There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
कॉम्प्युटरचा वापरच आपण आपलं काम सोपं करण्यासाठी करतो. अशातच इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यासमोर असंख्य अशी दालनं, वेबसाईट्सच्या माध्यमातून उघडी झालेली आहेत ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या कामात आणखी सुलभता आणणे शक्य झाले आहे. आज जाणून घेऊयात अशाच काही वेबसाईट्सबद्दल, ज्या करतील तुमचं काम आणखी सोपं ..
1. https://namechk.com/
तुमच्या व्यवसायासाठी किंवा ब्रँडसाठी तुम्ही जर डोमेन नेम शोधत असाल आणि आधीच रजिस्टर झालेल्यांपैकी तुम्ही निवडलेलं नाव आहे की नाही याबाबत तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ही वेबसाईट खूप कामाची आहे. यावर तुम्ही तुम्हाला हवं ते डोमेन नेम सर्च करून ते अव्हेलेबल आहे की नाही हे चेक करू शकता.
2. https://everytimezone.com/
इंटरनेटच्या या युगात आपण सगळे ग्लोबल सिटीझन्स अर्थात, जगाचे नागरिक झालेलो आहोत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, त्यामुळेच सतत आपल्या देशात अमुक एक वेळ झाली तर अन्य दुसऱ्या देशात त्याच वेळी किती वाजले असतील हे काढणं, गुगल करणं एक कामच होऊन बसलंय, विशेषतः जेव्हा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या वेळा, झूम कॉल वगैरे ठरवायचे असतात तेव्हा खूपच अडचण येते. या अशाच अडचणीच्यावेळी ही साईट कामाला येऊ शकते. तुमच्याकडल्या विशिष्ट वेळेला इतर देशात किती वाजले असतील हे या साईटवरून लगेचच समजते.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
3. https://www.flightstats.com/v2/
तुम्हाला जेव्हाही फ्लाईटने प्रवास करण्याची वेळ येते किंवा एखाद्या फ्लाईटने तुमचं जवळचं कोणी प्रवास करणार असतं तेव्हा तुमच्या मनात काहीशी काळजी असतेच अशावेळी तुम्ही या वेबसाईटवर फक्त फ्लाईट नंबर एन्टर करायचा आणि लगेचच तुम्हाला त्या फ्लाईटचे रिअल टाईम लोकेशन मिळू शकते.
4. https://dictation.io/
लेखक, पत्रकार यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही वेबसाईट. यावरून तुम्ही तुमच्या आवाजात चक्क डिक्टेशन देऊन प्रत्यक्ष टाईप करून घेऊ शकता. विशेष म्हणजे या वेबसाईटवर विविध भाषांमधूनही तुम्हाला डिक्टेशन देता येणे सहज शक्य आहे. Dictation.io बद्दल अधिक माहिती हवी असल्यास आमचा हा व्हिडीओ नक्की पहा - https://www.youtube.com/watch?v=2r50cHLfvHk&t=14s
मित्रांनो,
या सगळ्या वेबसाईट्सबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ?
आम्हाला कमेंट करून जरूर सांगा ..
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com