There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
या भारतीय स्टार्टअपनं सोपं केलंय पत्ता सांगणं ! (#Friday_Funda)
" हॅलो मॅम .. वो आपका पार्सल लाया था.. तो आपका पता ठीकसे बता सकते है क्या .? कहा पे आना है एक्स्झॅक्टली ? "
" हा .. बताती हूँ.. वो आप अभी कहा पे हो .. अच्छा वो गार्डन के बाजूमे एक रस्ता है उधर से आओ. वहापे एक पानी की टंकी दिखेगी वहासे भी सीधा आओ. फिर एक छोटीसी दुकान दिखेगी.. उसके सामने एक लाल गाडी खडी है.. उस लाल गाडीके सामने जो गाडी है उसके राईट अँगलमें जो बिल्डींग दिख रही है ना .. सफेद कलर की वही तिसरे मालेपर आना है आपको.."
हुश्श .. हा असा पत्ता आपल्यापैकी अनेकजणं आपल्या घरी येणाऱ्या पार्सलवाल्यांना, कुरिअरवाल्यांना किंवा पाहुण्यांना सांगतो. यामध्ये समोरच्याला तो पत्ता नीट कळत तर नाहीच शिवाय तो भलतीकडेच जातो आणि बरेचदा वैतागून नेमक्या पत्त्यावर पोचण्यापूर्वीच परत निघून जातो. आपल्या घराघरातील ही समस्या ओळखून मे 2021 मध्ये इंदोरस्थित रजत जैन आणि मोहित जैन यांनी पता डॉट कॉम ( https://pataa.com/ ) या स्टार्टअपची सुरुवात केली. नव्या जमान्यात जिथे सगळं काही मोबाईलवरून सोपं सुलभ झालं आहे, अशा जमान्यात अजूनही आपल्याला आपला पत्ता सांगणं, समजावणं, खाणाखुणा सांगत बसणं हे वेळखाऊ काम करत बसावं लागतं. आपली ही अडचण ओळखून रजत जैन आणि मोहीत जैन या दोन्ही भावंडांनी या स्टार्टअपची सुरुवात केली.
पता या appवरती तुम्हाला अनेक फीचर्स देण्यात आलेली आहेत. यावर रजिस्टर झालेल्या प्रत्येक पत्त्याला एक युनिक शॉर्टकोड मिळतो आणि त्याद्वारे यूझर्सला त्यांचा पत्ता शेअर करणं सोपं जातं. केवळ सात महिन्यांच्या कालावधीतच या appची लोकप्रियता इतकी वाढली आहे की आजवर तब्बल सात मिलीअन डाऊनलोड्स झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये तब्बल 98 टक्के यूझर्स हे अँड्रॉईडचे वापरकर्ते आहेत तर अद्याप तब्बल 1 मिलीअन पत्त्यांची नोंद या appमध्ये झालेली आहे.
हे app कसं काम करतं ?
सर्वप्रथम म्हणजे हे app तुमचा पत्ता शॉर्ट करतं, अगदी तसंच जसं, bit.ly मोठ्या URL शॉर्ट करतं. असं केल्याने तुमचा क्लिष्ट पत्ता अगदी सोपा होतो आणि तुम्हाला तो दुसऱ्यांना सहज सांगता येतो आणि मुख्य म्हणजे सोपा पत्ता सांगितल्याने तुमच्यापर्यंत तुमच्या पाहुण्यांना, डिलीव्हरी बॉईज वा कुरिअर बॉईज या सगळ्यांना तुमच्या घरापर्यंत पोहोचणंही फार सोपं होऊन जातं.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
पता appमध्ये जाऊन तुम्ही स्वतः तुमच्या चॉईसचा शॉर्टकोड घेऊ शकता किंवा तुमचा शॉर्टकोड तुम्ही स्वतः तयार करू शकता, याकरिता किमान 7 ते 11 अल्फान्युमरिक कॅरेक्टर्स वापरावे लागतात. तुमच्या पत्त्याऐवजी तुम्ही तयार केलेला तुमच्या पत्त्याचा डिजीटल शॉर्टकोड तुम्हाला शेअर करणंही खूप सोपं जातं. यामुळे तुम्हाला डिजीटल मॅपमध्ये जागाही मिळते.
उदा. kapoor221*, Gupta3357#
तसंच या शॉर्टकोडच्या निर्मितीपुरवी सुरुवातीला एकदा आणि शेवटी एकदा तुम्ही तुमचा संपूर्ण सविस्तर पत्ता appवर लिहून देता तसंच तुमच्या एड्रेस लोकेशनचे फोटोज आणि तुमच्या आवाजात तुमच्या पत्त्याचे लँडमार्कसह आणि दिशांसह रेकॉर्डींगही करू शकता. तुमच्या व्हिजीटर्ससाठी तुमच्या घरापर्यंत येण्याचा जो बेस्ट रूट असेल तो तुम्हाला यामध्ये रेकॉर्ड करून देणं अधिक उत्तम.
कुटुंबातील सदस्यांनाही करून घेऊ शकता सहभागी -
या appवर तुम्ही तुमच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनाही सहभागी करून घेऊ शकता. म्हणजेच काय शॉर्टकोड तयार केल्यानंतरही त्याचे एक्स्टेन्शन्स तयार करून ते कुटुंबातील सदस्यांशी शेअर करू शकता. यामुळे समजा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कोणाला घरी बोलावायचे आहे, पत्ता सांगायचा आहे तर ते त्याचा वापर करू शकतात. तसंच, पाहुणे घरी पोचेपर्यंत ते नेमके कुठे आहेत याचा ट्रॅक रिअल टाईममध्येही ठेवता येतो.
CO-Win फीचर लोकप्रिय -
कोव्हीड काळात कंपनीने सुरु केलेले को-विन फीचर तर खूपच लोकप्रिय झाले. मध्यप्रदेश, इंदोर, जबलपूर, भोपाल आणि ग्वालीअर याठिकाणचे कोव्हिड19 चे लसीकरण केंद्र शोधण्यासाठी या appचा खूप उपयोग लोकांना झाला.
सध्या या कंपनीत तब्बल 70 कर्मचारी कार्यरत आहेत. लवकरच, कंपनी पता एपीआय सुरू करणार आहे. सगळ्या ईकॉमर्स कंपन्या, राईड हेलिंग कंपन्या, लॉजिस्टिक्स, फूड डिलीव्हरी कंपन्यांसाठी हे खूप उपयुक्त ठरेल, कारण त्यांना योग्य ग्राहकापर्यंत पोहोचणं यामुळे खूप सोपं होईल.
सध्या बाजारपेठेत या कंपनीला प्रचंड स्पर्धा असली तरीही या कंपनीची काही वैशिष्ट्य हीच तिचं वेगळेपण अधोरेखित करतात. ही वैशिष्ट्य म्हणजे व्हॉईस डायरेक्शन्स, लँडमार्क टॅगिंग, रस्त्याच्या दिशा नोंदवणं, जिओटॅगिंग, अड्रेस एक्स्टेन्शन आणि याखेरीज बरीच अन्य अशी फीचर्स जी डिलीव्हरी बॉईज आणि व्हिजीटर्स यांच्यासाठी उपयुक्त ठरतील.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com