कंटेंट मार्केटींगसाठी वापरा या टिप्स (भाग 2) 

(#Buz_Thirsday)

मित्रांनो, कंटेंट मार्केटींगसाठी कंटेंटचे निरनिराळे घटकही तितकेच प्रभावी हवेत. हे घटक कोणते, आणि ते प्रभावी करण्यासाठी तुम्ही कोणकोणती साधनं वापरू शकता याविषयी जाणून घेऊया आजच्या लेखात ...

लक्ष्यवेधी व्हिज्युअल्स -
केवळ उत्तम लिखाण म्हणजे कंटेंट मार्केटींग नाही तर तुमच्या लिखाणातून एक छान संपूर्ण समग्र अनुभव वाचकांना मिळायला पाहिजे. कॅन्व्हा सारख्या उत्तम वेबसाईट्सचा वापर करून तुम्ही छान लक्ष्यवेधी व्हिज्युअल्सही तयार करू शकता. त्यामुळे तुमचा मजकूर जास्त प्रभावी ठरेल. कॅन्व्हा ही एक मोफत वेबसाईट असून त्यावर तुम्ही टेम्पलेट्स वापरू शकता. मजकूराशी संलग्न असे फोटोज निवडून त्यावर मजकूर लिहून त्या इमेजेस मजकूरासह जोडू शकता. याशिवाय, काही महत्त्वाच्या बाबी ज्यांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे त्या म्हणजे -
1. तुमचा मजकूर दोन चार परिच्छेदात विभागलेला असावा.
2. एकेक परिच्छेद फक्त चार पाच वाक्यांचा, अर्थात छोटा असावा.
3. रंगांचा वापर आवश्यक तिथे व योग्य प्रकारे करावा. काँट्रास्ट कलर्स वापरू नका.
4. थोडेसे मोठे, ठळक फाँट वापरा.
5. उपशीर्षकांचा वापर करा, लाईन स्पेसिंगचा योग्य वापर करा. बुलेट पाँईंट्स आणि अन्य फॉर्मॅटींग टूलचा वापर करा.

वाचनमूल्य -
जर तुमचा कंटेंट (मजकूर) वाचताना पहिल्या काही ओळीतच वाचक जांभया देऊ लागले तर याचा अर्थ तुमच्या मजकूराला अजिबात वाचनमूल्य नाही असा त्याचा अर्थ आहे. तुमचा मजकूर तेव्हाच शेअर केला जातो जेव्हा तो वाचनीय असतो. अर्थात, वाचकांना तो मजकूर वाचताना काहीतरी मूल्य वा रंजकता मिळाली पाहिजे.

मग यासाठी काय करायला हवं, तर सर्वप्रथम या माध्यमाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. या माध्यमातील मजकूर हा पाठ्यपुस्तकीय भाषेतील असू नये याची काळजी घ्या. अर्थात, हे एक इंटरॅक्टीव्ह माध्यम असल्याने या माध्यमात प्रसिद्ध होणारा मजकूर हा जितका संवादात्मक असेल तितका उत्तम. वाचकांशी जोडणारा, वाचकांना जोडणारा आणि वाचकांना भावनात्मक पातळीवर आपल्यासह जोडून ठेवणारा मजकूर अधिक वाचनीय ठरतो व क्षणार्धात प्रचंड शेअर होतो. तुमचा मजकूर वाचताना वाचकांना स्वतःच्या जीवनातील तसे प्रसंग आठवले, त्यांच्या मनात विविध भावनांच्या छटा उमटल्या तर तो मजकूर अधिक आवडतो.

असा मजकूर तयार करण्यासाठी या काही टिप्स -

1. वाचकांना आपलंस करा -
त्यासाठी असे विषय निवडा जे सर्वांच्या मनात असतात. असे अनुभव लिहा जे कदाचित इतरांपेक्षा वेगळे असतील पण तरीही त्याचा कनेक्ट प्रत्येक वाचकाला स्वतःच्या जीवनात सापडेल. तुमच्या जीवनातील अडचणी, त्यावर तुम्ही कशा पद्धतीने मात केलीत, तुमचं एखाद्या विषयावरचं मत किंवा म्हणणं मांडा.

2. वाचकप्रिय मजकूर महत्त्वाचा -
संवादात्मक शैली, उद्गारवाचक वाक्यांची पेरणी, भावनिक आवाहन आणि थोडक्यात पण मुद्देसूतपणे लिहीलेला मजकूर चटकन लोकप्रिय होतो. थोडंस कथाकथनाच्या शैलीत केलेलं लिखाण पण ज्यात फार जास्त नाट्मयता नसेल असं लिखाण बहुतेकदा लोकांच्या पसंतीस पडतं.

3. कृतीपर लिखाण -
जनरली, लोक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील मजकूर का वाचतात माहितीये .. तर त्यांना तो मजकूर वाचून चटकन काहीतरी त्या पद्धतीची कृतीही करायची असते. म्हणूनच अशा वाचकांसाठी तुमचं लिखाण मुद्देसूत आणि स्टेप बाय स्टेप मांडणी केलेलं असावं.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

4. प्रभावशाली व्यक्ती जोडा -
तुमच्या पेजशी किंवा तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये जितके अधिक प्रभावशाली व्यक्ती असतील तितके तुमचे पेज किंवा वॉल अधिक प्रभावशाली दिसते. म्हणूनच तुमच्या पेजशी किंवा वॉलशी अधिकाधिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्यक्ती जोडा. त्यांच्या नावामुळेही तुमचे वाचक वाढतील. अनेकजण सोशल मीडियावर आपल्या आवडत्या नेत्याला, हिरो वा हिरोईनला, प्रभावशाली लेखकांना इतकं फॉलो करत असतात की जिथेही त्यांचं नाव जरी दिसलं तर तिथे त्यांचे फॉलोअर्स जाऊन पोचतात. म्हणून अशा व्यक्ती, ज्या प्रचंड प्रभावशाली आहेत त्यांना तुमच्या पेजशी कनेक्ट करून घ्या. या प्रकारच्या कंटेंटला “ego bait” content म्हणतात.

5. विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी जोडा -
सोशल मीडियावर विविध क्षेत्रातील असंख्य सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्स आहेत. मार्केटींग, ट्रॅव्हल, एज्युकेशन, हेल्थ, फिल्म्स, म्यूझिक अशा एक ना अनेक क्षेत्रातील सेलिब्रीटी सोशल मीडियाचा वापर करून दिवसरात्र आपली प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत भर घालताना दिसतात. एकट्या इन्स्टाग्रामवरच म्हटलं तर तब्बल 3.1 billion एवढ्या मोठ्या संख्येने इन्फ्लुएन्सर्स आहेत. BuzzSumo सारख्या वेबसाईट्सवरून एकेका कीवर्डनेही तुम्ही की इन्फ्लूएन्सर्स शोधू शकता.

6. अत्यंत लक्ष्यवेधी मथळे -
उपलब्ध आकडेवारीनुसार 10 वाचकांपैकी फक्त 4 वाचक तुमचा पूर्ण मजकूर वाचतात असे आढळून आले आहे. याचा अर्थ, तुमच्या वाचकांपैकी बरेच वाचक केवळ तुमच्या मजकूरातील महत्त्वाचे मुद्देच वाचत असतात. म्हणूनच, मुळातच तुमच्या मजकूराचं शीर्षक जितकं लक्षवेधी असेल तितके वाचक तुमच्या पेजवर, ब्लॉगवर किंवा वेबसाईटवर अधिक खेचले जातील. म्हणूनच, मथळे अत्यंत लक्षवेधी असावेत. त्याचबरोबर मजकूरही फारच उत्तम असावा याकडे लक्षा द्या. शब्दमर्यादेचं भान ठेवा. भारंभार अवघड व जड शब्द वापरून लिहीलेला मजकूर तितकासा वाचनीय ठरत नाही, त्याऐवजी, सोप्या सुटसुटीत भाषेतील मजकूर, सहज कथनात्मक शैली यामुळे मजकूर अधिक वाचनीय ठरतो. प्रश्नार्थक मथळे, कृती करण्यासाठी उद्युक्त करणारे मथळे यांचा वापर केल्यास तो मजकूर अधिक उठावदार होतो. लांबच लांब मथळे लिहीण्यापेक्षा छोटे व थेट काहीतरी सांगणारे मथळे उत्तम. हेडींग अनेलायझर सांगते की तुमच्या मजकूराचा मथळा साधारणपणे 55 कॅरेक्टर्स इतका असावा, असा मथळा वाचकांना गुंतवून ठेवण्यात अधिक यशस्वी होतो. त्याचबरोबर सर्च इंजिनमध्येही असा मथळा अधिक वेळा सर्च केला जातो. कीवर्ड ऑप्टीमायझेशन केल्याने तुमच्या मजकूराचा reach वाढतो. हेडलाईन अनालायझर सारखे टूल्स वापरून तुमच्या मजकूराचे योग्य ते मथळे आणि त्यासाठीचे कीवर्ड तुम्ही नेमके योजू शकता.

7. शेअर करण्यासाठी योग्य असे घटक मजकूरात वापरणे -
तुमचा मजकूर इतरांना चटकन शेअर करावासा वाटला पाहिजे यासाठी त्या मजकूरात असे काही घटक पेरावे लागतात ज्यामुळे वाचकांना तो मजकूर शेअर करण्याची कृती करावीशी वाटेल व ते तो मजकूर शेअर करतील. त्यासाठी कधी नुसतीच त्या पद्धतीची शब्दयोजना करावी लागते, जसं, 'आमचा लेख आवडल्यास जरूर शेअर करा' असं सांगूनही कधी काम होतं तर कधी कधी मजकूरात असे काही एलिमेंट्स वापरावे लागतात जे लोकांना फार आवडतील. मजकूरासोबत शेअरचा ऑप्शन किंवा शेअरचं बटन दिलेलं असावं. वेळोवेळी वाचकांना थेट वा अप्रत्यक्षपणे तुमचा मजकूर शेअर करण्याचं आवाहन केलेलं असावं. अगदी तसंच .. जसं आम्ही नेटभेटच्या लेखाच्या अखेरीस तसं आवाहन आमच्याही सर्व वाचकांना वेळोवेळी करत असतो.

मित्रांनो, आजचाही हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना हा लेख जरूर शेअर करा आणि असेच लेख मिळवण्यासाठी आमच्या नेटभेटच्या पेजला फॉलो करत रहा..


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy