परकीय भाषा शिकण्यासाठी ही आहे उपयुक्त वेबसाईट (#Web_Wednesday)

मित्रांनो,
आपल्यापैकी अनेकांना परकीय भाषा शिकण्याची आवड असते, उत्सुकता असते. हल्ली तर परकीय भाषांमध्ये करिअरच्याही उत्तम संधी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळेच परकीय भाषांचे ज्ञान असणे अनेकांना महत्त्वाचे वाटते. म्हणूनच, घरबसल्या परकीय भाषा जर शिकायच्या असतील तर त्यासाठी https://www.duolingo.com/learn ही वेबसाईट खूप उपयुक्त आहे. या वेबसाईटवर तुम्ही जगभरातील अनेक भाषा ऑनलाईन शिकू शकता.

या वेबसाईटवर जर्मन, इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, जपानी या प्रचलित भाषांबरोबरच अनेक अन्य देशातील भाषाही या वेबसाईटवरून शिकता येऊ शकतात. प्रत्येक भाषेचे शब्द, त्यातील वाक्य, त्या शब्दांचे अर्थ, त्यांचे उच्चार आणि त्या त्या भाषेवर आधारित काठीण्यपातळीनुरूप धडे, प्रश्नोत्तरे आणि सराव अशा पद्धतीने या वेबसाईटवर तुम्हाला भाषा शिकवली जाते. जगभरातील विविध भाषातज्ज्ञ किंवा भाषा अभ्यासक या वेबसाईटला ती ती भाषा त्या वेबसाईटवर डेव्हलप करण्यासाठी काँट्रीब्यूट करत असतात.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

असे आहे वेबसाईटचे स्वरूप -

यावर सर्वप्रथम तुम्ही जी भाषा शिकू इच्छिता ती निवडायची. तुम्हाला या वेबसाईटबद्दल कुठून माहिती मिळाली त्याची माहिती द्यायची आणि त्यानंतर तुम्हाला ही भाषा का शिकायची आहे, ती भाषा शिकण्यामागे तुमचं उद्दीष्ट काय आहे ते सिलेक्ट करायचं. या तीन स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ती भाषा शिकण्याचं तुमचं ध्येय कितपत पक्क आहे याबाबत विचारणा केली जाते. कॅज्युअल, रेग्युलर, सिरीअस आणि इंटेन्स या चार पर्यायांपैकी तुम्ही तुमचा पर्याय निवडायचा आणि मग पुढे त्यानुरूप तुम्हाला सराव आणि प्रश्नोत्तरे दिली जातात. एक एक लेव्हल आणि प्रत्येक लेव्हलमध्ये चार चार लेसन्स दिलेले आहेत. प्रत्येक लेसन पूर्ण करून तुम्ही एकेक लेव्हल पुढे जाऊ शकता. तुम्ही हा भाषाअभ्यास रंजकपणे पूर्ण करावा यासाठी या वेबसाईटने काही शक्कल लढवलेल्या आहेत. यामध्ये क्राऊन्स, हार्ट्स आणि फ्लेम असे तीन आयकॉन्स उजव्या कोपऱ्यात तुम्हाला दिसतात, त्याचबरोबर तुम्हाला व्हर्चुअल जेम्स दिले जातात. प्रत्येक लेसन पूर्ण केल्यावर तुम्हाला एक क्राऊन मिळतो. हे क्राऊन पुढे तुम्हाला एखादं लेसन स्किप करण्यासाठी वापरता येतात. तसंच नवीन लेसन सुरू करण्यासाठी तुमच्याजवळ हार्ट्स असले पाहिजेत.

तुम्हाला मिळालेले जेम्स तुम्ही ड्युओलिंगोच्या शॉपमध्ये वापरू शकता. फायनली तुम्ही एका विशिष्ट टप्प्यावर आलात की तुम्हाला चेकपॉईंट्स मिळतात, यातील टेस्ट्स सॉल्व्ह करून तुम्ही तुमचा अभ्यास कसा किती झालाय ते लगेच ताडून पाहू शकता.

तर, मित्रांनो, घरी बसल्या बसल्या या वेबसाईटचा वापर करून तुम्हीही अशाप्रकारे विविध भाषा शिकू शकता, त्यातले शब्द समजून घेऊ शकता, ती भाषा कशी बोलली जाते ते देखील थोड्या प्रमाणात समजून घेऊ शकता.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy