कहाणी जिद्दी अभियंत्यांची!

१८७०मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये ब्रूकलिन ब्रिज बनवणाऱ्या अभियंता जॉन रोबलिंगची ही वास्तविक जीवनाची कथा आहे. हा पूल १८८३ म्हणजेच तब्बल १४ वर्षांनी पूर्ण झाला.

जॉन रोबलिंग नावाच्या सर्जनशील अभियंत्याला न्यूयॉर्कला लॉंग आयलँडशी जोडणारा नेत्रदीपक पूल बांधण्याची प्रचंड इच्छा होती. या कल्पनेने त्याला प्रेरित केले होते. परंतु जगभरातील ब्रिज बिल्डिंग तज्ञांचे हा एक अशक्य प्रकल्प असल्याचे म्हणणे होते. आणि त्यांनी रॉबिंगला सांगितले की हे केले जाऊ शकत नाही, हे यापूर्वी कधीही कोणी केले नाही. त्यांनी रॉबलिंगला हे खूळ डोक्यातून काढून टाकायला सांगितले.

या पुलाबद्दल आपल्या मनात असलेल्या कल्पनेकडे रोबलिंग दुर्लक्ष करू शकत नव्हता. त्याचा मनात याविषयी कायम विचार चालू असायचा आणि हे पूर्ण करता येईल असा त्याला मनापासून विश्वास होता. त्याला फक्त त्याचे स्वप्न कोणा दुसर्‍याला बरोबर घेऊन करावे लागणार होते. बरीच चर्चा आणि मनाची तयारी करून त्याने आपला मुलगा वॉशिंग्टन याला जो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता त्याला समजावून सांगण्यास यशस्वी झाला की, खरोखर हा पूल बांधला जाऊ शकतो.

प्रथमच एकत्र काम करत असताना वडील आणि मुलाने एकत्र मिळून हे कसे साध्य केले जाऊ शकते आणि अडथळे कसे दूर करता येतील या गोष्टींवर अभ्यास केला. मोठ्या उत्साहाने आणि प्रेरणा घेऊन आणि त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानानां धाडसीपणे हाती घेऊन त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावर घेतले आणि त्यांचे स्वप्न असलेला पूल बांधायला सुरुवात केली.

प्रोजेक्टला चांगली सुरूवात झाली, परंतु काही महिन्यानीं साइटवर एक भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात जॉन रोबलिंगचा जीव गेला. परंतु यात त्याचा मुलगा वॉशिंग्टन देखील जखमी झाला आणि काही प्रमाणात मेंदूला जखम झाली, त्यामुळे त्याला बोलणे किंवा चालणे अशक्य झाले.

सगळे लोक त्यानां "वेडा माणूस आणि आणि त्याची वेडी स्वप्ने." " अशक्य गोष्टी करण्यासाठी धडपडत राहणे हे मूर्खपणाचे आहे " असे बोल लावू लागले.
फक्त जॉन रोबलिंगलाच माहिती होते की हा पूल कसा बांधला जाईल. त्याचा मृत्यू नंतर सगळेच लोक नकारात्मक गोष्टी बोलायला लागले होते, सगळयांना असे वाटे , हा प्रकल्प बंद करण्यात यावा.

आता अपंग असूनही वॉशिंग्टनने कधीही स्वतः ला निराश होऊ दिले नाही. पूल पूर्ण करण्याची तीव्र इच्छा त्याचा मनात होती. आणि त्याचे मन अजूनही पूर्वीसारखेच तीक्ष्ण होते. उत्साहित होऊन त्याला आपल्या काही मित्रांनी हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असे त्याला वाटत होते. परंतु तेदेखील या प्रकल्पावर शंका उपस्थित करीत होते.
===================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
===================
एके दिवशी रुग्णालयाच्या खोलीत पलंगावर झोपून होता तेव्हा खिडकीतून सूर्यप्रकाशाने हळू हळू वारा सुटला होता आणि त्या वाऱ्याने खिडकीवरील पांढरे पडदे बाजूला फेकले आणि काही क्षणातच त्याला आकाश दिसू लागले. कदाचित हार मानू नकोस असा निरोपच ते निळेशार आभाळ त्याला देऊ पाहत होते. अचानक त्याला एक कल्पना आली. तो फक्त एक बोट हलवू शकत होता. त्याचा चांगला उपयोग करण्याचा निर्णय त्याने घेतला. बोट हलवून, त्याने हळू हळू आपल्या पत्नीशी बोलण्याचा एक संभाषण कोड विकसित केला.

त्याने त्या बोटाने आपल्या पत्नीच्या हाताला स्पर्श केला आणि तिला इच्छा व्यक्त केली की तीने पुन्हा अभियंते बोलवावे. मग अभियंत्यांनी काय करावे हे सांगण्यासाठी तिचा हातावर बोट ठेवून सांगू लागला. ते काहीस वेगळं वाटत होतं पण प्रकल्पास पुन्हा सुरुवात झाली होती.

13 वर्ष वॉशिंग्टनने आपल्या प्रकल्पाचे काम काम पूर्ण होईपर्यंत पत्नीच्या हातावर बोटाने त्याच्या सूचना सांगितल्या. आज नेत्रदीपक ब्रूकलिन ब्रिज त्याच्या सर्व वैभवात उभा आहे. कितीही बिकट परिस्थितीत पराभूत न होणाऱ्या दृढ संकल्पांना श्रद्धांजली म्हणून ब्रूकलिन ब्रिजच्या रूपाने आजही मिळत आहे. अभियांत्रिकी कौशल्य, जिद्द, अर्ध्या जगाने ज्यांना वेडा समजलं त्यावर विश्वास ठेवून अत्यंत जोखमीचं काम करणाऱ्या कामगारांच्या मेहनतीचेही हे प्रतीक आहे. हे पत्नीच्या प्रेमाचे आणि भक्तीचे मूर्त स्मारक आहे जी १३ वर्ष संयमाने आपल्या पतीच्या संदेशांना डीकोड करत काय करावे हे अभियंत्यांना सांगत होती.

कधीच हार न मानणाऱ्या वृत्तीचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

बर्‍याचदा आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो, इतर अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागत असते. वॉशिंग्टनच्या परिस्थितीच्या तुलनेत आपले अडथळे फारच लहान दिसतात.
ब्रुकलिन ब्रिज आपल्याला दर्शवितो की अशक्य वाटणारी स्वप्ने दृढनिश्चय आणि चिकाटीने साध्य केली जाऊ शकतात. शक्यता किती आहे याचा विचार न करता.

हे जग त्यांनाच लक्षात ठेवतं जे इतरांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करून दाखवतात. तुमचं स्वप्न काहीही असो हे अशक्य आहे असे कुणी म्हंटले की ब्रुकलिन ब्रिजचं चित्र आपल्या नजरेसमोर जरूर आणा !

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !