूप व बजेटनुसार प्लॅन निवडू शकता आणि तुमच्या कामाचं प्रोफायलिंग उत्तमरित्या या वेबसाईटवरून करू शकता.
( कार्ड्सवरून आपली प्रोफाईल बनविण्यासाठी या लिंकवर क्लिक
करा - https://salil.pro/carrd )
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com