गणितीय परिमाणांतील बदल झटपट करण्यासाठी वापरा ही वेबसाईट (#Web_wednesday)

अनेक ठिकाणी, अनेक वेळा आपल्याला गणितीय परिमाणं वापरावी लागतात. आर्कीटेक्ट्स, बिझनेसमन किंवा अन्य कोणीही ज्याचा दिवसभरात खूप आकडेमोडीशी संबंध येतो त्यांच्यासाठी https://www.unitsconverters.com/en/ ही एक वेबसाईट अत्यंत उपयुक्त आहे.

या वेबसाईटवर तुम्हाला एका एककाचे रूपांतर दुसऱ्या एककात करणे सहजी शक्य होते. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला एक किमी म्हणजे किती मीटर याचं उत्तर माहिती नसेल तर या साईटवर जायचं आणि तिथे असलेल्या कॅल्क्यूलेटरवर हे गणित सोडवायचं, की लगेच तुम्हाला उत्तर मिळेल..

1 किमी = 1000 मीटर

अशाच प्रकारे तुम्ही कोणतंही परिमाण अन्य दुसऱ्या परिमाणांमध्ये कन्व्हर्ट केल्यास त्याचे नेमके उत्तर तुम्हाला येथे सहज मिळते.

यातही विविध गणितीय पद्धतींचे वर्गीकरण येथे केलेले आढळते. जसं, लांबी, रूंदी, एक्सलरेशन, एनर्जी, एरीया, स्पीड, प्रेशर, पॉवर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, टाईम, वेट आदी अनेक प्रकारांचा समावेश यात करण्यात आलेला आहे. त्यामुळे अवघड गणितं, जी खरंतर त्या त्या व्यवसायांसाठी करणं फार गरजेचं असू शकतं, ती करताना अत्यल्प वेळेत तुम्हाला उत्तर बसल्याजागी मिळू शकेल याची काळजी या वेबसाईटने घेतलेली आहे. इतकंच नव्हे तर हे अमुक उत्तर कसं काय आलं, त्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरण्यात आला त्याचीही माहिती प्रत्येक आकडेमोडीनंतर आपल्यासमोर देण्यात येते. त्यामुळे आपणंही तो फॉर्म्युला लक्षात ठेऊन भविष्यात तो वापरू शकतो. एकंदरीत काय, गणिताचा अभ्यास करण्यासाठी म्हणा ना, ही वेबसाईट खूप मोलाची ठरते.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

विविध भाषांमध्येही उपलब्ध -

या वेबसाईटवर तुम्हाला विविध भाषांमध्येही ही सर्व गणितीय आकडेमोड करता येते. हिंदी, फ्रेंच, स्पॅनिश, मराठी, पोर्तुगीज, जर्मन, पोलीश, डच, इटालियन, गुजराती,पंजाबी, टर्कीश, कोरीअन आदी भाषांमध्ये ही वेबसाईट काम करते, अर्थात, या भाषेतून तुम्ही युनिट कन्व्हर्जन्स करू शकता.

गणित, भौतिकशास्त्र, चुंबकत्त्व, वीज, यांत्रिकी, संगणक, भूगोल, आरोग्य, अन्न, मद्यपान, द्रवपदार्थ, उष्णता, फोटोमेट्री, रेडीओलॉजी, केमिकल, इंधन, ऊर्जा, घनता, तापमान अशा अनेक विषयांशी संबंधित गणितीय आकडेमोड व परिमाणं बदल याची थेट आकडेमोड करून आपल्याला येथे उत्तरं मिळू शकतात. मोठमोठ्या उद्योगांमध्ये, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्स, भूगोलाशी संबंधित कार्य करणाऱ्या लोकांसाठी, शिक्षक, पालक व विद्यार्थी या सगळ्यांसाठी ही वेबसाईट म्हणूनच कामाची ठरते आहे.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy