ज्येष्ठ सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनिता लिखीत विनींग वे हे पुस्तक तुम्हाला खेळ, मॅनेजमेंट आणि जीवन या तिघांतील एक सुसूत्र गुंफण शिकवून जातं. यशासाठी फॉर्म्युला मग ते कोणतंही क्षेत्र असो, एकसमान आहे असं या पुस्तकातून सांगण्यात आलेलं आहे. या पुस्तकाची प्रस्तावन ज्येष्ठ उद्योजक मुकेश अंबानी यांनी केलेली आहे तर पुस्तकाचा अंतिम भाग हा ज्येष्ठ क्रिकेटपटू राहूल द्रवीड यांनी लिहीलेला आहे.
एखादा गीतकार, संगीतकार, खेळाडू, वकील, शिक्षक वा अन्य कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती असो.. यशाचा फॉर्म्युला, यशाचे सूत्र हे समानच आहे. या पुस्तकाचे मुख्यत्वे दोन भाग करता येतील.
भाग 1. वैयक्तिक कौशल्य
- उद्दीष्ट निश्चिती
- जिंकण्यासाठीच्या 3 गोष्टी
- हार आणि जीत या दोन्हीतून शिकण्यासारख्या गोष्टी
भाग 2. लोकांमधील कौशल्य
- संघटन कौशल्य
- नेतृत्त्वगुण
- सतत बदल करण्याचे महत्त्व
असे हे दोन भाग
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
चला यातील काही मुद्दे सविस्तर जाणून घेऊयात -
भाग 1 वैयक्तिक कौशल्य
1. उद्दीष्ट निश्चिती
उद्दीष्ट म्हणजे काय तर डेडलाईन्ससह असलेली तुमची स्वप्न. अर्थात, अशी स्वप्न जी पूर्ण करण्याचा तुम्ही चंग बांधता आणि त्यासाठी तुम्ही निश्चित तारीख ठरवता. अमक्या दिवसापर्यंत मी माझं अमुक स्वप्न पूर्ण केलेलं असेलंच हे तुम्ही निश्चित जेव्हा ठरवता तेव्हा ते तुमचं उद्दीष्ट होतं. लेखक सांगतात, की ही उद्दीष्ट नेहमी मोठी ठेवा. तसंच ही उद्दीष्ट परफॉर्मन्सवर आधारित असावीत, ना की रिझल्टवर आधारित असंही लेखक सांगतात.
सायन नेहवालचेच उदाहरण घेता येईल. ती जेव्हाही जी टूर्नामेंट खेळली तिथे तिने आपले 100 टक्के योगदान दिले. परफॉर्मन्स नेहमीच आपल्या हातात असतो पण रिझल्ट आपल्या हातात नसतो, म्हणून नेहमी परफॉर्मन्स बेस्ड उद्दीष्ट ठरवा.
2. जिंकण्यासाठीच्या तीन गोष्टी -
सगळ्यांनाच माहिती आहे विनोद कांबळीची गोष्ट... त्याच्यात जिंकण्यासाठीच्या सगळ्या क्षमता होत्या. त्याच्याकडे गुणवत्ता होती पण जिंकण्यासाठी अत्यावश्यक असलेला निर्धार आणि शिस्त नव्हती. विनोद कांबळीच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल की योग्य attitude नसेल तर गुणवत्ता आणि हुशारी काहीच कामाची नसते. अर्थात काय, तर जिंकण्यासाठी गुणवत्ता, attitude आणि पॅशन या तिन्ही गोष्टी एकत्र, एकाच ध्येयाप्रती वापरणे, असणे फारच महत्त्वाचे आहे.
3. हार आणि जीत यातून शिकणं फार महत्त्वाचं आहे..
अनेक लोक आपल्या पराजयानंतर स्वतःच्या एकूणएका गोष्टीची चिकीत्सा करत बसतात, पण त्याने काहीच उपयोग होत नाही. याचं कारण, हा खेळ आहे, आणि कोणीतरी जिंकतं कोणीतरी हरत हेच या खेळाचं आणि पर्यायानं जीवनाचं सत्य आहे. तुम्ही किती वेळा हरलात त्याने काहीच फरक पडत नाही, फरक त्याने पडतो किती तुम्ही किती चटकन उभे राहिलात. तसंच, केवळ तुम्ही जिंकला आहात याचा अर्थ हा नाही की तुम्ही सगळंच बरोबर केलं आहे.. म्हणूनच तुमच्या अपयशाबरोबरच यशातूनही शिका.
हे पुस्तक मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - https://salil.pro/winningway
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com