There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
या एका प्रकारचे ग्राहक मिळू नये असे प्रत्येक सेल्समन ला मनोमन वाटत असते. Non- Urgent म्हणजे विकत घेण्याची इच्छा आहे पण घाई नाही असे ग्राहक. खूप वेळा सेल्समन बराच काळ फॉलो अप करत राहतो पण ग्राहक काही तयार होत नाही आणि बराच वेळ गेल्यानंतर सेल्समन ला कळतं की आपण उगाचच वेळ वाया घालवला.
मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा तीन टिप्स की ज्या वापरून तुम्ही अशा प्रकारच्या ग्राहकांनाही योग्य प्रकारे हाताळू शकाल -
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
1. स्वतःची मानसिक तयारी करा ( Mindset)
बऱ्याच वेळा ग्राहक विकत घेण्याची बिलकुल घाई नाही असं दाखवतात पण माझ्या सेल्स प्रोफेशनल मित्रानो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की खरंच गरज असल्याशिवाय कोणीही तुम्हाला वेळच देणार नाही. नाहीतर सगळी महत्वाची कामं सोडून ग्राहक सेल्समन समोर का बसतील ? प्रॉडक्टची माहिती घेतील, किंमत विचारतील आणि तरीही मला घाई नाही असं जेव्हा म्हणतील तेव्हा बिलकुल निराश होऊ नका. १०० पैकी ९० ग्राहक फक्त हे कारण म्हणून पुढे करत आहे हे ध्यानात ठेवा.
2. घाई करण्याची का गरज आहे हे थेट न सांगता indirectly सांगण्याचा प्रयत्न करा-
असे ग्राहक, ज्यांना खरेदीत रस नाही असं त्यांचं म्हणणं आहे, अशा ग्राहकांना तुमच्याजवळील एखाद्या उत्पादनाची प्रत्यक्षात किती गरज आहे हे तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला त्यांची मनधरणी करायची किंवा खूप Push करण्याची अजिबात गरज नाही. त्यापेक्षा, ते उत्पादन त्या ग्राहकाच्या जगण्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही त्यांना योग्य प्रश्नांद्वारे पटवून द्या.
नंतर घेण्याऐवजी आताच जर का उत्पादन घेतलं तर त्यांना काय फायदा होईल ? वेळ कुठे वाचेल ? पैसे कसे वाचतील ? पैसे कसे वाढतील ? कष्ट कसे कमी होतील ? याचे शाब्दिक चित्र रंगवा. Opportunity Cost किती जास्त आहे हे ग्राहकांना योग्य शब्द वापरून समजावण्याचा चांगला सराव करा.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
3. तत्क्षणी खरेदी करायला लावण्यावर भर द्या -
जर तुमचं उत्पादन लगेच खरेदी करण्याऐवजी काही काळाने खरेदी करू असं उत्तर ग्राहकाने दिलं तर अशा ग्राहकाला तुम्ही आता खरेदी करणे कसे फायद्याचे आहे ते सांगा. यासाठी आपल्या ऑफर मध्ये Limited Time (मर्यादित वेळ), Early Bird Offer (लवकर घेणाऱ्यास प्राधान्य), Quotation Validity (दिलेल्या किमतीची वैधता), Future Scarcity (भविष्यातील टंचाई) इत्यादी वैशिष्ट्ये समाविष्ट करा.
👉लक्षात ठेवा ग्राहक "प्रॉडक्ट" बघून आकर्षित होतो, "किंमत" बघून पुढे बोलतो आणि "ऑफर" बघून खरेदी करतो !
✅✅ Free Gift एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेण्यामागे प्रत्येक ग्राहकाच्या मनात काही विचार दडलेला असतो. एकदा का ग्राहकांचं हे मानसशास्त्र समजलं की कोणतीही वस्तू विकता येणे सहज शक्य होतं. ग्राहक नेमके विकत का घेतात ? याचे उत्तर देणारा जबरदस्त ऑनलाईन कोर्स "Why People Buy" आम्ही नेटभेटतर्फे पूर्णपणे मोफत दिला आहे , कोर्स मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - https://learn.netbhet.com/s/store/courses/description/Why-People-Buy
एकंदरीतच, जो ग्राहक तुमच्यासमोर उभा आहे तो खरेदी करण्यासाठीच आलेला आहे हे तुम्ही मनोमनी ओळखा.. कारण, खरेदीच करायची नसेल तर कोणी कष्ट घेईलच कशाला नं हे सत्य लक्षात घ्या आणि आलेल्या प्रत्येक वरवर निरूत्साही वाटणाऱ्या ग्राहकाला आत्मविश्वासाने दमदार विक्री करा.. !
धन्यवाद
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com