गुगलसोबत करा आता तुमची गिटार ट्यून (#Techie_Tuesday)

आपल्याजवळचं कोणतंही वाद्य सुरांत लावायचं म्हणजे अनेकांना किंचीतशी धास्तीच वाटत असते. तुम्ही विचार करत असाल की आज टेक्नॉलॉजीच्या विषयात आम्ही संगीताबद्दल का बोलतोय अचानक .. तर त्याचं कारण हे आहे की आता तुम्हाला गुगल सर्चच्या सहाय्याने तुमच्याजवळील कोणतंही वाद्य ट्यून करता येणार आहे. अँड्रॉईड पॉलीसीनुसार आता गुगल सर्च इंजिनमध्ये तुम्ही तुमच्या वाद्यासाठी ट्यूनर सर्च करताच समोर एक इन्स्ट्रूमेंट ट्यूनर लाँच होईल. तुम्ही वाद्याची जुळणी करायला लागलात की या ट्यूनरवर तुम्हाला लगेचच तुम्ही योग्य ट्यून केलंय की नाही तुमचं वाद्य हे दाखवलं जाईल. त्यासाठी एक ऑटोट्यूनर गुगलसर्च ऑप्शनमध्ये जनरेट झालेला असेल. मुख्य म्हणजे तुम्ही लॅपटॉप, कॉम्प्यूटर किंवा अगदी तुमच्या अँड्रॉईड फोनमधूनही हे ट्यूनर ओपन करून त्याचा वापर करू शकता. मात्र, एकच महत्त्वाची सूचना की तुमच्या फोनचा किंवा ज्यावरून तुम्ही ट्यूनर वापरणार असाल त्याचा ऑडीओ क्लिअर असला पाहिजे.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

त्याचबरोबर गुगलने आणखी एक भन्नाट फीचर नुकतंच लाँच केलं आहे. यामध्ये चक्क तो तुम्हाला तुमच्या मनातली, डोक्यातली सतत घोळणारी आणि तुम्हाला अस्वस्थ वाटायला लागेपर्यंतही ज्याचे शब्द काही केल्या आठवत नाहीत अशी गाणी केवळ नुसत्या हमिंगवरून गुगल तुम्हाला ओळखायला मदत करणार आहे.

त्यासाठी काय करायचं की गुगल सर्च इंजिन एकदा अपडेट करा. मग त्या सर्चबारमधल्या माईकवर क्लिक करा आणि मग तुमच्या डोक्यातील रेंगाळणाऱ्या गाण्याची चाल गुणगुणा आणि म्हणा, गुगल सर्च धिस साँग .. की खुलजा सिमसिम सारखं तुम्हाला तुमच्या मनातलं गाणं गुगलला ओळखता आलं तर तो लगेच सांगणार आहे.. काय आहे की मस्त फीचर. हे फीचर तुम्ही हमिंग करून किंवा शिट्टीवर गाणं म्हणून दाखवूनही वापरू शकता, किंवा चक्क तुम्ही गाण्याच्या काही ओळी चालीनुसार म्हणून दाखवल्या तरीही लगेच गुगल ते गाणं स्वतः सर्च करून तुमच्यापुढ्यात आणून ठेवणार आहे..

आहे की नाही मस्त हे फीचर ..?

(keywords - guitar tuner google)


जर आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि हो गाणं शिकणाऱ्या तुमच्या ओळखीच्यांना तर हा लेख नक्की पाठवा.


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com