There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आर्थिक परिस्थितीत सुधारणा कशी करायची आणि त्याद्वारे आपले जीवनमान कसे सुधारायचे याचे मार्गदर्शन करणारे 'कॅशफ्लो क्वाड्रंट' हे पुस्तक. 'रिच डॅड पूअर डॅड' पुस्तकाचे लेखक 'रॉबर्ट कियोसाकी' यांनी लिहीलेलं हे आणखी एक महत्त्वाचं पुस्तक आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आर्थिक परिस्थितीत सुधारणा करायला हवी आणि तीच आपण कशी करू शकतो हे या पुस्तकात सांगितलेले आहे.
कॅशफ्लो म्हणजे काय तर तुमच्याकडे विविध मार्गांनी येणारा पैशाचा ओघ, किंवा तुमचं इनकम.
क्वाड्रंट म्हणजे चतुर्थांश .. या प्रत्येक चतुर्थांशात प्रत्येकी एका प्रकारच्या माणसांबद्दल, त्यांच्या आर्थिक विचारांबद्दल वर्गवारी करून आपल्याला आपण कोणत्या चतुर्थांशात बसतो ते ओळखण्यास लेखकाने सांगितले आहे. या क्वाड्रंटला नाव दिलेली आहेत ई, एस, बी, आय
ई क्वाड्रंट -
या क्वाड्रंटमध्ये जगातील बहुतांश लोक येतात. तब्बल 95 टक्के लोक यात मोडतात परंतु असे असले तरीही या लोकांकडे केवळ जगातील 5 टक्केच पैसा जातो. हे लोक म्हणजे नोकरदार वर्ग. या लोकांकडे नोकरी आहे पण पैसा म्हणावा तितका नाही. या कॅटेगरीत एवढे लोक का आहेत याचं कारण म्हणजे, आपल्यापैकी अनेकांना याच कॅटेगरीत काम करण्यासाठी लहानपणापासून घडवलं जातं. पालकांचं मुलांवर तेच प्रेशर असतं की शिक्षण घे आणि कुठेतरी चांगली नोकरी बघ. सिक्युअर्ड जॉब आणि बेनिफीट्स या अमीषांनी आपल्याला भुलवलं जातं. लेखकाच्या मते, या कॅटेगरीत राहून तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. याचं कारण, सुरुवातीला तुमचा पगार फार कमी असतो. त्यामुळे सेव्हींग्स कमी होतात आणि आकांक्षा तर दिवसागणिक वाढत जातात. परिणामी अनेक लोकांना कर्ज घ्यावं लागतं आणि हळुहळू कर्जाच्या ओझ्याखाली ही लोकं अडकून जातात. नंतर पगार वाढतो पण आकांक्षाही त्याच्या चौपट वाढत जातात. हे लोक कधी गुंतवणुकींबद्दल फार गंभीर नसतात, कारण यांच्याकडे एक सिक्यॉअर्ड जॉब असतो आणि त्यांच्यासाठी जॉब सिक्यॉरिटीच महत्त्वाची असते. जर एखाद्या महिन्याला यांना पगार मिळाला नाही तर यांचं आर्थिक गणित कोलमडतं.
एस क्वाड्रंट मध्ये येतात सेल्फ एम्लॉईड लोकं. अर्थात डॉक्टर्स, वकील, क्लास घेणारे शिक्षक. हे सगळेच जण या कॅटेगरीत येतात, हे सुद्धा खरंतर जॉबच करत असतात, पण फरक एवढाच आहे की यांनी स्वतःच यांचा जॉब क्रिएट केलेला असतो. यांचा कोणीही बॉस नसतो आणि यांच्याकडे थोडीशी जास्त फ्लेक्झिबिलीटी असते. पण जर हे आजारी पडले तर यांना पगारी रजा मिळत नाहीत.
ई आणि एस या दोन्ही क्वाड्रंटमधील लोकांसाठी वेळ हाच त्यांचा पैसा आहे. जास्त वेळ दिला की जास्त पैसे त्यांना कमावता येऊ शकतात.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
आता बी क्वाड्रंटमध्ये येतात बिझनेस करणारे लोक. हे लोक दुसऱ्यांना कामाला लावून स्वतः पैसे कमावतात. म्हणजेच काय, हे दुसऱ्यांचे पैसे आणि दुसऱ्यांचा वेळ वापरून स्वतः पैसा कमावतात. लेखकाच्या मते श्रीमंत होण्यासाठी या कॅटेगरीतील लोक उत्तम. सुरूवातीला प्रचंड मेहनत करावी लागते, रिस्क घ्यावी लागते आणि सॅक्रीफाईसेसही करावे लागतात मात्र ती थोड्याच काळासाठी असते, जोवर हे यांची सिस्टीम क्रिएट करत नाहीत तोवरच !
चौथ्या आय क्वाड्रंटमध्ये येतात ते म्हणजे इन्व्हेस्टर्स. हे लोक पैशांसाठी काम करत नाहीत, तर ते आपल्या पैशाला कामाला लावतात. पैसे देऊन आणखी पैसे कमावतात हे लोक. पैशांनी ते दुसऱ्यांचा वेळ खरेदी करतात.
डाव्या बाजूचे दोन क्वाड्रंट ई आणि एसमधील लोकांचं इनकम हे एक्टीव्ह असतं आणि उजव्या बाजूच्या दोन क्वाड्रंटमधील (बी आणि आय) मधील लोकांचं इनकम हे पॅसिव्ह असतं. म्हणूनच डाव्या क्वाड्रंटमधील लोकांनी उजव्या क्वाड्रंटमध्ये येण्याचा मनोभावे प्रयत्न करावा असे लेखकाचे सांगणे आहे. त्यामुळे त्यांना जन्मभर मेहनत व काम यावर अवलंबून रहावे लागणार नाही तर त्यांना पॅसिव्ह इनकम सुरू होईल.
मित्रांनो,
आपण सगळेच आर्थिक बाबतीत आपल्याला जी शिकवणूक मिळते त्यानुसार घडत असतो आणि आर्थिक बाबतीत नवा विचार करण्याची हिंमतही आपल्यापैकी फार कमी लोकांजवळ असते. मात्र, जर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल आणि आर्थिक बाबतीत कधीही अडचणी नको असतील तर तुम्हाला सुरूवातीपासूनच तुमच्या पैशांबद्दल गंभीर असायला हवं. केवळ नोकरीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंशिक्षण घेत घेत मोठं व्हायला हवं. कोणीही तुम्हाला मोठं कसं व्हायचं हे शिकवणार नाही, ते तुम्हाला स्वतःच शिक्षण घेऊन शिकावं लागेल.
हे पुस्तक मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - https://salil.pro/CFQ
पुस्तकाविषयी आणखी सविस्तर माहिती देणारा हा व्हिडीओ आवर्जून पहा - https://www.youtube.com/watch?v=0ZVhUGPvhqY&t=267s
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com