There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
जीवनात उद्दीष्ट ठरवणं फार महत्त्वाचं असतं. जीवनाला तेव्हाच आकार येतो जेव्हा तुम्हाला उद्दीष्ट सापडतं. परंतु, आपलं जीवनातलं उद्दीष्ट ठरवणं हे तितकं सोपं नाही, त्यामुळे हे उद्दीष्ट ठरवण्यासाठी खाली दिलेल्या 5 पायऱ्यांचं अवलंबन करा -
1. जीवनात तुमच्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांची यादी बनवा -
ही यादी जितकी सविस्तर असेल तितकं चांगलं. तुमची लहान लहान स्वप्नंही या यादीत लिहा. ही यादी कितीही मोठी झाली तरीही चालेल, मात्र जर ही यादी फार लहान असेल तर मात्र ती तुमच्यासाठी एक चिंतेची बाब होऊ शकेल हे लक्षात घ्या. याचं कारण, तुम्हाला तुमच्या जीवनात कोणतेही विशिष्ट उद्दीष्ट नाही हेच यावरून सिद्ध होईल.
2. यादीतील स्वप्नांचे वर्गीकरण करा -
आता यादीत तुम्ही जी स्वप्न लिहीलीत त्यांचं वर्गीकरण करा. त्या त्या स्वप्नांची कॅटेगरी लिहा. उदाहरणार्थ -
नातेसंबंध, करिअर, महत्त्वाचे, मनोरंजन
3. यादीतील 5 गोष्टी ठळकपणे लिहा -
विचार करा, की तुम्ही एखाद्या मोठ्या जहाजावर अडकला आहात आणि तिथून बाहेर पडताना तुम्ही सोबत यादीतील पाचच गोष्टी घेऊन जाऊ शकता, तर तुम्ही कोणत्या गोष्टी निवडाल.. त्या पाच गोष्टींवर यादीत एक गोल करा.
4. हे का करायचं -
जर तुमची यादी खूप मोठी असेल तर त्या यादीतून तुमच्या आवडीच्या गोष्टी निवडणे फार कठीण आणि हेच जर तुमची यादी फार लहान असेल तर अशी निवड करणं तितकंस कठीण नसतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा आयुष्यात तुम्ही उद्दीष्ट ठरवायला जाता तेव्हा जर तुमच्यापुढे अनेक गोष्टी असतील त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही धावत रहाल आणि अखेर चिंताग्रस्त व्हाल, याउलट जर तुम्ही थोड्याच गोष्टी निवडलेल्या असतील तर तुमचं उद्दीष्ट स्पष्ट होईल आणि तुम्ही सुखी व्हाल.
5. निवडलेल्या 5 उद्दीष्टांचा पुन्हा विचार करा -
तुम्ही जी 5 उद्दीष्ट निवडलीत, त्यांचा पुन्हा एकदा विचार करा, सखोल विचार करा, आणि त्यातून तुमच्या मूलभूत उद्दीष्टांपर्यंत पोहोचा. ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनाची मूलभूत मूल्य समजतील.
6. उद्दीष्ट आणि जीवनमूल्य यांची सांगड घाला -
समजा तुम्ही यादीत उद्दीष्ट लिहीलंय नोकरी करणे, तर मग विचार करा की तुम्हाला नोकरी का करायचीये, तुमचं उत्तर असेल...पैसे कमावण्यासाठी, मग पैसे का कमवायचे आहेत याचा विचार करा, त्याचं उत्तर असेल स्वातंत्र्य मिळवण्यासाठी... म्हणजेच काय की तुम्ही तुमचं उद्दीष्ट आता जीवनमूल्यात यशस्वीरित्या रूपांतरित केलंत.
लक्षात ठेवा, उद्दीष्टांची पूर्तता ही जीवनमूल्य जोपासत करायला पाहिजे, तेव्हाच तुमचं जीवन अधिक बहरेल. अन्यथा केवळ उद्दीष्टपूर्तीकरता तुम्ही अखेरपर्यंत धावत रहाल आणि जीवनाचा आनंद तुम्ही कधीच घेऊ शकणार नाही.