काही प्रेरणादायी वाक्य

जीवनात अनेकदा आपण अपयशी होतो, थकतो, हरतो.. पण मित्रांनो, असे अनेकजण या जीवनात होऊन गेलेत ज्यांनी कधीच हार मानली नाही आणि ते चालत राहिले.. आणि अखेरीस त्यांनी जग जिंकलं. हे कसं झालं ? त्यासाठी ही अनेक थोरमहान लोकांनी सांगितलेली काही प्रेरणादायी वाक्य, जी अर्थातच त्यांनी त्यांच्या जीवनानुभवातून आपल्याला सांगितलेली आहेत.. या वाक्यांवर जरूर विचार करा आणि आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करत रहा.. एक ना एक दिवस यश तुमचंच असेल .. !

1. एखादी हार आणि अखेरची हार यात कधीही गल्लत करू नका. - F. Scott Fitzgerald

2. अनेकांना हेच ठाऊक नसतं, की ते आता यश मिळविण्याच्या किती जवळ येऊन ठेपलेत आणि तशातच ते हार मानून घेतात... जीवनात अनेकजणं केवळ म्हणूनच कायमचे अपयशी झालेले आहेत. - Thomas Edison

3. मेहनत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मेहनतीला पर्याय नाही, मेहनतीशिवाय या जगात काहीही मिळणे अशक्य आहे. - George Lucas

4. जेव्हा सगळ्यांनी हार मानलेली असते तेव्हाही जो हार मानत नाही तोच अखेर यशस्वी होतो. - William Feather

5. खरंतर तेच आणि तेवढंच धैर्य महत्त्वाचं ठरतं, जे तुम्हाला एका क्षणातून पुढच्या क्षणात नेण्यासाठी समर्थ ठरतं. - Mignonette McLaughlin

6. जरी तुम्ही नरकातून चालले असाल तरीही .. चालत रहा - Winston Churchill

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

7. अडचणी आणि संकटांची अपेक्षा करा आणि त्यांना नाश्त्याच्या वेळीच खाऊन टाका - Alfred A. Montapert

8. कधीकधी जीवन अक्षरशः तुमच्या टाळक्यात वीट हाणून तुम्हाला जखमी करेल, पण तरीही तुम्ही हिंमत हरू नका, विश्वास ठेवा - Steve Jobs

9. नवा दिवस, नवी उमेद, नवी शक्ती, नवे विचार - Eleanor Roosevelt

10. अडचणी म्हणजे लाल सिग्नल नाही, तर दिशादर्शक खुणा - Robert Schuller

11. मी कधीच अपयशी होणार नाही या असत्यासह जगण्यापेक्षा, मी जेव्हाही अपयशी होईन त्यानंतर पुन्हा पुन्हा उठून चालायला लागेन हे अनुभवण्यात आयुष्याचं खरं सौंदर्य आहे.- Nelson Mandela

12. तुमची स्वप्न चिरडून टाकण्याची ताकद कोणातंच नसते, जोवर तुम्ही त्यांना तुमची स्वप्न सांगत नाही - Maeve Greyson

13. कधीपर्यंत प्रयत्न करत रहायचं ? जोवर साध्य होत नाही तोवर ! - Jim Rohn

14. शेवटी सगळं चांगलं होतं, आणि जर सगळं चांगलं झालेलं नसेल तर समजून जा की हा शेवट नाहीये - Fernando Sabino

15. यशस्वी पुरूष आणि स्त्रिया पुढे चालत रहातात. ते चुका करतात, पण ते थांबत नाहीत. - Conrad Hilton

16. तुम्ही किती हळू चालताय त्याने काहीच फरक पडत नाही जोवर तुम्ही थांबत नाही - Confucius

17. आव्हानांमुळे जीवन आणखी रसभरीत होतं आणि त्या आव्हानांना यशस्वीरित्या पार केल्याने जीवन अधिक अर्थपूर्ण होतं - Joshua J. Marine

18. तुमचा एकही दिवस ज्यामुळे पुरा होऊ शकत नाही अशा गोष्टींबाबत तर कधीच हार मानू नका - Winston Churchill

19. तुम्हाला जी व्यक्ती बनायचंय, ती बनण्यास कधीही उशीर झालेला नसतो.. - William Wordsworth

20. तुम्ही जे आज करताय त्यामुळे तुमचा उद्या अधिक चांगला होणार आहे - Ralph Marston

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2025 Privacy policy Terms of use Contact us Refund policy