खरी श्रीमंती

बिल गेट्स यांच्या नावाने इंटरनेटवर फिरणारी ही गोष्ट बहुदा खरी नाही. मात्र तरीही यातून मिळणाऱ्या शिकवणीचे महत्व बिलकूलही कमी होत नाही. नक्की वाचा आणि आवडली तर शेअर करा.
जेव्हा बिल गेट्स जगातील श्रीमंत माणसांपैकी एक होते तेव्हा त्यांना एका व्यक्तीने एक प्रश्न विचारला , "जगामध्ये तुमच्यापेक्षा जास्त कोणी श्रीमंत आहे का ?" "हो, माझ्यापेक्षा ही श्रीमंत माणूस आहे , बिल गेट्स उत्तरले."

ही तेव्हाची गोष्ट आहे , जेव्हा मी श्रीमंत आणि प्रसिध्द ही नव्हतो. न्युयॉर्कच्या विमानतळावर मी एका वर्तमानपत्र विकणाऱ्या माणसाला पाहिले , आणि मला तो पेपर विकत घ्यायचा होता पण माझ्या पाकिटात तेवढे सुट्टे पैसे नव्हते मी तो पेपर विकत न घेता त्या विकणाऱ्या माणसाला परत दिला. आणि त्याला सांगितले की, 'माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत.' त्यावर तो पेपर विकणारा म्हणाला हा पेपर मी तुला फ्री मध्ये देतो, त्याचा आग्रहास्तव मी तो पेपर घेतला.

त्यानंतर अगदी योगा योगाने दोन महिन्यांनंतर मी त्याच विमानतळावर उतरल्यानंतर मला पेपर खरेदी करायचा होता पण या ही वेळी माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. त्या पेपर विक्रेत्याने मला परत पेपर खरेदी करण्यासाठी विचारले. मी त्याला नाकारले व सांगितले की, 'आज ही माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत.' तो म्हणाला, 'तुम्ही हा पेपर घ्या , हे मी माझ्या स्वतःच्या नफ्यातून हा पेपर तुला देतो आहे यामध्ये माझा कोणताही तोटा नाही,' त्याचा या बोलण्यानंतर मी तो पेपर घेतला.
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
19 वर्षांनंतर मी जेव्हा लोकांना माहिती झालो , प्रसिध्द झालो अचानक मला त्या विक्रेत्याची आठवण झाली. मी त्याला शोधायला सुरुवात केली त्यानंतर दिड एक महिन्यानंतर तो मला सापडला. मी त्याला विचारले " मला ओळखलं का तुम्ही ?" तो म्हणाला , ' हो, तुम्ही बिल गेट्स आहात'. मी त्याला विचारलं , 'तुम्हाला आठवतंय का ? तुम्ही मला फ्री मध्ये पेपर दिला होतात'.

त्यावर तो विक्रेता म्हणाला , 'हो मला आठवत आहे, मी दोनवेळा दिला होता.' मी त्याला म्हणालो , 'मला तुम्हाला परतफेड करायची आहे जी मदत तेव्हा तुम्ही मला केली होती.' 'तुम्हाला आयुष्यात जे काही हवं असेल मला सांगा मी ते मी सर्व पूर्ण करेन.' त्यावर तो विक्रेता म्हणाला , 'तुम्ही असे करून माझा मदतीची बरोबरी नाही करू शकणार आहात'. मी त्यांना विचारले , 'का ?' तो म्हणाला , ' जेव्हा मी एक गरीब पेपर विकणारा होतो तेव्हा मी तुम्हाला मदत केली , आणि तुम्ही आता मदत करत आहात? आता जगातील श्रीमंत माणूस बनल्या नंतर तुम्ही मला मदत करत आहात , मग तुम्ही माझ्या मदतीची बरोबरी कशी कराल ?' त्यादिवशी मला समजलं , माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत तो पेपर विक्रेता आहे. कारण त्याने कोणालाही मदत करण्यासाठी श्रीमंत होण्याची वाट पाहिली नव्हती.

पैशाने श्रीमंत असण्यापेक्षा ज्यांच्याकडे मनाची श्रीमंती असते तेच खरे श्रीमंत असतात ! माणसातील दयाळूपणा त्याला जगातील सर्वात सुंदर माणूस बनवत असतो, माणूस कसा दिसतो हे महत्वाचे नसते.

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com