मोबाईल आणि कम्प्यूटरच्या काही स्मार्ट टिप्स 

(#Techie_tuesday)

आज जाणून घेऊयात मोबाईल आणि कम्प्यूटरमधल्या काही स्मार्ट, सोप्या आणि उपयोगी ट्रिक्सबद्दल ..

1. फोटोवरून माहिती शोधणे -
गुगलवरती नेहमीच आपण निरनिराळे कीवर्ड्स किंवा हॅशटॅग्स सर्च करून त्या विषयीची माहिती शोधत असतो, पण काय तुम्हाला माहिती आहे का की एखाद्या फोटोवरूनही गुगलवर तुम्ही त्या फोटोशी संबंधित सर्व माहिती सर्च करू शकता?
- गुगल सर्च पेज ओपन करा
- त्यात सर्च इमेज ऑप्शन क्लिक करा
- आता सर्चबारमध्ये उजव्या बाजूला जो कॅमेऱ्याचा ऑप्शन दिसतो, त्यावर क्लिक करा.
- त्यात तुम्हाला दोन ऑप्शन्स मिळतील -
1. Paste image URL
2. Upload image
या दोन्हीपैकी योग्य तो पर्याय निवडून तुमच्याजवळील कोणतीही इमेज वा फोटो तुम्ही अपलोड केलात की लगेचच त्या फोटो वा इमेजबद्दलची गुगलकडे असलेली सर्व माहिती तो दाखवतो.

2. Night Mode -
तुमच्या मोबाईलच्या ब्राईटनेसमुळे अनेकदा रात्री तुमच्या शेजारी झोपणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो, अशावेळी तुम्ही फोनचा ब्राईटनेस कमी केलात तरीही फारसा फरक पडत नाही. त्याऐवजी, जर तुमच्या मोबाईलच्या सेटींगमध्ये चेक केलंत तर तुम्हाला activate night mode असा ऑप्शन मिळतो. तो जर एक्टीव्हेट केलात तर तुमच्या डोळ्यांनाही त्रास होणार नाही आणि रात्री तुम्ही दिवे मालवल्यानंतरही तुमचा फोन व्यवस्थित पाहू शकाल आणि शेजारी झोपलेल्या व्यक्तीला त्यामुळे त्रासदेखील होणं बंद होईल.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

3. Download PDF file -
बरेचदा व्हॉट्सअपवर किंवा मेलवर आलेल्या PDF file आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड झाल्या तरीही त्या नीट ओपन होत नाहीत, कारण, त्या फाईल्ससाठी योग्य app आपल्याकडे नसतं. त्यामुळेच गुगलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही PDF file viewer or WPS office हे app download करून ठेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर PDF file नीट वाचता येतील.

4. Recover deleted photos -
बरेचदा, चुकीने आपल्या फोनमधून वा कम्प्यूटरमधून आपले जुने, छान छान फोटोज डिलीट होऊन जातात आणि आपण हळहळत रहातो, कारण, हे फोटोज आपल्याला आता परत मिळणार नसतात, पण असे एक सॉफ्टवेअर गुगलवर मोफत उपलब्ध आहे, जे वापरून तुम्ही डिलीट झालेले फोटोज पुन्हा परत मिळवू शकता. या सॉफ्टवेअरचं नाव आहे, Recuva software. हे गुगलवर फ्री उपलब्ध आहे. या सॉफ्टवेअरच्या वेबसाईटवर जाऊन तिथे दिलेल्या स्टेप्स फॉलॉ करून तुम्ही तुमचे फोटोज परत मिळवू शकता. त्याचबरोबर Puran file Recovery नावाचं आणखी एक फ्री सॉफ्टवेअर गुगलवर उपलब्ध आहे त्याचाही वापर करून तुम्ही तुमचा डेटा रिकव्हर करू शकता.


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy