या एका भन्नाट स्टार्टअपमुळे सुरु झाली सायकल भाड्याने देण्याघेण्याची सुविधा (#Friday_Funda)

अनेक अशा कल्पना ज्या जेव्हा सत्यात उतरतात तेव्हा त्यातून खूप छान व्यवसायांचा जन्म होतो. आपल्याकडील किंवा पाश्चात्य देशातील अशाच काही कल्पना, ज्या नव्या स्टार्टअप्सच्या रूपाने जन्माला आल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या अशांचा आढावा घेऊया आजपासून आपल्या #Friday_Funda मध्ये ..

या एका भन्नाट स्टार्टअपमुळे सुरु झाली सायकल भाड्याने देण्याघेण्याची सुविधा (#Friday_Funda)

2014 मध्ये MYBYK या भारतीय सॉफ्टवेअर स्टार्टअपने सायकल भाड्याने देण्याची आणि ती सुद्धा घरपोच सेवा सुरु केली. पर्यावरणाच्या दृष्टीने सायकल चालवण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने अर्जीत सोनी या तरूणाने ही स्टार्टअप कंपनी सुरु केली.

एक साधी सोपी कल्पना, की सायकल भाड्याने देणे .. पण ती सुद्धा अल्पावधीतच या कंपनीने लोकप्रिय केली. याचं कारण म्हणजे, यांनी पुरवलेली सेवा, यांच्या सायकल्स, आणि मुख्य म्हणजे संपूर्ण बिझनेस प्लॅनच नीट विचारपूर्वक बनवलेला असल्याने ही कंपनी लोकांच्या नजरेत भरल्यावाचून राहिली नाही.

या कंपनीच्या App वर जाऊन सायकल बुक करता येते. 18 वर्षावरील कोणीही व्यक्ती या सायकल भाड्याने घेऊ शकतो. सध्या ही कंपनी मुंबईतील काही भागात तसंच अहमदाबाद गुजरात येथे कार्यरत आहे.

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.

================

या कंपनीने आपल्या अशा खास बायसिकल्स डिझाईन करून तयार करून घेतल्या. तसंच, या सायकल्सच वैशिष्ट्य म्हणजे यांचे सीट अडजस्टेबल आहे, तसंच तीन प्रकारच्या म्हणजे उंचीच्या सायकल्स असल्याने सगळ्या प्रकारच्या ग्राहकांना त्यांच्या कम्फर्टनुसार स्वतःसाठी सायकल निवडता येते.

या स्टार्टअपचं वैशिष्ट्य हे की ही कल्पना मुळातच निराळी होती. अशा पद्धतीने सायकल भाड्याने देणे आणि त्याचबरोबर त्या सायकल्सचे मेंटेनन्स व अन्य सर्व कामाची जबाबदारी ग्राहकांवर नसल्याने त्यांना आनंदाने सायकल चालवण्यातली मौज घेता येते. तसेच सायकल चालवण्याच्या एका उत्तम सवयीमुळे स्वतःच्या आरोग्याची आणि पर्यावरणाचीही काळजी घेतली जाते.

समजा, सायकलचे नुकसान झाले तर काय करायचे, सायकल चोरीला गेली तर काय करायचे या अशा सगळ्या प्रश्नांवरही कंपनीने आधीच नीट काम केलेले असल्याने त्यांची याबाबतचीही धोरणं स्पष्ट आहेत. यामुळे केवळ रजिस्ट्रेशन फी भरून लगेचच केव्हाही तुम्ही या स्टार्टअपच्या बाईक्स घरबसल्या बोलावू शकता व वापरायला सुरुवात करू शकतात.

आजवर या कंपनीच्या प्रगतीचा आलेख पहाता अनेक गुंतवणुकदारांनीही या कंपनीत आनंदाने गुंतवणूक करण्याची तयार दाखवली आहे. भारतातील अव्हॉन सायकल्स या नामांकीत सायकल बनवणाऱ्या कंपनीनेही या नव्या स्टार्टअपमध्ये इंटरेस्ट दाखवला आहे. नव्या गुंतवणूकदारांमध्ये ते देखील एक आहेत, त्याचबरोबर अन्य काही कंपन्यांनीसुद्धा गुंतवणूक करण्यात इंटरेस्ट दाखवल्याने तब्बल 1 मिलीअन डॉलरची गुंतवणूक या कंपनीमध्ये होऊ शकण्याचा अंदाज सीड फंडींग राऊंडदरम्यान आला आहे.

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com


Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2025 Privacy policy Terms of use Contact us Refund policy