There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
औषधे, जेवण, अन्नपदार्थ, फळं, भाज्या या सगळ्याची घरपोच सेवा देणारे दोन तीन आघाडीचे स्टार्टअप्स बाजारात आपला दबदबा निर्माण करण्यात यशस्वी झालेले असतानाच दुसरीकडे एका नव्या स्टार्टअपने केवळ 10 मिनीटात घरपोच किराणा देण्याची सेवा पुरविण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीतच लोकांची मनं जिंकली. ZEPTO असं या स्टार्टअपचं नाव. आश्चर्य म्हणजे ज्या दोन नवतरूणांनी हे स्टार्टअप सुरु केलं, ते स्टॅनफोर्ड विद्यापिठाचे ड्रॉपआऊट्स आहेत आणि त्याचं वय अवघं 19 वर्ष इतकं कमी आहे.
तब्बल 500 मिलीअन डॉलर्सचा हा स्टार्टअप सुरू करणारे हे तरूण उद्योजक आदीत पालिचा आणि कैवल्य वोहरा पँडेमिकच्या काळात भारतात परतले. त्याचदरम्यान, घरपोच किराणा तोही अवघ्या 10 मिनीटात पोचवण्याची सेवा सुरु करण्याची कल्पना त्यांना सुचली. एप्रिल 2021 मध्ये त्यांनी संपूर्ण मार्केट रिसर्च करून आपली ही नवी स्टार्टअप कंपनी सुरू केली. अल्पावधीतच ही कंपनी इतकी लोकप्रिय झाली की तिने स्विगी आणि ब्लिंकीट सारख्या मोठ्या कंपन्यांनाही मागे टाकले.
झेप्टोचा यूएसपी -
अन्य कंपन्या घरपोच सेवा देण्यासाठी जिथे तब्बल अर्धा ते पाऊण तासाचा अवधी घेत होत्या, अशा काळात झेप्टोने पूर्ण बाजारपेठ हलवून टाकली, ती त्यांच्या 10 मिनीटात घरपोच सेवा देण्याच्या अटीने..
सुरुवातीला सर्वांनाच हे निव्वळ अशक्य वाटत होते. मात्र, झेप्टोचं बिझनेस मॉडेलच इतकं चोख होतं की त्यांना कुठेच अडचण आली नाही आणि त्यांनी आपल्या अटीवर बाजारपेठेत झेप घेतली.
हे कसं जमलं ?
झेप्टो कंपनीने शहरांमधील डार्क स्टोअर्सचा पर्याय निवडला. हे डार्क स्टोअर्स म्हणजे लहान किंवा मायक्रो वेअरहाऊसेस, जे अशा भागांमध्ये वसलेले होते जिथून भरपूर ऑर्डर्स येतील. या डार्क हाऊसेसमध्ये तो सगळा माल, ती सगळी उत्पादने उपलब्ध होती ज्यांना बाजारातून सतत प्रचंड मागणी असते. या सहज उपलब्धतेमुळे आणि सहज वापरता येण्याच्या पर्यायामुळे झेप्टोला कोणत्याही ग्राहकांना अवघ्या 10 मिनीटात सेवा देणे सहजसुलभ झाले.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
एका डार्क स्टोअरमधून सुमारे 2500 हून अधिक ऑर्डर्स एका दिवसाला पूर्ण करता येऊ शकत होत्या, आणि हेच इन्स्टंट डिलीव्हरीचं गुपित होतं. या एका मस्त कल्पनेमुळे झेप्टोने जोमाने प्रगती केली आणि गुंतवणूकदारांचं लक्ष्य वेधण्यात ही स्टार्टअप यशस्वी झाली.
नुकतंच झेप्टोने Y Combinator's Continuity Fund द्वारे 100 मिलीअन डॉलर्सचं फंडींग मिळवलं आहे, ज्याचं मूल्य तब्बल 570 मिलीअन डॉलर्स इतकं आहे आणि या कंपनीचा दरमहा विकास दर 200 टक्के इतका आहे.
हे असं यश मिळालं असलं तरीही झेप्टोसाठीही सुरुवातीचा काळ कठीणच होता. कारण त्यांनी कमिट केलेलं 10 मिनीटात डिलीव्हरीचं प्रॉमिस त्यांना पार पाडता येत नव्हतं. पण जेव्हा कंपनीने नेट प्रमोटर स्कोअर (NPS) हे आपलं फीचर इन्ट्रोड्यूस केलं त्यानंतर कंपनीने आपल्या टर्म्स यशस्वी करण्यात यश मिळवले.
झेप्टोचा ग्राहक धारणा दर (बायर रिटेंशन रेट) 65 टक्के इतका असून सर्वात जलद सेवा देण्यात (8 मिनीट ते अगदी 45 सेकंद ) यश मिळवले आहे. याकरिता झेप्टोकडे अत्यंत कुशल असे ड्रायव्हर्स आहेत, ज्यांना कंपनी दूरवरच्या अंतरावर सेवा पुरवण्यासाठी पाठवत नाही, तर तिथेही कंपनीने शक्कल लढवत, कमी अंतरावरच्या डिलीव्हरी त्या त्या भागातील आपल्या चालकांना देण्यास सुरुवात केल्यामुळे कंपनीच्या सप्लाय चेन आणि नेटवर्कला अधिक चोख काम बजावणे शक्य झाले आहे.
सध्या झेप्टो कंपनी मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरु येथे आपली सेवा देत आहे, तसंच कंपनीत सध्या 400 कुशल कर्मचारी कार्यरत आहेत. 2022 - 23 पर्यंत कंपनी आपला विस्तार अन्य राज्यातही वाढवणार आहे आणि त्यासाठी आणखी 800 कर्मचारी नियुक्त करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे कळते.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com