जेव्हा ती बोलली .. तेव्हा संपत्तीची बरसात झाली
ही कथा आहे एका अशा महिला उद्योजिकेची जी दुःखाने, दारिद्र्याने पिचलेली होती, लहानपणी जिच्याजवळ अंगात घालायला कपडे नव्हते म्हणून ती अक्षरशः बटाट्यांच्या गोण्या अंगात घालून रहायची. जिचं बालपण अगदी भयंकर गेलं. जेव्हा हिची आजी आजारी पडली तेव्हा 6 वर्षांच्या या चिमुकलीला मिलवाऊकी बोर्ड़ींग हाऊसमध्ये तिच्या आईजवळ रहायला पाठवण्यात आलं. इथे गरिबी तर होतीच पण या चिमुकलीच्या नशिबात लैंगिक शोषणही आलं ते इथेचं ! वयाच्या 9 व्या वर्षी तिच्यावर तिच्या 19 वर्षांच्या चुलत भावाने बलात्कार केला असं जेव्हा खुद्द ती आज सांगते तेव्हा आपल्या अंगावर काटा आल्यावाचून रहात नाही, आणि नंतरच्या वर्षात तिच्यावर कित्तीतरी पुरुषांनी, जे तिच्या आईचे मित्र म्हणवले जायचे, अशांनी या लहानग्या मुलीवर अनेक वेळा बलात्कार केला. अशा कठीण बालपणानंतर तिला तिच्या वडीलांकडे रहाण्यास पाठवून देण्यात आले, ओप्राच्या जीवनाला येथून खरा आकार मिळाला. तिच्या वडिलांनी तिला सुरक्षित वातावरण दिले आणि त्याचा परिणाम उत्तम झाला. पण तरीही परिस्थितीमुळे तिला तिचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि वयाच्या 19 व्या वर्षी तिने नाशव्हिलेच्या टीव्ही ब्रॉडकास्टींग आणि रेडीओवर काम करायलाही सुरुवात केली. इथे तिने वक्त्यांच्या ग्रुपमध्ये ( स्पीच ग्रुप ) भाग घेतला. त्यानंतर बाल्टीमोअर येथे कोएँकर म्हणून काम करत असतानाही तिचे लैंगिक शोषण करण्यात आले पण तरीही तिने माघार घेतली नाही, जॉब सोडला नाही. मात्र साडेसात महिन्यांनी तिला नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले.
पण ओप्रा हरली नाही. तिने AM Chicago हा शो होस्ट करण्यास सुरुवात केली. हा मॉर्निंग शो ज्याचं तोवरचं रेटींग अक्षरशः अत्यल्प होतं, तोच शो या मुलीनं आपल्या मेहनतीनं अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय केला आणि या शोला पुढे तिचंच नाव देण्यात आलं. द ओप्रा विन्फ्रे शो इतका गाजला की ओप्रा विन्फ्रेला आज संपूर्ण जग ओळखतं. टीव्ही इंडस्ट्रीची स्टार म्हणून ती आज ओळखली जाते आणि प्रत्यक्ष जीवनात ती एक अत्यंत यशस्वी आणि जगातील टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत उद्योजिका म्हणून जिचा गौरव होतो अशी ओप्रा विन्फ्रे !
2022 पर्यंत ओप्राची नेटवर्थ ही तब्बल $3.5 billion च्या घरात पोचली आहे. फोर्ब्सनेही ओप्राची दखल घेतली आहे. जगातील 400 सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत ओप्रा ही एकमेव कृष्णवर्णिय महिला आहे.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
ओप्राला हे कसं जमलं असावं याचं उत्तर खुद्द तिनेच आजवर कैकवेळा दिलेलं आहे.
ओप्रा म्हणते, तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात याने काहीच फरक पडत नाही, तुम्ही तरीही यशस्वी होऊ शकता.. होऊच शकता ! तुमची स्वप्न सतत तुमच्या डोळ्यांसमोर ठेवा, त्यापासून ढळू नका, तुमच्या जीवनातल्या कटकटी आणि अतिभावनिकतेपासून स्वतःला मुक्त करा आणि तुमच्या जीवनाकडून शिका हा मंत्र ओप्रा आपल्याला देते. आता वयाच्या 61 वर्षाला ओप्राची जगातील एक श्रीमंत उद्योजिका म्हणून मानाने जगते आहे. ती तिच्या कस्टम डिझाईन्ड ग्लोबल एक्स्प्रेस एक्सआरएस जेटने ज्याची किंमत तब्बल 42 मिलीअन डॉलर इतकी आहे, त्यातून प्रवास करते. रिअल इस्टेटमधलाही तिचा पोर्टफोलिओ इतका जबरदस्त आहे की तिच्याकडे 52 मिलीअन डॉलरची रिअल इस्टेट जगभरातील देशांमध्ये तिने घेतलेली आहे, ज्याला ती द प्रॉमिस्ड लँड असं लाडाने म्हणते.
असं असलं तरीही ओप्राने आजवर सामाजिक कार्यासाठी, विशेषतः द एन्जल नेटवर्क, द ओप्रा विन्फ्री फाऊंडेशन आणि द ओप्रा विन्फ्रे ऑपरेटींग फाऊंडेशन या तिन्ही संस्थांकरीता प्रचंड आर्थिक मदत केलेली आहे.
मित्रांनो, तुम्हालाही जर आपल्या जीवनात अशी झेप घ्यायची असेल तर ओप्राने सांगितलेले मंत्र विसरू नका, कृतीत आणा. आपल्या स्वप्नांचा सतत माग घेत रहा. तुमच्या जीवनातील कटकटी आणि तुमची भावनिकता नेहमीच तुमच्या स्वप्नपूर्तीमध्ये अडथळा आणत असते त्यामुळे या गोष्टी नेहमी नीट हाताळा. तुमचं डोकं शांत ठेवा आणि तुमच्या दैनंदिन जीवनातील रोजच्या अडचणींतून एकदा नीट मार्ग काढा आणि त्या कटकटी संपवा. आता जो वेळ मिळायला लागेल त्यातून छान कल्पक काम करा, संधी शोधा, संधी निर्माण करा आणि स्वतःचं जीवन उत्तम असल्याचा विश्वास स्वतःला देत रहा. या साऱ्याबरोबरच तुम्ही तुमच्या जीवनाकडून सतत शिकत रहा. तुमच्या मनाची काळजी घ्या. त्यासाठी चांगलं जीवन जगा, आध्यात्मिक व्हा.
खडतर परिस्थिती मधून जाणाऱ्या तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील महिलांबरोबर ही पोस्ट जरूर शेअर करा. जगण्याची आणि जिंकण्याची उमेद ही तुम्ही त्यांना दिलेली सर्वोत्तम भेट असेल.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com